Mofat Vij 2025 डिसेंबर 2026 पर्यंत राज्यातील 80 टक्के शेतकऱ्यांना वर्षभर 12 तास मोफत वीज उपलब्ध करून देण्यात येईल तसेच येत्या पाच वर्षात राज्यात सामान्य नागरिकांचे वीज बिल दरवर्षी कमी होणार आहे. असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आर्वी, वर्धा येथे विविध विकास कामांच्या लोकापर्ण व भूमिपूजन प्रसंगी केले.

तसेच वर्धा जिल्ह्यात लोअर वर्धा प्रकल्प, वाढोणा-पिंपळखुटा आधी सिंचन प्रकल्पांद्वारे शेतीसाठी पाणी व वीज उपलब्ध करून देऊ आणि जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावरील नोडवर एमआयडीसी उभारून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
रेन वॉटर हार्व्हेस्टिंगचे महत्व, जाणून घ्या सविस्तर;
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आर्वी येथील नवीन प्रशासकीय इमारतीच्या लोकापर्णसह 720 कोटींच्या विकास कामांचे ई-लोकापर्ण व भूमिपूजन झाले. त्यावेळी ते बोलत होते.

गृह (ग्रामीण) राज्यमंत्री तथा पालकमंत्री डॉ. पंकज भोयर, खासदार अमर काळे, आमदार सर्वश्री दादाराव केचे, सुमित वानखेडे, समीर कुणावर, राजेश बकाने, माजी खासदार रामदास तडस, जिल्हाधिकारी वानमिती सी., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जीतीन रहमान यावेळी उपस्थित होते.
Mofat Vij 2025 मुख्यमंत्री श्री फडणवीस म्हणाले, राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या हिताचे विविध निर्णय घेऊन प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू केली आहे. शेतीसाठी 12 तास विजेची शेतकऱ्यांची मागणी होती.
या दृष्टीने राज्य शासनाने प्रभावी अंमलबजावणी सुरू केली असून डिसेंबर 2026 पर्यंत 80 टक्के शेतकऱ्यांना 365 दिवस दिवसाला 12 तास मोफत वीज उपलब्ध करून दिली जाणार आहे..
Mofat Vij 2025 राज्य शासनाने 2025 ते 2030 पर्यंत राज्यातील वीज वापरकर्त्यांचे वीज बिल दरवर्षी कमी करण्याचे नियोजन व तशी कार्यवाही सुरू केली आहे. तसेच 300 युनिट पर्यंत वीज वापरणाऱ्या मध्यम वर्गीय व गरीब कुटुंबांना सौर ऊर्जा अंतर्गत आणून मोफत वीज देण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.
Mofat Vij 2025 वर्धा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सिंचन
- वैनगंगा-नळगंगा नदी जोड प्रकल्पामुळे वर्ध्यासह विदर्भातील दहा जिल्ह्यांमध्ये काही दुष्काळग्रस्त भाग सुजलाम सुफलाम होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
- या प्रकल्पाद्वारे गोसीखुर्द धरणातील 62 टीएमसी सांडव्याद्वारे नव्याने 550 कि.मी.ची नदी तयार करण्यात येणार आहे. यासाठी 1 लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
- या योजनेसाठीच्या सर्व मंजुरी देण्यात आल्या असून योजनेचा अंतिम आराखडा तयार होत आहे. यावर्षी अखेरी किंवा पुढील वर्षाच्या सुरुवातीला या योजनेचे काम सुरू होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |