अवकाळीमुळे पूर्व हंगामी मिरचीला मिळाले जीवदान! वाचा सविस्तर; Mirchi Pik 2025

Mirchi Pik 2025 सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा परिसरात गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या वळवाच्या पावसामुळे उन्हाळी पिकांचे काही प्रमाणात नुकसान झाले असले, तरी पूर्व हंगामी मिरचीला मात्र जीवदान मिळाले आहे.

Mirchi Pik 2025

शेतकऱ्यांनी मार्च एप्रिलमध्ये केलेल्या मिरची लागवडीला काही काळ 42 ते 43 अंश सेल्सिअस तापमानाचा तडाखा बसला होता. यामुळे अनेक भागातील रोपे करपून गेली होती. मात्र, मागील आठवड्याभरात वातावरण ढगाळ राहिल्यामुळे आणि अधून-मधून पाऊस झाल्यामुळे मिरचीची रोपे टवटवीत होऊन पिक बहरण्यास सुरुवात झाली आहे.

राज्यात 10 दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज; या जिल्ह्यात अधिक प्रभाव?

घाटनांद्रातील पेडगाव, चारणेवाडी, धारला आदी गावातील शेकडो शेतकऱ्यांनी हजारो रुपयांचा खर्च करून मिरचीची लागवड केली आहे.

WhatsApp Group Join Now

पूर्वी पारंपारिक पिकात अपेक्षित उत्पादन न मिळाल्याने गेल्या 20 वर्षांपासून या भागातील शेतकरी मिरचीकडे वळले आहेत. कमी खर्चात अधिक उत्पादन देणारे पीक म्हणून मिरचीने शेतकऱ्यांचा विश्वास जिंकला आहे.

सध्या घाटनांद्रात मिरचीला स्थानिक बाजारात 40 ते 45 रुपये किलोचा भाव मिळत आहे. मुंबई बाजारात याच मिरचीला 50 ते 60 रुपये किलो पर्यंत दर मिळतो आहे. त्यामुळे दर वाढीची शक्यता पाहता शेतकऱ्यांमध्ये आशावाद निर्माण झाला आहे.

Mirchi Pik 2025 मिरची पिकाला फायदा!

यावर्षी मी दोन एकर क्षेत्रामध्ये पूर्व हंगामी मिरची लागवड केली आहे. सुरुवातीला पाण्याअभावी रोपे करपत होते. मात्र सध्या पडत असलेल्या अवकाळी पावसामुळे मिरची पिकाला फायदा झाला आहे. त्यामुळे हे पीक सध्या बहरले आहे. – खुशाल पंडित, शेतकरी”

WhatsApp Group Join Now

Mirchi Pik 2025 असा मिळते बाजारात दर…

  • घाटनांद्रा व परिसरातून उत्पादित झालेल्या पूर्व हंगामी मिरचीला स्थानिक बाजारात सध्या 40 ते 45 रुपये प्रति किलोचा भाव मिळत आहे.
  • मुंबई येथे मात्र प्रति किलो 50 ते 60 रुपयांचा भाव हिख्या मिरचीला मिळत आहे.
  • पुढील काही दिवसात दरामध्ये वाढ होण्याचे उत्पादक शेतकऱ्यांना अपेक्षा आहे.

इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment