Mirchi Lagwad 2025 मिरची मध्ये नवनवीन सुधारित वाण आणि लागवडीचे तंत्रज्ञान यामुळे उत्पादकता वाढत आहे. मिरचीमध्ये आणि क जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात आहे तसेच फॉस्फरस आणि चुना यांचे प्रमाणही चांगले आहे. मिरचीमध्ये ढोबळी किंवा भाजीच्या मिरची पेक्षा तिखटपणा जास्त असतो. तिखटपणा हा कॅप्सिसिंन द्रव्यामुळे तर लाल रंग कॅप्सिसिंन या रंगकणामुळे येतो. मिरचीचा उपयोग मसाल्यांमध्ये भाजी, आमटी, लोणचे इ. पदार्थातून चवीसाठी केला जातो.

सुधारित जाती
मिरची पिकांमध्ये अनेक नवनवीन सुधारित वाण विकसित केले आहेत महात्मा फुले कृषी विद्यापीठाने मिरचीच्या मुसळवाडी सिलेक्शन, ॲग्रीरेखा, फुले साई, फुले ज्योती, फुले मुक्ता, फुले सूर्यमुखी या जाती विकसित केल्या आहेत, या जाती उत्पन्नात तसेच गुणवत्तेस चांगले आहेत.
ओतुर बाजारात कांद्याच्या 10 हजार पिशवींची आवक; कसा मिळाला दर?
Mirchi Lagwad 2025 अग्निरेखा
ही जात दोंडाईचा आणि ज्वाला यांच्या संक्रांतून निवड पद्धतीने तयार केली आहे. मध्यम उंचीची असतात. उन्हाळी आणि खरीप हंगामात लागवडीसाठी उपयुक्त अशी जात आहे. तसेच हिरव्या फळांसाठी लागवडीची शिफारस करण्यात आली आहे. वाळलेल्या लाल मिरचीचा उतारा कमी मिळतो. हिरव्या मिरचीचा रंग पोपटी रंगाचा आहे. हिरव्या मिरचीचे 100 ते १२० क्विंटल उत्पन्न मिळते आणि वाळलेल्या मिरचीचे हेक्टरी उत्पन्न 20 ते 25 क्विंटल मिळते.

Mirchi Lagwad 2025 फुले ज्योती
फळे घोसात लागतात आणि एका घोसात सरासरी चार-पाच फळे असतात फळांची लांबी सहा ते सात सेमी असते फळांचा रंग हिरवा असून पिकल्यानंतर लाल होतो हिरव्या मिरचीचे सरासरी हेक्टरी उत्पादन 180 ते 125 क्विंटल मिळते ही जात भुरी रोगाला कमी बळी पडते पश्चिम महाराष्ट्रात खरीप हंगामासाठी शिफारस करण्यात आली आहे.
Mirchi Lagwad 2025 फुले सई
या जातीची पश्चिम महाराष्ट्रातील कोरडवाहू क्षेत्रात लागवडीसाठी शिफारस करण्यात आली आहे. ही जात पंत c 1 आणि कमंडलू या दोन वाणांच्या संक्रांतून निवड पद्धतीने विकसित केली आहे. झाडे मध्यम उंचीची असतात. कोरडवाहू क्षेत्रात 13 ते 16 क्विंटल प्रति हेक्टरी वाळलेल्या मिरचीचे उत्पादन येते.
Mirchi Lagwad 2025 जमीन आणि हवामान
मध्यम ते काळी आणि पाण्याच्या उत्तम निचरा होणारी जमीन मिरची पिकास योग्य असते. हलक्या जमिनीत योग्य प्रमाणात खत घातल्यास चांगले पीक येऊ शकते. उष्ण आणि दमट हवामानात मिरची पिकाची वाढ जोमदार होते व उत्पादन चांगले मिळते परंतु हिवाळी हंगामात 20 ते 25 अंश सेल्सियस पेक्षा कमी तापमाना असल्यामुळे मिरची पिकाची वाढ चांगली होत नाही आणि त्यामुळे फुलधारणा व फळधारणा कमी प्रमाणात होते.
लागवडीचा हंगाम
Mirchi Lagwad 2025 खरीप हंगामामध्ये बियांची पेरणी मे महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून जून अखेरपर्यंत करतात.
बियाण्याचे प्रमाण
Mirchi Lagwad 2025 साधारणपणे हेक्टरी 1.0 ते 1.25 किलो बी पुरेसे होते. बियाणांची पेरणी करण्यापूर्वी प्रति किलो बियाण्यास 2 ते 3 ग्रॅम चोळावे.
रोपवाटिका
Mirchi Lagwad 2025 मिरचीच्या लागवडीचे यश चांगला जोमदार रोपावर अवलंबून असते रोपे तयार करण्यासाठी 3 * 2 मीटर लांब रुंदीचे आणि 20 सेंटीमीटर उंचीचे गादी वाफे तयार करावेत. प्रत्येकी प्रत्येक गादी वाफेवर चांगले कुजलेले 2 घमेले शेणखत, 30 ते 40 ग्रॅम डायथेन एम 45 बुरशीनाशक तसेच फोरेट 10 टक्के दाणेदार कीटकनाशक 15 ग्रॅम प्रत्येकी वाफ्यात टाकावे. आणि मिसळून घ्यावे वाफेच्या रुंदीला समांतर दर 10 सेंटिमीटर अंतरावर खुरप्याने दोन ते तीन सेमी खोल ओळी कराव्यात या ओळीत बियाणांची पातळ पेरणी करावी व बी मातीने झाकावे आणि हलके पाणी द्यावे. उगवण झाल्यावर पाच ते सहा दिवसांनी रोपवाटिकेस पाणी द्यावे.
बी पेरल्यानंतर वीस ते पंचवीस दिवसांनी रोपांच्या वाढीसाठी प्रत्येक वाफ्यात 50 ग्रॅम युरिया द्यावा परंतु जास्त प्रमाणात युरिया खताचा वापर टाळावा. त्यामुळे रोपे उंच वाढतात आणि लुसलुशीत राहतात. त्यामुळे रोपांची लागवड केल्यानंतर रोपे मरण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे योग्य प्रमाणात वापर फायद्याचे ठरते.
सर्वसाधारणपणे बियाण्यांची पेरणी केल्यापासून ४० ते ५० दिवसांनी रोपे लागवडीस तयार होतात. रोपवाटिकेत रोपे निरोगी ठेवणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यासाठी रोपे उगवून आल्यापासून 10 ते 15 दिवसांनी प्रत्येक वाफेस 25 ते 30 ग्रॅम थिमेट किंवा फोरेट हे औषध दोन ओळीच्या मधून द्यावे रोपे 3 ते 4 आठवड्यांची असताना एन्डोसल्फान 35 ec 15 मिली आणि डायथेन एम 45 (20 ते 25 ग्रॅम) 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. त्यामुळे फुल किडे तुडतुडे आणि ओळी यांचे नियंत्रण होऊन बोकड्या पर्णगुच्छ या रोगांपासून संरक्षण होते.
Mirchi Lagwad 2025 रोपांची लागवड
मिरची पिकाची लागवड सरी वरंब्यावर करतात. उंच आणि पसरट वाढणाऱ्या जातीची वाहनांची लागवड 75 बाय 60 किंवा 60 बाय 60 सेंटीमीटर अंतरावर तर बुटक्या जातीची लागवड 60 बाय 45 सेंटीमीटर अंतरावर करावी.
काळ्या कसदार भारी जमिनीमध्ये लागवडीचे अंतर जास्त ठेवावे, तसेच रोपांची लागवड करताना जास्त लांब असलेली मुळे खुरप्याने आणि तोडावी किंवा जास्त उंचीचे रोपे असल्यास रोपाचा शेंडा कट करून लागवडीसाठी वापरावी.
त्याचप्रमाणे लागवडीपूर्वी रोपे विशेषतः पानाचा भाग 5 मिनिटे 10 ग्रॅम प्रोफेनोफोस + 25 ग्रॅम, डायथेन एम 45+30 ग्रॅम पाण्यात विरघळणारे गंधक 10 लिटर पाण्यात मिसळावे आणि या मिश्रणात रोपे बुडवून काढावीत आणि लागवड करावी.
खत व्यवस्थापन
लागवडीसाठी वाफे तयार करण्यापूर्वी 20 ते 25 टन चांगले कुजलेले शेणखत प्रती हेक्टरी जमिनीत मिसळावे. मिरची पिकासाठी 100:50:50 किलो नत्र:स्फुरद:पालाश प्रतिहेक्टरी द्यावे. आणि अर्ध नत्राचा हप्ता लागवडीनंतर 4 ते 6 आठवड्याने म्हणजे फुल आणि फळधारणेच्या वेळी द्यावा खतांची मात्रा दिल्यानंतर ताबडतोब पाणी द्यावे.
Mirchi Lagwad 2025 आंतरमशागत
आवश्यकतेनुसार खुरपणी करून पीक स्वच्छ ठेवावे जमिनीत हवा खेळती राहील याची काळजी घ्यावी फुले येण्याच्या सुमारास झाडांना भर द्यावी म्हणजे झाडे कोलमडणार नाहीत.
पाणी व्यवस्थापन
मिरची पिकाला गरजेनुसार पाणी देणे जरुरीचे असते. पाणी जास्त किंवा कमी झाल्यास फुलांची गळ होते. जमिनीचा प्रकार पाऊसमान आणि तापमान विचारात घेऊन पाण्याच्या पाळ्या ठरवाव्यात.
जमिनीच्या मगदूरानुसार व हंगामानुसार पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. पावसाळ्यात गरजेप्रमाणे 15 दिवसांच्या अंतराने आणि उन्हाळ्यात 5 ते 6 दिवसांच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.
झाडे फुलावर असताना पाण्याचा ताण पडल्यास फुले आणि फळ गळण्याचा धोका असतो. म्हणून या कालावधीत पाण्याचा ताण पडू देऊ नये. तसेच गरजेनुसार पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.
काढणी आणि उत्पादन
पूर्ण वाढलेल्या हिरव्या फळांची तोडणी देठासह दर 10 ते 15 दिवसाच्या अंतराने करावी. हिरव्या मिरचीची तोडणी लागवडीपासून 60 ते 70 दिवसांनी सुरू होते आणि पुढे 3 ते 4 महिने तोड सुरू राहतात सर्वसाधारणपणे 8 ते 10 तोडे मिळतात.
पीक संरक्षण
मिरची पिकाच्या चांगल्या आणि अधिक उत्पादनासाठी मिरची लागवडीपासून ते फळाच्या शेवटच्या तोडणीपर्यंत सर्व अवस्थांमध्ये पीक संरक्षण करणे गरजेचे आहे. कारण या पिकावर अनेक रोग पिढींचा प्रादुर्भाव जाणवतो आणि त्यांचा वेळीच बंदोबस्त न केल्यास सर्व पीक हातचे जाण्याचा धोका असतो. म्हणून शेतकरी बंधूंनी जागरूक राहून पीक संरक्षणासाठी सर्व उपाययोजना वेळीच कराव्यात.
मिरची पिकावर प्रामुख्याने फुल किडे, कोळी, फळे पोखरणारी अळी या किडींचा प्रादुर्भाव होतो. फुल किडे हे पानाच्या खालच्या बाजूस राहतात. आणि पानातून रस शोषून घेतात. त्यामुळे पानाच्या कडा वरील बाजूस वळतात. पाने लहान होतात.
यालाच बोकड्या किंवा चुरडा मुरडा म्हणतात. या किडीचे प्रमाण कोरड्या हवामानात जास्त आढळते. कोळी ही कीड सुद्धा पानातील रस शोषून घेते. त्यामुळे पानाच्या कडा खालील बाजूस वळतात. देठ लांब होतात आणि पाने लहान होतात. चुरडा मुरडा होण्यास कोळी ही कीड सुद्धा कारणीभूत ठरते. या किडीचा प्रादुर्भाव कोरड्या हवामानात जास्त आढळतो. फळे पोखरणाऱ्या किडीची अळी फळाच्या देठाजवळील भाग खाते, त्यामुळे फळे गळून पडतात. या सर्व प्रकारच्या किडीमुळे 30 ते 30 टक्के पर्यंत नुकसान होऊ शकते.
वरील सर्व किडींच्या नियंत्रणासाठी कीड प्रतिकारक जातीची लागवड करावी. तसेच बियाण्यास कार्बोसल्फान 30 ग्रॅम + ट्रायकोडर्मा 5 ग्रॅम प्रति किलो प्रमाणे बीज प्रक्रिया करावी. बीज प्रक्रिया केली नसल्यास वाफ्यात (2 बाय 1 मी.) रोपे उगवल्यानंतर दोन ओळी कार्बोफ्युरॉन दाणेदार 20 ते 40 ग्रॅम किंवा फोरेट दाणेदार 20 ग्रॅम टाकावे किंवा डायमिथोएट 10 मिली किंवा मिथील डिमेटोन 10 मिली, 10 लिटर पाण्यातून फवारावे. लागवडीच्या वेळी रोपे इमिडाक्लोप्रिड 10 मिली किंवा कार्बोसल्फांन 30 मिली + ट्रायकोडर्मा 50 ग्रॅम + 10 लिटर पाणी या द्रवणात मुळे बुडवून नंतर लागवड करावी.
लागवडीनंतर दहा ते पंधरा दिवसांनी 50 ग्रॅम + दहा लिटर पाणी या द्रवणात मुळे बुडवून नंतर लागवड करावी.लागवडीनंतर दहा ते पंधरा दिवसांनी निंबोळी पेंड हेक्टरी 400-500 किलो या प्रमाणात टाकावी. रोपाच्या पुनर लागवडीनंतर पहिली फवारणी मिथिल डिमॅटोन किंवा मेट्यासिस्टाक्स 10 ते 15 मिली किंवा सायपरमेथ्रीन 4 मिली 10 लिटर पाण्यातून फवारणी करावी. फवारणीसाठी एकच कीटकनाशक न वापरता आलटून पालटून कीटकनाशके वापरावे.
मिरची वरील महत्त्वाचे रोग म्हणजे फळकुज, फांद्या वाळणे, भुरी आणि लिफ कर्ल हे होय.
फळकुज आणि फांद्या वाळणे या रोगाच्या पादुर्भावामुळे हिरव्या किंवा लाल मिरची फळावर आणि पानावर वर्तुळाकार खोलगट डाग दिसतात. दमट हवेत रोगाचे जंतू वेगाने वाढतात. आणि फळांवर काळपट चट्टे दिसतात. अशी फळे कुजतात, फांद्या वाळणे या रोगाची सुरुवात शेंड्यांकडून होते.
प्रथम शेंडे मरतात रोगाचा प्रादुर्भाव जास्त झाल्यास झाडे सुकून वाळतात. तसेच पानांवर आणि फांद्यांवर काळे ठिपके दिसतात. हे रोग कोलेटोट्रीकम या बुरशीमुळे होतात. या रोगाची लक्षणे दिसतात. शेंडे खुडून त्याचा नाश करावा. तसेच डायथेन एम-45 किंवा ब्लायटॉक्स यापैकी एक 25 ते 30 ग्रॅम, 10 लिटर पाण्यात मिसळून रोग दिसताच दर 15 दिवसांनी फवारावे. साधारण 3 4 फवारण्या कराव्यात.
“अशाप्रकारे मिरची पिकाची रोपवाटिकेपासून ते पीक काढणीपर्यंत योग्य प्रकारे काळजी घेतल्यास उत्पादन चांगले मिळून चांगला फायदा शेतकरी बंधूंना निश्चितच होईल.”
इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |