मागणी घटल्याने हिरव्या मिरचीचे भाव घसरले; वाचा काय मिळतोय मिरचीला दर…Mirchi Market Rate 2025

Mirchi Market Rate 2025 परराज्यासह विदेशात हिरव्या मिरचीची मागणी घटल्याने भाव घसरलेआहेत. सुरुवातीला बारा हजार रुपये प्रतिक्विंटल दराने विकली जाणारी मिरची सध्या 4000 पर्यंत आली आहे. यामुळे छत्रपती संभाजी नगर जिल्ह्याच्या सिल्लोड तालुक्यातील मिरची उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहे. तालुक्यात सध्या दररोज सुमारे 500 टन मिरचीची आवक होत आहे.

Mirchi Market Rate 2025

Mirchi Market Rate 2025 सिल्लोड तालुक्यात दरवर्षी उन्हाळी मिरचीची मोठ्या संख्येने लागवड केली जाते. पावसाळ्याच्या तोंडी सदर मिरचीचे उत्पादन सुरू होते. येथील मिरची प्रसिद्ध असून, उच्च प्रतीचे असल्याने परराज्यसह विदेशातही निर्यात केली जाते. चांगला भाव मिळेल, या आशेवर यंदा मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी मिरची लागवड केली आहे.

शेतकऱ्यांसाठी परराज्यात शेतमाल वाहतुकीसाठी अनुदान योजना; मोठा दिलासा.. 

Mirchi Market Rate 2025 सध्या घडीला तालुक्यात दररोज 500 टन मिरचीची आवक होत आहे. मात्र, पावसामुळे मिरची ओली होत आहे. यामुळे या स्थितीत प्रक्रिया केल्याशिवाय तिची निर्यात होऊ शकत नाही.

WhatsApp Group Join Now

तसेच मिरचीवर काही प्रमाणात व्हायसरचा अटॅक झालेला आहे. किंवा बहुतेक तोडे संपत आल्याने मिरचीची प्रत घसरली आहे. यामुळे भाऊ घसरल्याचे बोलले जात आहे.

सुरुवातीला शेतकऱ्यांना 12000 रुपये प्रति क्विंटल दर हिरव्या मिरचीला मिळाला. मात्र, आता हा दर 4000 पर्यंत रुपयापर्यंत घसरला आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहे.

Mirchi Market Rate 2025 निर्यातीत अडथळे

सिल्लोडची उच्च प्रतीची हिरवी मिरची मुंबई बांद्रावरून जहाजाने आजही दुबईला निर्यात होत आहे. मात्र, पावसामुळे मिरची ओली होत असल्याने एक्सपोर्ट होण्यास अडथळे निर्माण झाले आहे.

WhatsApp Group Join Now

याशिवाय बांगलादेश, कर्नाटक, उत्तर प्रदेश, हरियाणा, बिहार या परराज्यात लोकलच्या मिरचीचे आगमन झाल्याने भाव कमी झाले आहे. तालुक्यात मिरची ही गोळेगाव, आमठाणा, शिवणा, पिंपळगाव, जाफराबाद, भोकरदन या भागातून मोठ्या प्रमाणात येते.

Mirchi Market Rate 2025 असा घसरला भाव (क्विंटलमध्ये)

मिरचीचा प्रकार15 जून पर्यंत भावनंतरचा भाव
पिका डोर मिरची 5 हजार रुपये2500 रुपये
बळीराम5 हजार रुपये1,200 रुपये
तेजा फोर12 हजार रुपये 3,500 ते 4 हजार रुपये
शिमला5 हजार रुपये3 हजार रुपये
तलवार10 हजार रुपये4 हजार रुपये
ज्वेलरी 5 हजार रुपये3 हजार रुपये
आरमार10 हजार रुपये3,500 रुपये

नुकत्याच झालेल्या युद्धाचा परिणाम सर्वच बाजारपेठेवर झाला होता. आता ते देश-विदेशात व परराज्यात येत्या आठ दिवसात मिरचीची मागणी वाढेल. परिणामी काही प्रमाणात का होईना भाव वाढतील, असा अंदाज आहे. -राजू काळे, व्यापारी, शिवना.”

इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment