Market Update 2025 केंद्र सरकारने येत्या जुलै महिन्यासाठी साखरेचा केवळ 22 लाख टन कोटा जाहीर केला आहे. हा कोटा तुलनेत कमी असूनही साखरेच्या बाजारभावात मोठी तेजी येण्याची शक्यता नसल्याचे जानकरांनी स्पष्ट केले आहे.

Market Update 2025 यावर्षी साखरेचे उत्पादन 18 टक्क्यांनी घटून फक्त 261 लाख टनांवर आले असले, तरीही जुलै महिन्यातील साखरेची मागणी तुलनेने कमी असते.
बियाणे, कीटकनाशके तपासणीसाठी तालुकास्तरावर समिती, तुम्हाला तक्रार करता येईल!
Market Update 2025 हवामानात होणाऱ्या बदलामुळे शेतीपेयांच्या मागणीत घट होत आणि परिणामी साखरेचा वापर कमी होतो. त्यामुळे कोटा कमी असूनही बाजार भाव स्थिर राहण्याची शक्यता आहे.

Market Update 2025 सध्या साखरेचे दर 4100 ते 4200 रुपये प्रतिक्विंटल दरम्यान आहे. काही व्यापारी जुलैच्या उत्तरार्धात तेजी आणण्याचा प्रयत्न करत असले तरी, वास्तविक मागणीच्या अभावामुळे ती फार काळ टिकण्याची शक्यता नाही.
दरम्यान हरभरा आणि ज्वारीच्या बाजारात सध्या तेजीचा कल आहे. खरीप हंगामाची सुरुवात आणि मागणी वाढ यामुळे या उत्पादनांचे दर चढले आहेत. मात्र, आषाढ महिन्यात उपवासाची सणवार असल्यामुळे साबुदाणा आणि भगर यांना मागणी असते, तरी यंदा लागवड क्षेत्र वाढल्याने उत्पादनही भरपूर झाले आहे. परिणामी या उत्पादनांमध्ये अपेक्षित तेजी दिसून येत नाही.
Market Update 2025 जालना येथील शेतमाल बाजारातील बाजारभाव (प्रतिक्विंटल)
गहू | 2400 ते 5000 |
ज्वारी | 2200 ते 4100 |
बाजरी | 2000 ते 2700 |
मका | 2000 ते 2350 |
तूर | 5000 ते 6700 |
हरभरा | 5300 ते 5740 |
मूग | 5700 ते 6350 |
उडीद | 4000 ते 6600 |
करडी | 7150 |
सूर्यफूल | 4800 |
सोयाबीन | 3400 ते 4300 |
पाम तेल | 12700 |
सूर्यफूल तेल | 14400 |
सरकी तेल | 13300 |
सोयाबीन तेल | 12400 |
इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |