Moong and Urad Crops 2025 खरीप हंगामातील तूर या मुख्य कडधान्याप्रमाणेच मूग व उडीद ही कडधान्य घेतले जातात. या पिकावर येणाऱ्या किडींच्या नियंत्रणाच्या दृष्टीने फारसा विचार केला जात नाही. त्यामुळे मूग व उडीद या पिकांच्या उत्पादनात घट येते.

या कडधान्यावर मावा, तुडतुडे, फुलकिडे, पांढरी माशी, खोडमाशी, केसळ आळी, पाने पोखरणारी अळी, इत्यादी. किडींचा प्रादुर्भाव होत असतो.
द्राक्ष पीक नियोजन!!
किडी: Moong and Urad Crops 2025
मावा:
मावा किडींचा रंग फिक्कट हिरवा किंवा तपकिरी आणि आकाराने अंडाकृती असतो. या किडीची पिल्ले आणि पूर्ण झालेला मावा पानातील फुलाच्या देठातील रस शोषण करतो. याशिवाय आपल्या शरीरातून एक प्रकारचा गोड चिकट पदार्थ बाहेर टाकतो. त्यावर काही बुरशी वाढते. यामुळे या झाडाच्या वाढीवर अनिष्ट परिणाम होतो, तसेच झाड निस्तेज होऊन वाढ खुंटते.

तुडतुडे:
तुडतुडे आकाराने मध्ये पाथरीच्या आकाराचे आणि हिरवे असतात. ते पानावर तिरपे तिरपे चालतात. व त्यांची पिल्ले पानातून शोषण करतात. त्यामुळे पाणी पिवळी पडून वाळू लागतात. व पिकाची वाढ खुंटते जास्त प्रादुर्भाव झाल्यास पाण्यात असतात आणि वाळतात.
फुलकिडे:
फुलकिडे आकाराने सूक्ष्म असून त्यांची लांबी 1 मिमी पेक्षाही कमी असते. ते हिरवट तपकिरी अथवा करड्या रंगाचे आणि आकाराने निमुळते असतात. हि कीड पाने व फुलांच्या देठ खरवडून त्यातील स्त्रावणाऱ्या रसाचे शोषण करतात. त्यामुळे पाणी फिक्कट पडून त्यावर पांढरे चट्टे दिसून येतात. अशा उपद्रवांमुळे पाणी चुरडू लागतात.
पांढरी माशी:
पांढऱ्या माशीचे पंख धुरकट पांढरे असतात. अपूर्ण अवस्थेतील माशा बहुदा पानाच्या खालच्या बाजूस राहून रस शोषण करतात. त्या आकाराने गोल आणि रंगाने तपकिरी असतात. त्याच्या रस शोषणाच्या क्रियेमुळे पाने पिवळी पडतात. या किडीमुळे केवडा रोगाचा प्रसार होतो. केवढा रोगाचा प्रसार जास्त प्रमाणात झाल्यास पाणी पिवळी दिसतात व संपूर्ण झाड नष्ट होते. त्यामुळे त्यांचे नियंत्रण करणे आवश्यक्य ठरते.
खोडमाशी:
खोडमाशी खोडावर अंडी घालते अंड्यातून बाहेर आलेली अळी कोवळ्याखोडात शिरून आतील गाभा खाते त्यामुळे उपद्रवीत झाडाच्या खोडाचा वरील भाग वाळून संपूर्ण झाड मरते. परिणामतः उत्पादनात फार घट येते.
पाने पोखरणारी केसळ आळी:
अंड्यातून बाहेर पडलेल्या राखी रंगाच्या असून अंगावर केस असतात. अळ्या पाने कुरतडून खातात त्यामुळे पानाचा फक्त शिराच शिल्लक राहतो. अशी उपद्रवीत झाडे शेतात लांबूनच दिसून येतात.
कोळी:
कोळी या किडीचा आकार अतिशय लहान असतो ते रंगाने लाल, पिवळे असतात. पानांच्या मागील बाजूस राहून पेशीद्रव शोषतात तसेच जाळी तयार करतात. प्रादुर्भाव जास्त झाल्यास पानांचा रंग विटकरी रंगाचा होऊन पाने गळून पडतात. या किडीच्या प्रादुर्भावामुळे पानातील हरितद्रव्य कमी होते. त्याचबरोबर झाडातील पाणी कमी होते. पानावर पिवळे, तांबडे, लाल चट्टे पडतात. पाने वाकडे होतात व वाळतात, कालांतराने पाने गळून पडतात. उष्ण व कोरडे हवामान या किडीस अनुकूल असते. पावसाळ्यात या किडीचा प्रादुर्भाव कमी दिसतो कारण पावसामुळे कोळी धुवून जातात.
रोगनियंत्रण: Moong and Urad Crops 2025
भुरी:
भुरी हा रोग इरिसिपि पॉलीगोनी या बुरशीमुळे होतो. भुरी रोगामुळे सुरुवातीस पानावर लहान, गोलाकार, पांढरे ठिबके दिसून येतात आणि नंतर संपूर्ण पाने पांढरट होतात. भुरी रोगाचा प्रादुर्भाव जास्त दिसताच वरील ठिपके राखी तपकीरी रंगाचे होतात. त्यामुळे झाडाचे मोठ्या प्रमाणावर पानगळ होते. अशा प्रकारचे पांढरट ठिपके किंवा बुरशीची वाढ शेंगांवर दिसून येते. त्यामुळे शेंगांचा आकार लहान होतो व शेंगात दाणे भरल्यास ते लहान असतात.
पांढरट ठिपके प्रादुर्भाव वाढत्या कळीवर दिसून आल्यास कळी करपते. शेवटी भुरी रोगाच्या प्रादुर्भावामुळे पीक लवकर पक्व होऊन उत्पादनात घट येते. भुरी रोगाचा प्रसार रोगग्रस्त झाडे अथवा बियाणांवर असणारे भुरीचे बीजाणू यामार्फत होतो. तसेच पीक फुलोऱ्यात असताना किंवा शेंगा भरतेवेळी, किडी किंवा वाऱ्यामार्फत रोगग्रस्त झाडांवरून चांगल्या झाडावर होत असतो.
नियंत्रण:
वैभव बी.पी.एम.आर.- 145 या भुरी रोगप्रतिबंधक वाणांची लागवड करावी.
या रोगाच्या नियंत्रणासाठी 300 पोटाचे गंधक बुकिंग प्रती हेक्टर 25 किलो वारा शांत असताना धुरळावी अथवा 250 ग्रॅम कार्बेनडिझम अथवा 1250 ग्रॅम पाण्यात मिसळणारे गंधक 500 लिटर पाण्यात मिसळून प्रति हेक्टरी फवारणी करावी.

केवडा: Moong and Urad Crops 2025
हा विषाणूजन्य असून त्याचा प्रसार पांढरी माशी या किडीद्वारे होतो. या रोगाचा प्रादुर्भाव पेरणीनंतर 30 दिवसांनी दिसतो. झाडाची वाढ खुंटते. या रोगामुळे सुरुवातीला पानावर पिवळसर ठिपके आणि हिरवे चट्टे दिसतात. हे ठिपके सुरुवातीला लहान व गोलाकार असतात व रोगाचे तीव्रता वाढल्यानंतर मोठे आणि आकार विहिरीत होतात.
रोगाची तीव्रता जास्त झाल्यास पूर्ण पाने पांढरी होतात. आणि ही पांढरी पाने जळाल्यासारखे दिसतात. हे ठिबके वाढत जाऊन कोवळे शेंडे पूर्ण पिवळे पडतात. रोगांचा प्रादुर्भाव जास्त झाल्यास शेंगा देखील पिवळ्या पडतात. रोगग्रस्त शेंगा तसेच रोगग्रस्त शेंगातील दाणे लहान राहतात आणि सुरकुतल्यासारखे दिसतात.
नियंत्रण:
विषाणू ग्रस्त झाडे उपटून त्यांचा नाश करावा.
वैभव बी.पी.एम.आर.- 145 या केवडा प्रतिबंधक जातीची लागवड करावी.
पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी डायमेथोएट 30 टक्के प्रभावी 10 मिली अथवा मिथिल डिमेटॉन 25% प्रवाही 8 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
पाने आकसने: Moong and Urad Crops 2025
हा विषाणूजन्य रोग असून त्याचा प्रसार बियाणामार्फत तसेच मावा, पांढरी माशी आणि तुडतुडे या किडीमार्फत होतो. पानांचा आकार वाढून त्यांचा पृष्ठभाग आकसतो व झाडे खुजी राहतात कोवळी पाने जास्त प्रमाणात आकसतात त्यामुळे फांद्या लहान राहून शेंगा कमी लागतात या रोगाचा प्रादुर्भाव 30 दिसवात आल्यास झाडाला फुले व शेंगा येत नाहीत.
नियंत्रण:
रोगग्रस्त झाडे उपटून नष्ट करावा. मावा, पांढरी माशी आणि तुडतुडे या किडींच्या नियंत्रणासाठी वर सांगितल्याप्रमाणे कीटकनाशकाची फवारणी करावी. वरील प्रमाणे एकात्मिक पद्धतीचा अवलंब करून कडधान्यावरील किडी व रोगापासून होणारे नुकसान आटोक्यात आणणे शक्य होऊ शकते.
एकात्मिक कीड व्यवस्थापन:
पिक पेरणीपूर्वी:
पेरणीपूर्वी उन्हाळ्यात जमिनीची खोलवर नांगरणी करून कुळवाच्या एक-दोन पाळया द्याव्यात म्हणजे किडींचे जमिनीतील कोष पृष्ठभागावर येऊन त्यांचा सूर्याच्या प्रखर उष्णतेने व पक्षांपासून नाश होतो.
पिकाची फेरपालट करावी.
शिफारशीत केलेल्या वाणांची योग्य अंतरावर पेरणी करावी.
मूग : वैभव, बी.पी.एम.आर.- 145
उडीद : टिपीयु-4 अंतर 30*10 सेमी.
बीजप्रक्रिया: Moong and Urad Crops 2025
रोग व्यवस्थापनाकरिता 2 ग्रॅम थायरम + 2 ग्रॅम कार्बेनडीझम किंवा 5 ग्रॅम ट्रायकोडर्मा प्रति किलो बियाणास पेरणीपूर्वी चोळावे त्यानंतर 25 ग्रॅम रायझोबियम प्रति किलो बियाणे याप्रमाणे चोळावे.
प्राथमिक अवस्थेत येणाऱ्या रस शोषक किडींपासून इमिडायक्लोप्रिड अथवा थायोमॅक्झाम 70 टक्के पाण्यात विरघळणारे 5 ग्रॅम प्रति किलो बियाणास चोळावे, अथवा इमिडायक्लोप्रिड 0.3 टक्के दाणेदार 15 किलो प्रति हेक्टर पेरणी करते वेळी जमिनीतून द्यावे.
तृणधान्य ही पिके आंतरपिके म्हणून घ्यावे. रोग किडींसाठी पिकाची वरचेवर पाहणे करावे.
जिरायत मुगासाठी 2 टक्के युरियाच्या दोन फवारण्या कराव्यात. पीक 50 टक्के फुलोऱ्यात असताना पहिली व त्यानंतर 15 दिवसांनी दुसरे फवारणी करावी.
शेंगा पोखरणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव ओळखण्याकरिता शेतात प्रति एकरी 5 कामगंध सापळे लावावेत. सलग 2-3 दिवसात 4 ते 5 पतंग आढळून आल्यास शिफारसीनुसार कीटकनाशकाची फवारणी करावी.

पीक रोपावस्थेत व शेंगा भरताना:
खोडमाशीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास 10टक्के फोरेट दाणेदार 4 किलो प्रति हेक्टरी मातीत मिसळून द्यावे.
केसाळ अळ्यांचा प्रादुर्भाव झाल्यास अळ्या व अंडीपुंज वेचून रॉकेल मिश्रित पाण्यात टाकून त्यांचा नाश करावा.
मावा, तुडतुडे, फुलकिडे, पांढरी माशी, खोडमाशी, पाने खाणारी केसाळ अळी, भुंगेरे व कोळी यापैकी कोणत्याही किडीचा प्रादुर्भाव आढळून येताच.
डायमेथोएट 30 टक्के प्रवाही एकरी 200 मिली. किंवा
मिथिल डिमेटॉन 25 टक्के प्रवाही एकरी 160 मिली. किंवा
मोनोक्रोटोफॉस 36 टक्के प्रवाही एकरी 175 मिली.
यापैकी कोणत्याही एका कीटकनाशकाची फवारणी करावी.
शेंगा पोखरणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव आढळून येताच खाली दिल्याप्रमाणे पहिली फवारणी कीडनाशकाच्या घडी पत्रिकेतील शिफारसीमध्ये नमूद केल्याप्रमाणे करावी व गरज भासल्यास दुसरी फवारणी 15 दिवसाच्या अंतराने करावी.
मुग पिकासाठी : 2 टक्के मिथिल पॅराथिऑनची भुकटी एकरी 10 किलो अथवा मोनोक्रोटोफॉस 36 टक्के प्रवाही एकरी 175 मिली.
उडीद पिकासाठी : क्विनॉलफॉस 25 टक्के प्रवाही एकरी 600 मिली अथवा मोनोक्रोटोफॉस 36 टक्के प्रवाही एकरी 250 मिली. अथवा 2 टक्के मिथिल पॅराथिऑनची भुकटी एकरी 10 किलो अथवा डॅलुफेनुरॉन 5.4 टक्के प्रवाही एकरी 240 मिली पाण्यात विरघळणारे 50 टक्के थायोडीकरब 250 ग्रॅम.
इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |