अर्थसंकल्पात मोठी घोषणा; मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेअंतर्गत कृषी पंपांना मोफत वीज Mofat Vij Yojana 2025

Mofat Vij Yojana 2025 कृत्रिम बुध्दिमत्ता” तंत्रज्ञानाचा शेतीक्षेत्रात वापर – पहिल्या टप्प्यात 50 हजार शेतकऱ्यांच्या एक लाख एकर क्षेत्राला फायदा – दोन वर्षात 500 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रमाअंतर्गत कालवे वितरण प्रणालीतील सुधारणेची सुमारे 5 हजार 36 कोटी रुपये किमतीची कामे मंजूर केलीत.

Mofat Vij Yojana 2025

WhatsApp Group Join Now

राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर सरकारकडून पहिला अर्थसंकल्प सादर केला आहे. अर्थसंकल्पात राज्यातील ग्रामीण भागाचा विकास, शेतकरी कल्याण,  महिला सशक्तीकरण, शिक्षण, रोजगार आणि पायाभूत सुविधा यांसारख्या महत्त्वाच्या योजनांवर भर देण्यात आला आहे. सौर ऊर्जा योजना, महिलांसाठी सशक्तीकरण योजनांमध्ये वाढ, तसेच तरुणांसाठी रोजगार निर्मितीसाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे.  यामुळे राज्यातील अनेक वंचित घटकांना याचा होण्याची शक्यता आहे. अर्थसंकल्पात कृषी आणि संलग्न क्षेत्रावर देखील भर मोठा भर देण्यात आला आहे.

Mofat Vij Yojana 2025 अर्थसंकल्पात काय आहेत घोषणा तर चला जाणून घेऊयात…

  • नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा – 21 जिल्ह्यांतील 7 हजार 201 गावांमध्ये राबविण्यात येणार-त्यासाठी 351 कोटी 42 लाख रुपये नियतव्यय
  • “कृत्रिम बुध्दिमत्ता” तंत्रज्ञानाचा शेतीक्षेत्रात वापर – पहिल्या टप्प्यात 50 हजार शेतकऱ्यांच्या एक लाख एकर क्षेत्राला फायदा – दोन वर्षात 500 कोटी रुपयांचा निधी
  • महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रमाअंतर्गत कालवे वितरण प्रणालीतील सुधारणेची सुमारे 5 हजार 36 कोटी रुपये किमतीची कामे मंजूर
  • जलयुक्त शिवार अभियान 2.0 अंतर्गत 5 हजार 818 गावांमध्ये 4 हजार 227 कोटी रुपये किंमतीची एकूण 1 लाख 48 हजार 888 कामे हाती घेणार,अभियानातील सर्व कामे मार्च, 2026 पर्यंत पूर्ण करणार
  • “गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार” योजना कायमस्वरुपी राबविणार
  • वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पास तत्वत: मान्यता -अंदाजित किंमत 88 हजार 574 कोटी रुपये -लाभक्षेत्र 3 लाख 71 हजार 277 हेक्टर
  • नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्पाव्दारे नाशिक व जळगाव जिल्हयातील 49 हजार 516 हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ-प्रकल्पाची अंदाजित किंमत 7 हजार 500 कोटी रूपये
  • दमणगंगा-एकदरे-गोदावरी या 2 हजार 300 कोटी रूपये किंमतीच्या नदीजोड प्रकल्पामुळे 3.55 टीएमसी पाणी उपलब्ध होणार
  • तापी महापुनर्भरण हा 19 हजार 300 कोटी रुपये किंमतीचा सिंचन-उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम विदर्भातील खारपाण पट्ट्यातील  शेतकऱ्यांना लाभ
  • कोकणातील उल्हास आणि वैतरणा नद्यांच्या खोऱ्यातून 54.70 टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्याचा प्रकल्प हाती घेण्यात येणार, मराठवाड्यातील सुमारे 2 लाख 40 हजार हेक्टर क्षेत्राच्या सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार
  • सांगली जिल्ह्यातील 200 मेगावॅट क्षमतेच्या म्हैसाळ उपसा सिंचन योजना -1 हजार 594 कोटी रुपये किंमतीच्या सौरऊर्जा प्रकल्पास मान्यता

मराठवाड्यात 24 तासांनंतर तापमानात मोठे बदल, शेतकऱ्यांनी पीक व्यवस्थापन कसे कराल? वाचा सविस्तर…

  • गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पातून डिसेंबर 2024 अखेर 12 हजार 332 हेक्टर सिंचन क्षमता निर्माण, प्रकल्प जून, 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन
  • 38 उदंचन जलविद्युत प्रकल्पांसाठी सामंजस्य करार – 2.95 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक व 90 हजार रोजगार निर्मिती
  • मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज (Mofat Vij Yojana 2025) योजनेअंतर्गत 7.5 अश्वशक्ती पर्यंतच्या 45 लक्ष कृषी पंपांना मोफत वीज
  • राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानांतर्गत 2 लाख 13 हजार 625 लाभार्थी शेतकऱ्यांना येत्या दोन वर्षांसाठी 255 कोटी रुपयांचा निधी
  • नगरपालिका क्षेत्रांतील सांडपाण्यावर प्रक्रियेचा 8 हजार 200 कोटी रुपये किंमतीचा प्रकल्प हाती घेणार
  • बांबू आधारित उद्योगांना चालना देण्यासाठी राज्यात  4 हजार 300 कोटी रुपये  किमतीचा बांबू लागवड प्रकल्प राबविणार
  • “आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष-2025” राज्यात विविध कार्यक्रम, महोत्सव   आयोजित करण्यास पुरेसा निधी उपलब्ध देणार
  • 2100 कोटी रुपये किंमतीचा मा. बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन-स्मार्ट प्रकल्प राबविणार
  •  राज्य शाश्वत व उच्च मूल्य असलेल्या कृषी व्यवसायाचे केंद्र व्हावे यासाठी “महाराष्ट्र अ‍ॅग्रीबिझनेस नेटवर्क-मॅग्नेट 2.0” हा 2100 कोटी रुपयांचा प्रकल्प राबविणार
  •  शेतकऱ्यांना दिवसा विश्वासार्ह वीज पुरवठा करणे शक्य व्हावे, यासाठी 27 जिल्ह्यांमध्ये मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 राबविणार
  • बी बियाणे, यंत्रसामुग्री, खते आणि शेतमालाच्या वाहतूकीसाठी “बळीराजा शेत व पाणंद रस्ते” ही नवी योजना सुरू करणार

WhatsApp Group Join Now
इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment