पान वेलीचे एकात्मिक रोग व्यवस्थापन!! Management of Leaf Vine 2025

Management of Leaf Vine 2025 पानवेल हे सदाहरित बहुवार्षिक आहे. भारतात हे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. पानवेलीच्या पानांचा उपयोग मुख्यत्वे खाण्यासाठी केला जातो. या शिवाय पानांमध्ये काही औषधी गुणधर्मही आहेत.

Management of Leaf Vine 2025

Management of Leaf Vine 2025 पानामध्ये ब आणि क ही जीवनसत्वे असून मानवी मेंदू, हृदय आणि यकृत यास ते बलवर्धक ठरले आहे. एकदा लावलेले पीक 9 ते 15 वर्षे सतत उत्पन्न देत राहते. हे पीक महाराष्ट्रात बहुतांशी ठिकाणी शेवगा, शेवरी व पांगरा या वनस्पतींच्या खोडाच्या आधाराने वाढवणे जाते. यासाठी पाणमाळ्यात या वनस्पतींची ही जोपासना केली जाते. यामुळे शेतकऱ्यांच पानवेली बरोबरच अशा पिकांपासून नियमित ओला चारा, इंधन म्हणून लाकूड ही मिळत राहते.

खोडवा ऊस व्यवस्थापन!!

Management of Leaf Vine 2025 महाराष्ट्रात सुमारे 2300 क्षेत्रावर हे पीक घेतले जाते. भारतातून पानवेलींची निर्यात सुद्धा होते. त्यामुळे परदेशी चलन मिळवून देणारे हे पीक आहे. म्हणून याची लागवड व्यापारी तत्त्वावर केली जाते. पानवेल वाढणारी असल्याने त्यास नेहमी जमिनीत ओढावा राहण्यासाठी पाणी द्यावे लागते. तसेच पानमळ्यात सतत सावली ठेवावे लागते. जमिनीतील सतत असणारा ओलावा त्यामुळे टिकणारी आद्रता, दमट हवामान, अर्धवट सूर्यप्रकाश व हवा यामुळे पानवेलींची वाढ चांगली होते.

WhatsApp Group Join Now

तथापि असे वातावरण पानवेलींवरील विविध बुरशीजन्य रोग व किडींच्या वाढीस सुद्धा अनुकूल होते. यामुळे पाणवेल लागवड होणाऱ्या महाराष्ट्रातील बहुतांशी क्षेत्रातील पानवेल उत्पादनातील मुख्य अडथळा म्हणून रोग व कीड ही समस्या आहे.

मर रोग: Management of Leaf Vine 2025

हा बुरशीजन्य रोग असून फायटोप्थोरा रायझोकटोनिया स्केलरोशियम आणि फ्युजॅरियम या बुरशी त्यासाठी कारणीभूत असल्याचे आढळले आहे. याशिवाय बऱ्याच वेळा बुरशीसोबतच नियमित ओलावा असण्याऱ्या जमिनीत वाढणारे सूत्रकृमीसुद्धा रोगाच्या प्रादुर्भावास व वाढीस कारणीभूत ठरतात.

रोगाची लक्षणे:

रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर अगदी सुरुवातीला वेलीवरील शेंड्यांकडील पाने मलूल होतात. त्यांचा तजेलपणा कमी होतो पानांच्या कडा खालील बाजूस वाकतात वेळ साधारणतः पिवळी पडू लागते व कोवळे शेंडे सुद्धा मलूल होऊन सुकू लागतात तथापि बऱ्याचवेळा प्रादुर्भाव झालेनंतर जमिनीत छोट्या सूक्ष्म उपमुळांची वाढ थांबते. तसेच शेंड्याकडे एक दोन पेरांजवळ आधारासाठी तयार होणारी नख्यांसारखी मुळे तयार होत नाही. व शेंडा निराधार राहतो.

याशिवाय काही वेळा जमिनीच्या वरील वेलीची पाने व खोड यावर लक्षणे दिसत नाहीत. परंतु, शंकास्पद वाढणारी वेल उपटून पाहिली तर ती सहज उपटले जाते. व मुख्य मूळ व भोवतीचे उपमुळे व शाखीय मुळे काळपट तपकिरी होऊन मरायला झालेली दिसतात खोडाचा मधील भाग काळपट पडून खराब दिसतो. अशा प्रकारे प्रादुर्भाव झाल्यानंतर संपूर्ण वेल सुकुण मरून जाते.

WhatsApp Group Join Now

एकात्मिक नियंत्रण:

पावसाळ्यात हवेतील भरपूर आद्रता जमिनीतील अतिरिक्त ओलावा तसेच पावसाळ्यात किंवा पावसाळ्यानंतर पडणारी दीर्घ मुदतीची उघडीप, तापमान व दमटपणा यामुळे पावसाळ्यात आणि अशावेळी रोगाचे प्रमाण वाढते, रोगकारक बुरशीचा प्रसार वारा आणि पाण्यामार्फत ही होत असतो. त्यामुळे पाणमाळ्यातून न होणारा पाण्याचा निचरा व पाणी साचणे यामुळे ही रोगाचा प्रादुर्भाव वाढतो. म्हणून रोग नियंत्रणासाठी खबरदारीचा उपाय म्हणून जमिनीचा निचरा वाढवणे आहे.

पानवेलींच्या उतरतीच्यावेळी वेरी नाच झालेली इजा व ती टाळण्यासाठी खबरदारी नाव घेणे यामुळे ही रोगाचा प्रादुर्भाव आणि प्रसार वाढवण्याची शक्यता असते त्याविषयीची काळजी म्हणून उतरण योग्य हवामानातच करावी. त्यासाठी नेहमी हे काम करणाऱ्या कुशल मजुरांमार्फत पूर्ण करावे. उतरण करण्यापूर्वी वेलींवर 8 दिवस आधी कार्बेनडीझम 0.1% कॉपर ऑक्सिक्लोराईड बुरशीनाशकाची फवारणी करावी.

उतरणीवेळी त्यासाठी खणलेल्या चारीत निंबोळी किंवा करंजी पेंडीचा वापर करावा त्यासोबतच रोगाला प्रतिबंधक असे ट्रायकोडर्मा प्लस ही जैविक बुरशी हेक्टरी 7 किलो या प्रमाणात जमिनीत मिसळावी त्यानंतर पुन्हा दर 2 महिन्याच्या अंतराने ट्रायकोडर्मा + चा जमिनीत आवळणीसाठी हेक्टरी 5 किलो या प्रमाणात वर्षभर वापर करावा यामुळे मर रोगाचे प्रमाण वाढवण्याची शक्यता कमी होते.

उतरण्याच्या वेळी चरीमध्ये घालण्यासाठी शेणखत अथवा कंपोस्ट खतांचा वापर करू नये तथापि शेणखत / कंपोस्टखत पावसाळ्याच्या सुरुवातीला आणि नोव्हेंबरमध्ये अशा दोन हप्त्यात जमिनीत मिसळून द्यावेत ते कमीत कमी सहा महिने कुजलेले असावे.

मर रोगाच्या प्रादुर्भावामुळे बऱ्याचवेळा पानांवरही ठिपके पडून पाणकूज होत असते. त्याकरिता खास करून पावसाळ्यात जून ते सप्टेंबर 0.5% बोर्डोमिश्रण किंवा 0.25 % कॉपर ऑक्सिक्लोराईड फवारणी दर 15 दिवसांच्या अंतराने 7 ते 8 वेळा करावी.

अणुजीव करपा: Management of Leaf Vine 2025

हा रोग विशेषता पावसाळ्यात जून ते ऑक्टोबर जास्त जाणवतो कारण पावसाळ्यातील व इतर वेळी जमिनीत वाढणारी ओल व त्यामुळे वाढलेली आद्रता व हवेतील 25 ते 30 सेल्सिअस तापमान व दमटपणा हे घटक रोगवाढीस अनुकूल ठरतात. रोगाच्या प्रादुर्भावामुळे सुरुवातीला पानांच्या खालील बाजूस काळसर फिकट तपकिरी आणि त्या भोवती पाणीदार ठिपके 2 ते 3 दिवसात लगेच पानाच्या वरील बाजूसही दिसू लागतात. त्या भोवती पिवळसर वलय तयार होतो.

अशा ठिपक्यांचा मध्यभाग नंतर सुकून फाटू लागतो. दमट हवामात हे ठिपके वाढत जातात व 1 सेंटीमीटर आकाराचे होतात व पुढे एकमेकांत मिसळून पानावर पसरतात व संपूर्ण पान करपल्यासारखे होऊन पिवळे पडते व अकाली गळून पडते.

पावसाळी वातावरणात पानाच्या मागील भागांवर डिंकासारखा द्रव दिसू लागतो. यामध्ये अणुजीव (बॅक्टेरिया) असतात. बऱ्याचवेळा जमिनीलगतच्या पानांवर जास्त दिसतो. तीव्रता वाढण्यास देठावरसुद्धा आढळतो त्यामुळे काही प्रमाणात वेलींची मरही होते.

एकात्मिक नियंत्रण:

रोगास प्रतिबंध म्हणून पाणमाळ्यात स्वच्छता ठेवावी, त्यामध्ये रोगट पाने व वेल काढून जाळून टाकावेत. याशिवाय पानमळ्यात आवळण्यासाठी मुबलक प्रमाणात 1 टक्का बोर्डोमिश्रणचा वापर करावा.

प्रतिबंधक उपाय म्हणून वेलीच्या जमिनी लगतची पाणी जमिनीवर टेकणार नाहीत याची काळजी घ्यावी. व टेकलेली पाने फुटवे काढून वेल एक फुटापर्यंत मोकळी ठेवावी. पानमळ्यात पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी अशी काळजी घेतलेल्या क्षेत्रात रोग नियंत्रण चांगले झाल्याचे आढळले आहे. तरी सुद्धा रोगाचा प्रादुर्भाव दिसताच कॉपर ऑक्सिक्लोराईड 0.25% 2.5 ग्रॅम लिटर पाणी आणि 2.5 ग्रॅम स्टेप्टोसायक्लिन प्रति 10 लिटर पाणी या प्रमाणात एकत्रित फवारणी 20 दिवसांच्या अंतराने 2 ते 3 वेळा करावी.

करपा: Management of Leaf Vine 2025

हा रोग भारतात विविध चार प्रकारच्या बुरशीमुळे होतो. उन्हाळ्यात (एप्रिल-मे) होणाऱ्या वाळव्याचा पावसानंतर या रोगाचा प्रादुर्भाव सुरू होतो.

लक्षणे:

हा रोग पानांवर जास्त आढळतो तसेच बऱ्याच वेळा खोड आणि फुटव्यांवर सुद्धा आढळतो. हा रोगसुद्धा पावसाळी वातावरण (जुलै- सप्टेंबर) वाढतो. यामुळे पानांवर लहान आकाराचे काळपट डाग सुरुवातीला गोल असतात. ते खोडावरही दिसतात यामुळे कोरड्या वातावरणात खोडावरील साल यामुळे सुकते व फाटते ओलसर दमट हवामानात हे डाग पसरतात व संपूर्ण खोडावर दिसू लागतात. यामुळे खोड चुकू लागते. तसेच अशा ठिकाणी खोडावर भेगा पडतात.

पानांवरील डागाचे मध्यभाग तपकिरी काळपट व भोवती पिवळसर मोकळे वलय दिसते. हे डाग वाढून नंतर आकाराने मोठे होतात रोगग्रस्त भाग हळूहळू पातळ जीर्ण होऊन सुकू लागतो. पानांच्या कडांवर रोगाचा प्रादुर्भाव असेल तर कडा करपतात आणि अशी पाने नंतर अकाली गळतात.

एकात्मिक नियंत्रण:

प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पानमळ्याची स्वछता ठेवावी.

रोग दिसू लागताच व पुढे 0.5% बोर्डोमिश्रण किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड 0.25% किंवा डायथेन एम-45 0.25 % किंवा कवच 0.15% प्रत्येक 20 दिवसांच्या अंतराने 2 ते 3 वेळा फवारणी करावी.

स्टेप्टोसायक्लिन किंवा स्ट्रेप्टोमायसिन या प्रतिजैविकांचाही 2.5 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात वरील बुरशीनाशकांसोबत वापर केल्यास चांगले नियंत्रण मिळते.

इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment