Monsoon Update 2025 मुंबई आणि पुण्यात एका दिवसाची विश्रांती घेतल्यानंतर मान्सूनने बुधवारी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात धडक दिली आहे.

पुढील 24 तासांमध्ये विदर्भाच्या काही जिल्ह्यांमध्ये गुरुवारी तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान शास्त्र विभागाने व्यक्त केली आहे.
कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक यांची नावे बदलण्यास मान्यता, वाचा मंत्रिमंडळ निर्णय!
Monsoon Update 2025 तर मराठवाडा व विदर्भाच्या उर्वरित जिल्ह्यांमध्ये बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता ही आहे. पुणे, सातारा जिल्ह्यांच्या घाट परिसरात ही तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.

Monsoon Update 2025 कोकण आणि गोव्यात पाच दिवसात व विदर्भात गुरुवारी बऱ्याच ठिकाणी पाऊस पडेल, तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याच्या काही ठिकाणी तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.
गुरुवारी अमरावती भंडारा आणि चंद्रपूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाने बुधवारी विदर्भात मान्सूनच्या आगमनाची अधिकृत घोषणा केली आहे.
आता तो गडचिरोलीत पोहोचल्याची घोषणा वेध शाळेतर्फे करण्यात आली. मात्र, घोषणेच्या एक दिवसापूर्वीच मानसून पूर्व पावसाने मात्र विदर्भातील काही जिल्ह्यांना चांगलाच तडाखा दिला.
बुधवारी सायंकाळी वादळ वाऱ्यासह बरसलेल्या पावसाने नागपूर यांचीही दाणादाण उडवली. बुधवारी सकाळपर्यंत अमरावतीत 45.2 मि.मी पाऊस बरसला.
इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |