‘मांजरा’तील पाणी उन्हाळी पिकांना वरदान! ‘इतक्या’ हेक्टर क्षेत्रावर झाले सिंचन वाचा सविस्तर; Manjara Dam 2025

Manjara Dam 2025 लातूर येथील मांजरा प्रकल्पात सद्य:स्थितीत 66.32 दलघमी जिवंत पाणीसाठा असून मागील वर्षीच्या तुलनेत कितीतरी पटीने पाणी अधिक आहे. त्यामुळे यांना शेतीच्या पाण्याची ही सोय झाली आहे.

Manjara Dam 2025

उन्हाळी पिकासाठी आत्तापर्यंत पहिली फेरी झाली असून दुसरी फेरी सुरू आहे. या दोन फेऱ्यांमध्ये 34 दलघमी पाणी शेतीला दिले आहे. एका दलघमीला 120 हेक्टर जमीन भिजण्या अपेक्षित आहे. त्यानुसार 51 दलघमीतून 6120 हेक्टर क्षेत्र भिजणार आहे.

धाराशिव ते पुणे बाजारात कांद्याला काय दर मिळतोय? वाचा आजचे बाजार भाव;

मांजरा प्रकल्पामध्ये गेल्या पावसाळ्यामध्ये शंभर टक्के पाणीसाठा झाला होता. त्यामुळे रब्बी पिकाला हे पाणी सोडण्यात आले होते. मांजरा प्रकल्पाच्या उजव्या आणि डाव्या कालव्यातून रब्बी पिकासाठी 12 दलघमी पाणी देण्यात आले होते. आता उन्हाळी पिकासाठी पहिली फेरी पूर्ण झालेली आहे.

WhatsApp Group Join Now

Manjara Dam 2025 ‘मे’ महिन्यात तिसऱ्या रोटेशन

  1. मांजरा प्रकल्पाच्या उजव्या आणि डाव्या कालव्यातून दुसरी फेरी पाण्याची शेतीसाठी सुरू आहे.
  2. आता तिसरी फेरी मे महिन्यामध्ये सुरू होईल. तिसऱ्या फेरीत पाणी शेतीला सोडले जाणार आहे.

37 प्रकल्पात 66.32 दलघमी

सध्या स्थितीत मांजरा प्रकल्पात 66.322 दलघमी जिवंत पाणीसाठा आहे. मागील वर्षी या तारखे मध्ये फक्त 9.409 दलघमी जिवंत पाणी होते. यावर्षी मुबलक पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे सिंचन आणि पिण्याला कमरता भासणार आहे.

मांजरा प्रकल्पामध्ये सद्यस्थितीत 37.48 टक्के जिवंत पाणीसाठा आहे. मागील वर्ष तारखेत 5.32 टक्के पाणीसाठा होता. त्यावर पावसाळा येईपर्यंत लातूर शहरासह विविध गावांचा पाणीपुरवठा होता. यंदा मात्र प्रकल्पात मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने रब्बी होणारी पिकांना वरदान ठरले आहे.

Manjara Dam 2025 अठरा हजार हेक्टर सिंचन क्षेत्र क्षमता

मांजरा प्रकल्पाच्या डाव्या आणि उजव्या कालव्या अंतर्गत 18 हजार 223 हेक्टर क्षेत्र सिंचन क्षमता आहे. उजव्या कालव्याचे क्षेत्र लातूर तालुक्यातील हरंगुटपर्यंत आहे.

तर डाव्या कालव्याचे क्षेत्र रेणापूर तालुक्यातील निवाडा फाट्यापर्यंत आहे. धनेगाव पासून लातूर आणि रेणापूर तालुक्यापर्यंतचे क्षेत्र या प्रकल्पामुळे ओलिताखाली आलेले आहे.

WhatsApp Group Join Now

Manjara Dam 2025 रोटेशन नुसार सोडले पाणी

पहिल्या फेरीत उजव्या कालव्यातून 8 आणि डाव्या कालव्यातून 9 असे 17 दलघमी पाणी सोडण्यात आले होते. सद्यस्थितीत दुसरी फेरी सुरू असून, दुसऱ्या फेरीतही 17 दलघमी पाणी सोडण्यात येणार आहे. याचे 20 दिवस रोटेशन सुरू राहणार आहे. उजव्या कालव्यातून 12 एप्रिल आणि डाव्या कालव्यातून 15 एप्रिल पर्यंत पाण्याचे रोटेशन होते.

इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment