Milk Pumpkin Cultivation Technology 2025 उन्हाळ्यात भाज्यांची एकूण आवक कमी असल्यामुळे दुधीभोपळ्याला चांगली मागणी असते. व्यापारी दृष्ट्या हे महत्त्वाचे भाजीपाला पीक आहे. दुधी भोपळा लागवड वर्षभर करता येते लागवडीसाठी सोपी वाहतुकीला सोपी उत्पादनाला भरपूर कमी भांडवलात येऊ शकणारी व टिकाऊ अशी दुधी भोपळ्याची भाजी होणारे दुधी हलवा, भोपळ्यात पिष्टमय पदार्थ व खनिजे पुरेशा प्रमाणात असतात. दुधी भोपळा थंड असून त्यात सारक गुणधर्म असल्यामुळे पचनास हलका असतो अलीकडच्या वैद्यकीय संशोधनानुसार दुधीभोपळा हा हृदयरोग असणारा व्यक्तींसाठी संजीवनी ठरला आहे.

Milk Pumpkin Cultivation Technology 2025 हवामान
खरीप आणि उन्हाळी हंगामा दुधी भोपळ्याचे भरपूर उत्पादन मिळते या पिकाला उष्ण व दमट हवामान मानवते तीव्र थंडी या पिकाला अपायकारक असते ढगाळ हवामान व जास्त पावसामुळे रोगांचा प्रादुर्भाव जास्त होतो.
क्षारपिड जमीन सुधारण्यासाठी करा जमिनीतील पाण्याचा निचरा;
जमीन
विविध प्रकारच्या जमिनीत दुधी भोपळ्याची लागवड करता येते रेताळ ते मध्यम वालुकामय किंवा उत्तम निचऱ्याच्या भारी सुपीक जमिनीतही हे पीक चांगले येते सेंद्रिय खत युक्त हलक्या जमिनीतून तसेच सामू 5.5 ते 7 असणाऱ्या जमिनीत या पिकाची उत्तम वाढ होते.

Milk Pumpkin Cultivation Technology 2025 पूर्व मशागत
जमिनीची मध्यम खोल नांगरट करावी जमीन तापू द्यावी कुळव्याच्या आडव्या उभ्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी. जमीन मशागतीच्या वेळी हेक्टरी 25 ते 30 टन चांगले कुजलेले शेणखत शेतात सारखे वापरावे, सूत्र कृमींचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी निंबोळी पेंड हेक्टरी 450 ते 900किलो पीक लावणे अगोदर जमिनीत मिसळावी विकास झेंडू लावल्यामुळे सुद्धा सूत्रकृमींचा बंदोबस्त होतो.
सुधारित जाती
सम्राट: महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथील निवड पद्धतीने विकसित करून प्रसारित केलेला आहे. या जातीची फळे दंडगोलाकार असून फळांची लांबी 30 ते 40 सेंटीमीटर असते. फळांचा रंग हिरवा असून त्यावर बारीक लव असते. फळे बॉक्स पॅकिंग व वाहतुकीसाठी सोयीस्कर आहेत. फळांचा तोडा लागवडीनंतर 60 दिवसांनी सुरू होतो. वेलीचे आयुष्यमान सरासरी 150 ते 160 दिवसांचे असते. लागवड जमिनीवर तसेच मंडपावर वेली पसरवून करता येते. प्रती हेक्टरी 400 क्विंटल पर्यंत उत्पादन मिळू शकते.
पुसा नवीन: ही लवकर येणारी जात असून या जातीच्या फळांची लांबी 25 ते 30 सेंटीमीटर आणि व्यास 5 ते 6 सेंटीमीटर असतो. सरासरी वजन 700 ते 900 ग्रॅम पर्यंत असते, या जातीचे हेक्टरी 150 ते 170 क्विंटल उत्पन्न मिळते.
अर्का बहार: भारतीय उद्यानविद्या संशोधन केंद्र बेंगलोर येथून ही जात प्रसारित केली आहे. फळाचे सरासरी वजन एक किलो असून रंग फिकट हिरवा असतो. हेक्टरी सरासरी 400 ते 500 क्विंटल उत्पादन मिळते.
पुसा मेघदूत: हा संकरित वाण असून फळे लांब व फिकट हिरव्या रंगाची असतात हेक्टरी 300 क्विंटल उत्पादन मिळते भारतीय कृषी अनुसंधान परिषदेने प्रसारित केलेला हा पुसा संदेश, पुसा समृद्धी, पुसा संतोषी आणि समर प्रॉलिफिक राऊंड हे वाण विकसित झाले आहेत. भारतीय भाजीपाला संशोधन केंद्र वाराणसी येथून काशी बहार व काशी गंगा हे वाण विकसित झाले आहे.

Milk Pumpkin Cultivation Technology 2025 लागवड पद्धत:
दुधी भोपळ्याची मंडप पद्धतीने लागवड करताना 3*1 मी. अंतरावर लागवड करावी व जमिनीवर लागवड करण्यासाठी 2.5*1.0 मी. अंतरावर आळे तयार करावेत. प्रत्येक आळ्यात 5 ते 6 किलो शेणखत टाकावे प्रत्येक अळ्यात 3 ते 4 बिया लावाव्यात म्हणजे 1 हेक्टर लागवडीसाठी 2 ते 2.5 किलो बियाणे लागेल. बियाण्यांच्या लागवड करण्यापूर्वी बियाणे 24 ते 48 तास ओल्या कापडात गुंडाळून ठेवावे म्हणजे बियाणाची उगवण लवकर व जास्तीचे होते.
अन्यद्रव्य व्यवस्थापन
जमिनीत पूर्व मशागत करताना हेक्टरी 40 ते 50 टन शेणखत पसरावे हेक्टरी 100 किलो नत्र 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाश द्यावे. संपूर्ण स्फुरद व पालाश मात्रा आणि नत्राची अर्धी मात्रा लागवडीच्या वेळी द्यावी राहिलेली नत्राचे अर्धी मात्रा लागवडीनंतर 30 दिवसांनी द्यावी खते बांगडी पद्धतीने द्यावीत व पाणी द्यावे.
Milk Pumpkin Cultivation Technology 2025 सिंचन व्यवस्थापन
जमिनीच्या मगदूरानुसार आवश्यकतेनुसार उन्हाळ्यात 2 ते 3 दिवसांनी पाणी द्यावे ठिबक द्वारे रोज पाण्याची मात्रा वाढीच्या अवस्थेनुसार द्यावी.
अंतरमशागत
सुरुवातीला वाढीच्या काळात 2 ते 3 दिवसांनी खुरप्या कराव्यात व तणांचा बंदोबस्त करावा. अळी स्वच्छ ठेवावेत उत्कृष्ट प्रतीची फळे मिळवण्यासाठी दुधी भोपळ्याचे पीक मांडवावर वाढवावे उन्हाळ्यात वेल जास्त वाढत नसल्यामुळे जमिनीवर वाढवले तरी चालतात.
Milk Pumpkin Cultivation Technology 2025 पीक संरक्षण
अ).दुधी भोपळा वर येणाऱ्या रोगांचे नियंत्रण:
करपा: करपा रोग बुरशीजन्य रोग असून कोलेटोट्रिकम लॉजनेरियम या कवकामुळे होतो. फळावर प्रथम तांबूस जलासित्क ठिपके दिसतात व नंतर ते काळे पडतात उपाय म्हणून बोर्डो मिश्रणाची फवारणी करतात.
फळकुज: हा रोग बुरशीजन्य असून पिथियम या कवकामुळे होतो. रोगट भाग वाढत जातो व त्यावर काम कवकाची पांढरी कापसासारखी वाट दिसून येते नियंत्रणासाठी भोपळ्या खाली गवत पसरवणे आणि 0.8 बोर्डो मिश्रण फवारणी करावी.
केवडा: हा विषाणूजन्य रोग आहे केवडा रोगामुळे वेलीची पाने पिवळी पडून वाळतात व गळतात नियंत्रणासाठी रस शोषणाऱ्या किडींचा कीटकनाशके वापरून बंदोबस्त करावा.

ब).दुधी भोपळ्यावर येणाऱ्या किडींचे नियंत्रण:
तांबडा भुंगेरा: ही कीड पीक लहान असताना कोवळी पाने खाते सूर्योदयापूर्वी हे भुंगेरे वेचून मारतात कारण त्यावेळी ते सुस्त असतात पिकावर 0.65% हेक्टरी 20 ते 25 किलो ग्रॅम या प्रमाणात धुरळतात.
फळमाशी: कोवळ्या फळात अंडी घालते त्यातून निघालेल्या आळ्या फळ पोखरतात परिणामी फळे कुजतात फळमाशी लागलेली फळे गोळा करून नष्ट करतात, फळे लहान असताना पिकावर मॅलीथिऑन हे कीटकनाशक फवारतात. भाजीसाठी फळे तोडण्यापूर्वी 10 ते 15 दिवस कोणतेही विषारी कीटकनाशक पिकावर न फवारण्याची खबरदारी घेणे आवश्यक आहे.
काढणी: दुधी भोपळ्याची कोवळी पूर्ण वाढलेली फळे काढावीत साधारणपणे फळांवर लव असताना व फळास नखाने दाबल्यास वर्ण दिसतात. अशी फळे कोवळी असतात ती देठासहित वेलींवरून काढावीत काढणीला उशीर झाल्यास गर कोरडा होतो व बिया टणक होतात.
उत्पादन: दुधी भोपळ्याचे सरासरी उत्पादन 40 ते 50 टन प्रति हेक्टरी मिळते.
इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |