तुळस:
Medicinal Plants and their Uses 2025 तुळस ही चवीस तिखट पचल्यानंतरही तिखट उष्ण, हलकी, कोरडी, तीक्ष्ण शरीरातील प्रत्येक कणा पर्यंत तात्काळ पोहोचणारी असते.

तुळशीचा औषधीसाठी विशेषतः रसाच्या रूपात वापर करावयाचा असेल तेव्हा ताजीच पाणी वापरावेत व ही पाने तुळशीला मंजिरा येण्याआधी घ्यावी कारण मंजिरा येण्याआधी पानांमध्ये गुणांची तीव्रता जास्त असते.
कोयना धरण क्षेत्रात धुवाधार पाऊस; धरणाचे सहा वक्र दरवाजे उघडले!!
ताप आल्यास तुळशीची 30 40 पाने व काळी मिरी 4 तांबे पाण्यात उकळून 1 तांब्या उरवून रात्री गरम प्यायलास घाम येऊन ताप उतरतो.

उचकी लागल्यास एक चमचा तुळशीच्या रसात तेवढाच मध घेऊन चाटल्यास उचकी थांबते.
खोकल्यातून कफ पडताना त्रास होत असल्यास दिवसातून चार-पाच वेळा एक एक चमचा तुळस रस घेतल्यास कफ सुटतो.
नायटयासारख्या रोगात व कीटक दौंशावर तुळशीच्या पानांचा रस उपयोगी पडतो. पोटामध्ये वायू झाल्यास तुळशीचा रस तुपामध्ये घ्यावा.
Medicinal Plants and their Uses 2025 कोरफड:
लहान मुलांच्या कफावर कोरफड फार उत्तम गुण देते. कोरफडीची पाने विस्तवावर थोडे गरम करून त्यांचा अंगरस काढावा आणि त्यात किंचितसे मीठ टाकून लहान मुलास पिण्यास द्यावे.
कोरफडीचा एक ते दिड चमचा रस साखर घालून नियमित पाने घेतल्यास शरीरात चांगली शक्ती होते.
कोरफडी चा गर केसांना लावल्यास केसातील कोंडा नाहीसा होतो व केसांना चमक येते.

Medicinal Plants and their Uses 2025 हळद:
हळद एक उत्तम जंतू नाशक आहे. जखमे वर हळद दसपल्यावर रक्त येण्याचे थांबून पुढे पु होण्याची भीती राहत नाही.
हळद हृदयाचे कार्य सुरळीत राहण्याकरिता सुद्धा उपयोगशील आहे. हळदीमुळे रक्तामधील कोलेस्ट्रॉल व शरीरातील चरबी कमी होण्यास मदत होते त्याचबरोबर रक्तदाब नियंत्रित राहण्यास शक्य होते.
घसा दुखणे खोकला यासाठी गरम दूध व हळद पिणे किंवा गूळ हळद खाणे हे उपचार आपण नेहमी करतो याशिवाय खरूज किंवा ज्या इतर काही त्वचारोगात हळद आणि कडुनिंबाच्या पानांचे वाटून केलेले मिश्रण पोटात घेण्याने आणि वरून लावण्याने उपयोग होतो.
Medicinal Plants and their Uses 2025 आवळा:
थंडीत बाजारात सर्वत्र आवळा विकायला असतो चवीला तुरट आणि आंबट असणारे हे फळ विटामिन सी ने संपन्न आहे आवळ्याचे फळ, फुल, पान, बिया. झाडाची साल, मुळे सर्व काही उपयुक्त आहे.
आयुर्वेदात आयुष्य आणि ताकद वाढवणारा आवळा म्हणून खूपच उपयुक्त आहे. च्यवनप्राश, त्रिफळा चूर्ण ही आवळ्याची लोकप्रिय औषधे आहेत.
आवळा तुरट असल्याने पित्त, कफ, जुलाब या आजारांवर जालीम औषध आहे. त्यामुळे त्याला त्रिदोषनाशक असेही म्हटले जाते.
आवळ्याचे नियमित सेवन केल्याने पचनक्रिया सुरळीत राहते तसेच सर्दी, खोकला, स्वप्नदोष, इत्यादी. आजारांवर गुणकारी आहे.
आवळा हा दात मजबूत करणारा, नजरेत तेज आणणारा, केसांना काळेभोर आणि कोमल करणारा, रामबाण उपाय आहे.

Medicinal Plants and their Uses 2025 अश्वगंधा:
अश्वगंधाच्या मुळांचा उपयोग एक टॉनिक म्हणून महिला, पुरुष, वृद्ध, तसेच लहान मुले सगळ्यांसाठीच उपयोगी आहे.
मुळांचा उपयोग अनिद्रा अतिरक्तदाब, चक्कर, डोकेदुखी, रुदयरोप तसेच रक्तातील कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी अधिक फायदेशीर आहे.

अश्वगंधाच्या मुलांच्या चूर्णाचे सेवन 3 आठवडे ते 3 महिन्यांपर्यंत केल्याने शरीरात स्मृती, बळ, शक्ती, चैतन्य येण्यास मदत होते. ह्या चूर्णाचे सेवन केल्याने पचन शक्ती सुधारून शारीरिक कमजोरी नष्ट होते.
वजन वाढत नसेल तर यावर अश्वगंधाचे सेवन उपयुक्त ठरते अश्वगंधा आणि शतवरी सम प्रमाणात घेऊन एकत्रित करावे आणि रात्री झोपण्यापूर्वी किंवा व्यायाम केल्यानंतर एक चमचा हे चूर्ण खाऊन त्यावर गरम दूध प्यावे. एक महिना हा उपाय जण वाढण्यास सुरुवात होते.
इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |