तंत्र मका लागवडीचे!! Maize Cultivation 2025

Maize Cultivation 2025 मका पीक शेतऱ्यांच्या दृष्टीने सर्वात अधिक फायदेशीर ठरणारे तृणधान्य आहे.तसेच तीनही हंगामामध्ये मक्याची लागवड करता येत असल्यामुळे यावर कीड व रोगाचा प्रादुर्भाव देखील कमी प्रमाणात दिसून येतो.

Maize Cultivation 2025

Maize Cultivation 2025 त्यामुळे मका हे पीक व्यापारीदृष्ट्या फायदेशीर करायचे असल्यास आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून त्याची लागवड केल्यास शेतकऱ्यांना त्यापासून आर्थिक फायदा मोठ्या प्रमाणात मिळू शकतो.

फळझाडांबरोबर आता भाजीपाला पिकातही केले जातेय कलम, कसे होतात फायदे?

Maize Cultivation 2025 मका पिकाचे वैशिष्टय म्हणजे हे पीक पाण्याला व अन्नद्रव्यांच्या कमतरतेला संवेदनशील पीक आहे. त्यामुळे त्याला पाण्याचे व अन्नद्रव्ये कामरता दर्शक असे संबोधले जाते.

WhatsApp Group Join Now

तसेच वाढती लोकसंख्या व जनावरांना चारा उपलब्ध होण्यासाठी व प्रक्रिया उद्योगासाठी मका पिकाची बाजारात जास्त मागणी आहे. त्या अनुषंगाने मका पिकाची लागवड व अन्नद्रव्य कमतरतेची लक्षणे याविषयी थोडक्यात माहिती या लेखात घेऊ या.

जमीन: Maize Cultivation 2025

मका पिकासाठी मध्यम ते खोल, रेतीयुक्त उत्तम निचऱ्याची विशेषतः नदीकाठाची गाळाची जमीन फारच उत्तम असते हलक्या जमिनीमध्ये मका पिकाचे अपेक्षित उत्पादन मिळत नाही म्हणून माती परीक्षण करून काळजीपूर्वक जमीन निवडावी.

पूर्वमशागत: Maize Cultivation 2025

मका पिकाला एक खोल नांगरट करून 2-3 कुळवाच्या पाळ्या देऊन 20-25 गाड्या प्रति हेक्टरी शेणखत/ कंपोस्ट खत असल्यास शेणखत द्यावे. शेणखत/ कंपोस्ट खताची गरज नसते.

WhatsApp Group Join Now

उशिरा पक्व होणारे वाण (110 ते 120 दिवस)

संकरित वाण: पी.एच.एम.-1 सिडटेक-2324 बायो 968, एच.एम.-17

संमिश्र वाण: प्रभात शतक-9905

मध्यम कालावधीत पक्व होणारे वाण (100 ते 110 दिवस)

संकरित वाण: एच.एम.-8, एच.एम.-4, पी.एच.एम.-4, डी.एच.एम.-117 राजर्षी

संमिश्र वाण: करवीर, मांजरी, नवज्योत

लवकर पक्व होणारे वाण (90 ते 100 दिवस)

संकरित वाण: जे.एच. 3454 पुसा हायब्रीड-1 जे के 2492

संमिश्र वाण: पंचगंगा प्रकाश किरण.

अति लवकर तयार होणारे वाण (80-90 दिवस)

संकरित वाण: विवेक-9, विवेक-21 विवेक-27

संमिश्र वाण: विवेक- संतुल

पेरणी/लागवड: Maize Cultivation 2025

शिफारस केल्याप्रमाणे मक्याची पेरणी हि वेळेतच व्हायला हवी. कारण पेरणी वेळ निघून गेल्या नंतर दिवसाला 1 क्विंटल प्रति हेक्‍टरी उत्पादनात घट येते असे आढळून आले आहे. खरिपात जून ते जुलैचा दुसरा आठवडा यादरम्यान पेरणी करावी. रब्बीमध्ये 15 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर व उन्हाळी हंगामात जानेवारी ते फेब्रुवारी यादरम्यान पेरणी करावी.

पेरणी शक्यतो टोकण पद्धतीने करावी उशिरा व मध्यम कालावधीच्या वाणांसाठी पेरणीचे अंतर 75*20 सेमी तर कमी कालावधीच्या वाणांसाठी पेरणीचे अंतर 60*20 सेमी इतके ठेवावे. जेणेकरून हेक्टरी रोपांची संख्या अपेक्षित उत्पादनाच्या दृष्टीने योग्य रहावी. बऱ्याच ठिकाणी शेतकरी अतिशय कमी अंतरावर 45*10 सेमी लागवड करतात. त्याचा परिणाम पिकांची शाकीय वाढ खुंटते. तसेच त्याचा फुलोऱ्यावर देखील विपरीत परिणाम होतो. कणसांचा आकार आखूड होतो. त्यामुळे दाण्यांची संख्या कमी राहून उत्पादन घटते.

मका पिकावर दुबार पीक म्हणून मका हेच पीक घेऊ नये, त्यामुळे जमिनीचा पोत खराब होतो. मका पिकामध्ये उडीद, मूग, चवळी, सोयाबीन, भुईमूग, तुर, या पिकांची आंतरपीक म्हणून लागवड केली जाते.

बीजप्रक्रिया: Maize Cultivation 2025

मका पिकास प्रति किलो बियाण्यास 2 ते 2.5 ग्रॅम थायरम पेरणीपूर्वी लावावे. तसेच अझोटोबॅक्टर या जिवाणू संवर्धनाची 250 ग्रॅम/ 10 किलो बियाणे या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी.

खत व्यवस्थापन:

मका पिकाचे उत्पादन वाढवण्यासाठी संतुलित अन्नद्रव्यांचा वापर करणे गरजेचे आहे. पीक पोषणासाठी नत्र, स्फुरद व पालाश या मुख्य अन्नद्रव्यांसोबत दुय्यम तसेच सूक्ष्म अन्नद्रव्यांचा सेंद्रिय खतांचे सोबत समावेश करणे पिकांसाठी व जमिनीसाठी फायद्याचे ठरते. सध्या पीक पोषणात अन्नद्रव्यांच्या असंतुलित वापरामुळे एकापेक्षा अधिक अन्नद्रव्यांची कमतरतेची लक्षणे पिकात दिसून येत आहेत.

यासाठी माती परीक्षणावरून विद्यापीठाने शिफारस केल्याप्रमाणे खतांचे नियोजन करणे सोपे होते. मका पिकासाठी शिफारस केलेली खतांची मात्रा नत्र, स्फुरद, पालाश, झिंक सल्फेट अशी आहे. पेरणीच्या वेळी 40 किलो नत्र, 60 किलो स्फुरद, 40 किलो पालाश प्रति हेक्‍टरी मात्रा द्यावी. पेरणीच्या वेळी रासायनिक खते 5 ते 7 सेमी खोलवर आणि जमिनीत चांगले मिसळून घ्यावी. पेरणीनंतर 30 दिवसांनी 40 किलो नत्र तसेच 40 ते 45 दिवसांनी 40 किलो नत्र प्रति हेक्‍टरी द्यावे. जमिनीत झिंकची कमतरता असल्यास हेक्‍टरी 20 ते 25 किलो झिंक सल्फेट द्यावे.

अन्नद्रव्य कमतरतेची लक्षणे व उपाययोजना:

नत्र: झाडांची वाढ खुंटते व झाडे बुटकी राहतात. शिरांच्या कडेचा भाग पिवळा पडतो व पाने करपून जातात प्रथम परिपक्व झालेली पाने पिवळी पडतात आणि पाने खालच्या भागापासून वरच्या भागापर्यंत पिवळी दिसतात.

उपाययोजना: 150 किलो नत्र हे नत्राची शिफारस आहे. अर्धे नत्र 75 किलो/हेक्टर पेरतेवेळी व अर्धी नत्र मात्रा 75 किलो/हेक्टर एक महिन्यांनी द्यावी.

स्फुरद: मका पिकाच्या पानांचा कडा जांभळा रंग दिसतो. पानांची वाढ चांगली होत नाही.

उपाययोजना: शिफारसी प्रमाणे 75 किलो स्फुरद हे पेरतेवेळी द्यावे स्फुरदयुक्त खतांसोबत सेंद्रिय खते दिल्यास दोन्हींचाही कार्यक्षम वापर होतो.

पालाश: पालाशच्या कमतरतेमुळे मका पिकाची पाने लांबट आकाराची होतात व कमी पसरतात. पानांचे शेंडे करपतात.

उपाययोजना: मका पिकास पालाश प्रती हेक्टरी 75 किलो पेरणी वेळी द्यावे.

गंधक: गंधकाच्या कमतरतेमुळे पाने पिवळी पडतात व वाळतात, शिरांच्या आतील भाग पिवळा पडतो.

उपाययोजना: शिफारसी नुसार गंधक युक्त खाते वापरणे मका पिकास फायदेशीर ठरते.

अंतर मशागत:

मका पिकात एक महिन्यानंतर कोळपणी करणे आवश्यक्य असते. बैल कोळप्याने कोळपणी केल्यास तणांचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होईल व त्याबरोबर जमिनीत ओलावा टिकून राहण्यास मदत होईल. तसेच तन नियंत्रणासाठी हेक्टरी 2 ते 2.5 किलो पेरणी समताच जमिनीवर फवारावे आवश्यकतेनुसार खुरपणी करावी.

पाणी व्यवस्थापन:

मका हे पीक पाण्याला अतिशय संवेदनशील आहे. पेरणीनंतर सुरुवातीच्या 20 दिवसापर्यंतच्या कालावधीत पिकात जास्त पाणी व दलदलीची परिस्थिती असल्यास कोवळी रोपे पिवळी पडून त्याची मर होते. मका पिकास सरीच्या निम्म्या उंचीपर्यंतच पाणी द्यायला हवे, कारण जास्त पाणी दिले तर मूळ कुजण्याची प्रक्रिया सुरू होऊ शकते. म्हणून मका पिकास जास्त तसेच कमी पाणी देऊ नये. खरीपात पावसाचे पाणी जास्त झाल्यास शेतातून चर खोदून पाणी बाहेर काढावे.

पिकाच्या संवेदनशील अवस्थेनुसार वाढीची अवस्था (20-40 दिवस) फुलोरा अवस्था (40-60 दिवस) दाणे भरण्याची अवस्था (70 ते 80 दिवस) या वेळेस पाण्याची कमतरता पडू देऊ नये. रब्बी हंगामात 10 ते 12 दिवसांनी व खरीपात गरजेनुसार पाणी द्यावे.

पिक संरक्षण:

किड /रोगाचे नाव नियंत्रण
खोडकिडमका उगवणीनंतर 8 ते 10 दिवसांनी कार्बारिल 85% प्रवाही पाण्यात विरघळणारी पावडर हेक्टरी 1764 ग्रॅम किंवा डायमेथोएट 30% प्रवाही हेक्टरी 660 मिली यापैकी एकाची 500 ते 1000 लिटर पाण्यातून फवारणी करावी. अथवा फोरेट 10 % दाणेदार कीटकनाशक हेक्टरी 10 किलोग्रॅम प्रमाणे मातीत मिसळावे.
खोडमाशीखोडमाशीचा प्रादुर्भाव दिसून येताच डायमेथोएट 30% प्रवाही हेक्टरी 1155 मिली 500 ते 1000 लिटर पाण्यातून फवारणी करावी.
कणसे पोखरणारी अळीया किडीचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी पीक स्त्रीकेसर येण्याच्या अवस्थेत असताना शेतात ट्रायकोडर्मा चिलोणीस या परोपकारी कीटकाचे अंडीपुंज सोडावेत.
पर्ण करपाया रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतात डायथेन एम-45 0.25 टक्के 500 लिटर पाण्यातून करावी.

उत्पादन: Maize Cultivation 2025

अशाप्रकारे आधुनिक पद्धतीचा अवलंब करून लागवड केल्यास खरिपात हेक्टरी 70 ते 75 क्विंटल धान्य उत्पादन मिळते, तर रब्बी मध्ये 90 ते 95 क्विंटल उत्पादन मिळते. तसेच वाळलेला चारा धान्य उत्पादनाच्या दुप्पट मिळतो.

इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment