Maharashtra Weather Update 2025 पुणे उत्तरेकडून उष्ण वारे येण्यास सुरुवात झाल्यामुळे राज्यात किमान तापमानाच्या पाऱ्यात वाढ झाली आहे. मध्य महाराष्ट्रात जळगाव, नाशिक, सोलापूर सह विदर्भात अकोला, अमरावती, नागपूर, यवतमाळ आणि वर्धा तर मराठवाड्यात छत्रपती संभाजी नगर आणि परभणीने तापमानाची चाळिशी ओलांडली आहे.

राज्यात अकोला येथे 43.2 अंश सेल्सिअस सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. पुढील दोन ते तीन दिवसात राज्यातील कमाल तापमानामध्ये दोन ते तीन अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता हवामान शास्त्र विभागाने वर्तविली आहे.
उदगिर बाजारात सोयाबीन, हरभऱ्याच्या दरामध्ये आली तेजी…वाचा सविस्तर;
एप्रिल महिना सुरू होताच राज्यातील बहुतांश भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. काही भागात गारपीट देखील झाली. मध्य भारतापासून दक्षिणेपर्यंत अंतर्गत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला होता तसेच बंगालच्या उपसागरावरून बाष्पीयुक्त वारे येत असल्याने राज्यात पाऊस झाला.

Maharashtra Weather Update 2025 उष्णतेचा तडाखा
काही दिवसातील पावसामुळे असह्य उकाड्यापासून दिलासा मिळाला. मात्र आता कमी दाबाचा पट्टा ओसरला आहे आणि उत्तरेकडून उष्ण वारे येत आहेत.
हवेतील आद्रतेचे प्रमाण वाढले असल्यामुळे राज्यात उष्णतेची लाट पसरली आहे. किमान तापमानही दोन ते तीन अंशाने वाढले आहे. पुढील काही दिवस राज्यात उष्णतेचा तडाखा वाढणार असल्याचा इशारा हवामानशास्त्र विभागाने दिला.
पुणे | 39..2 |
जळगाव | 42.2 |
नाशिक | 40.2 |
सोलापूर | 41.4 |
छत्रपती संभाजी नगर | 40.2 |
परभणी | 40.7 |
अमरावती | 42.6 |
चंद्रपूर | 42.6 |
नागपूर | 42.2 |
वर्धा | 41.1 |
यवतमाळ | 42.4 |
Maharashtra Weather Update 2025 पुन्हा अवकाळीचे ढग
- 10 एप्रिल दरम्यान देशातील वातावरण पुन्हा बदल म्हणून अवकाळीच ढग दाटण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
- विजांचा कडकडाट, सोसाट्याचा वारा व वादळी हवामानासह हलका पाऊस हि होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली.
इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |