राज्यात पुढील दोन दिवस या भागात मेघर्जनेसह पाऊस व गारपीटीची शक्यता! Mansoon 2025

Mansoon 2025 मुंबई : उत्तर मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र व मराठवाड्यातील काही ठिकाणी पावसासह गारपीटीची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

Mansoon 2025

त्यानुसार बुधवारी पुणे, सातारा, बीड, जळगाव, अहिल्यानगर जिल्ह्यांसह आसपासच्या परिसराला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

हवामान आधारित फळ पिक विमा योजनेतही बदल; आता ‘या’ शेतकऱ्यांनाच मिळणार नुकसान भरपाई!

मुंबई सह कोकणात 6 व 7 मे तर मराठवाड्यात 7 व 8 मे रोजी अवकाळीच्या वातावरणाची शक्यता वाढली आहे, असे हवामान विभागाने सांगितले आहे.

WhatsApp Group Join Now

कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात दिनांक 6 ते 9 मे या कालावधी दरम्यान 30 ते 40 किमी प्रति ताशी वेगाचा सोसाट्याचा वारा, विजांचा लखलखाट व मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्‍यता आहे. असे कुडाळ तालुक्यातील मुळदे येथील ग्रामीण कृषी महोत्सव केंद्राने जाहीर केले आहे.

वातावरणाच्या ट्रोपो स्पीअर या स्थानाच्या खालील व वरील पातळीमध्ये पाकिस्तान व लगतच्या पंजाब व वायव्य राजस्थान वरती पश्चिम विक्षोभीय वाऱ्यापासून एक चक्रीय अभिसरण निर्माण झालेले आहे.

आग्नेय मध्य प्रदेश पासून ते मराठवाडा, तेलंगणा व दक्षिण मध्य महाराष्ट्र ओलांडून दक्षिण कर्नाटकच्या अंतर्गत भागापर्यंत हवेच्या कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला आहे.

Mansoon 2025 शेतकऱ्यांना आवाहन

काढणी केलेली भात व भुईमूग पिके सुरक्षित ठिकाणी ठेवावेत, आंब्याची काढणी 85 ते 20 टक्के पक्वतेला लवकरात लवकर करावी बागेत पडलेल्या काजू बियांची वेचणी करून बिया सुरक्षित ठिकाणी वाळण्यास ठेवाव्यात.

WhatsApp Group Join Now

Mansoon 2025 मान्सून कधी येणार?

13 मे दरम्यान मान्सून दक्षिण अंदाज अंदमान समुद्र, बंगालच्या उपसागरातील आग्नेय भागात आणि निकोबार बेटांवर पुढे सरकण्याची शक्यता आहे, अशी माहिती हवामान तज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली.

इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment