मान्सून किती दिवस घेणार विश्रांती? पेरणी करावी का? जाणून घ्या सविस्तर; Monsoon Update 2025

Monsoon Update 2025 यंदा नियोजित वेळेपेक्षा लवकर दाखल झालेल्या नैऋत्य मोसमी पाऊस अर्थात मान्सून आत्तापर्यंत अठरा राज्यात दाखल झाला असून अनेक राज्यात मुसळधार पाऊस सुरू आहे.

Monsoon Update 2025

WhatsApp Group Join Now

मान्सूनच्या आगमनापासून सहा दिवसात देशभरात देशभर सरासरीच्या 33 टक्के अधिक पाऊस झाला आहे. उत्तर भारतात मान्सूनची प्रतीक्षा असून बिहार, झारखंड, मध्य प्रदेश उत्तर प्रदेशात 12 ते 15 जून पर्यंत तो सक्रिय होण्याची शक्यता हवामान शास्त्र विभागाने व्यक्त केली आहे.

गिरणा धरणात किती टक्के पाणी शिल्लक? जाणून घ्या सविस्तर;

Monsoon Update 2025 दक्षिणेतील राज्यात मान्सूनचे दमदार आगमन झाले असून ईशान्य भारतातील राज्यातही जोरदार वर्दी दिली आहे. हवामान शास्त्र विभागानुसार 18 राज्यात मान्सून पूर्णपणे सक्रिय केव्हा काही प्रमाणात दाखल झाला आहे.

बदललेल्या वातावरणामुळे मान्सूनच्या प्रवासाची गती कमी होण्यास सुरुवात झाली आहे. 10 जून पर्यंत तरी मान्सूनचा प्रवास थांबणार असल्याचा अंदाज आहे.

WhatsApp Group Join Now

Monsoon Update 2025 यादरम्यान केवळ पश्चिम किनारपट्टी व राज्यातील काही भागात हलका पाऊस पडू शकतो. राज्यातील बहुतांश भागात मात्र कोरडे हवामान अपेक्षित असल्याचे कृषी विभागाने कळवले आहे. बदललेल्या या वातावरणामुळे राज्यातील कमाल तापमानात वाढ होईल.

या कोरड्या हवामानाचा वाईट परिणाम पेरणी आणि लागवडीवर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी आणि लागवडीची घाई करू नये, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment