Marathwada Water Storage 2025 मराठवाड्याचे सिंचन क्षेत्र वाढावे, यासाठी जलसंपदा विभागाच्या वतीने 30 वर्षांपासून 3 मोठे, 11 मध्यम, 19 लघु पाटबंधारे प्रकल्प आणि 29 उच्च पातळी कोल्हापुरी बंधाऱ्यांची कामे हाती घेण्यात आली आहे.

यातील काही बंधाऱ्यांची कामे 95 टक्के पूर्ण झाली आहेत, तर काही बंधाऱ्यांची कामे प्रगतीपथावर आहेत. बंधारे अस्तित्वात आल्यानंतर मराठवाड्यातील सिंचन क्षमतेत 1 लाख 61 हजार 878 हेक्टरने भर पडणार आहे.
राज्यात किती शेतकऱ्यांनी आपली जमीन आधार नंबरला जोडली, जाणून घेऊया सविस्तर;
मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातील मोठे, माध्यम आणि लघु सिंचन प्रकल्पांसाठी विशिष्ट मुदतीत निधी आला नाही. परिणामी, आज या प्रकल्पांच्या किंमतीत शेकडो पट वाढ झाली आहे. लेंडी प्रकल्पामुळे नांदेड जिल्ह्यातील 26948 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येईल.

Marathwada Water Storage 2025 छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील शिवणा प्रकल्प, पैठण तालुक्यातील ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजना, गंगापूर तालुक्यासाठी असलेल्या ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजना क्रमांक 3 तसेच देवगाव रंगारी, पूर्णा नदीवरील 10 साखळी बंधारे, इटेवाडी साठवण तलाव, सताळ पिंपरी साठवण तलाव इत्यादी प्रकल्पाची कामे हाती घेण्यात आली.
जालना जिल्ह्यातील बरबडा, हातवन लघु प्रकल्प, पाटोदा साठवण तलाव या प्रकल्पामुळे 4119 हेक्टर सिंचन वाढले वाढेल. बीड जिल्ह्यात कृष्णा मराठवाडा उपसा सिंचन योजनेमुळे आष्टी तालुक्यातील 8147 हेक्टर जमीन सिंचनाखाली येईल. सिंधफना प्रकल्पाची उंची वाढविण्याचे काम जलसंपदा विभागाकडून केले जात आहे.
Marathwada Water Storage 2025 परभणी जिल्ह्याच्या सिंचनक्षमतेत 13 हजार 176 हेक्टरची भर घालणाऱ्या ममदापूर या उच्च पातळी बंधाऱ्याचे काम सुरू आहे. नांदेड जिल्ह्यात 2 मोठे, 1 मध्यम प्रकल्पाचे काम सुरू आहे. या प्रकल्पामुळे 1 लाख 1 हजार 132 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. हिंगोली जिल्ह्यात 7 लघु तलावांची कामे सुरू आहेत. धाराशिव जिल्ह्यात कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाचे काम सुरू आहे.
Marathwada Water Storage 2025! 29 कोल्हापुरी बंधाऱ्यांची कामे प्रगतीपथावर
- मराठवाड्यातील विविध नद्यांवर 29 कोल्हापुरी बंधारे बांधण्याची कामे हाती घेण्यात आली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पूर्णा नदीवर 10 साखळी बंधारे बांधण्यास शासनाने मंजुरी दिली.
- बीड जिल्ह्यातील तिरू नदीवर 7 बंधारे आणि मानार नदीवर 8 कोल्हापुरी बंधारे बांधण्यात येत आहे. तावरजा नदीवर 4 कोल्हापुरी बंधाऱ्यांची कामे सुरू आहे.
इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |