Maharashtra Weather Update 2025 पूर्वेकडून येणारे वारे आणि गुजरात महाराष्ट्र वरील चक्रीय वाऱ्यांमुळे राज्यातील तापमानाचा पारा वाढत असून राज्यात बुधवारी 5 मार्च रोजी राज्यातील अनेक शहरांमध्ये कमाल तापमानाचा पारा 35 पार पोहोचला होता.

IMD (आय एम डी) ने दिलेल्या माहितीनुसार चक्रीय वाऱ्यामुळे वाऱ्यांमुळे अनेक ठिकाणी तापमानाची पातळी वाढली आहे. मुंबई, अलिबाग आणि रत्नागिरीत सरासरीपेक्षा अधिक तापमानाची नोंद करण्यात आली. तर मराठवाड्यातील काही भागात रात्री आणि पहाटेच्या समयी थंडी जाणवताना दिसत आहे. राज्यातील अन्य भागातही कमाल तापमान 35 अंशाहून अधिक होते, तरी काही ठिकाणी तापमान सरासरीपेक्षा कमी राहिले.
पूर्वेकडून येणारे वारे आणि गुजरात-महाराष्ट्र वरील प्रत्यावर्ती चक्रीय वाऱ्यांमुळे राज्यातील तापमानाचा पारा वाढत असून राज्यात बुधवारी अनेक शहरांमध्ये कमाल तापमानाचा पारा 35 पारा पोहोचला होता.
विदर्भामध्ये अद्याप तापमानाचा पारा फारसा वाढला नसून कोकण विभागात मात्र बुधवारी कमाल तापमानाचा पारा सरासरीपेक्षा 4 ते 5 अंश सेल्सिअसने अधिक नोंद करण्यात आली.
मराठवाड्यातील तापमान Maharashtra Weather Update 2025
मराठवाड्यात ही धाराशिव परभणी बीड येथे कमाल तापमान 35 अंशाहून अधिक नोंद करण्यात आले. मराठवाड्याच्या काही भागात रात्री आणि पहाटेच्या थंडी जाणवताना दिसत आहे. त्यामुळे किमान तापमानात घट जाणवताना दिसत आहे.
सूक्ष्म कृषी सिंचन योजनेच्या अनुदानाबाबत महत्त्वाचा शासन निर्णय, वाचा सविस्तर
विदर्भातील तापमान
- विदर्भात वाशिम वळगळता इतर ठिकाणी कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी नोंद करण्यात आली.
- वाशिम येथे सरासरीपेक्षा अंशाने कमान 3.1 अंशानी कमाल तापमान अधिक नोंदवले गेले.
- अकोला, चंद्रपूर, वाशिम या तीन केंद्रावर कमाल तापमानाचा पारा 35 अंशाहून अधिक होता.
- पुढील दोन दिवस विदर्भामध्ये तापमानात फार मोठा बदल होण्याची शक्यता नाही.
- मात्र, त्यानंतर कमाल तापमानात 3 ते 5 अंशाची वाढ होऊ शकते.

Maharashtra Weather Update 2025 शेतकऱ्यांसाठी सल्ला
1.भाजीपाला पिकात खुरपणी करून भाजीपाला पीक तण विरहित ठेवावे.
2. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाची पिकाची काढणी करून घ्यावी.
3. कमाल तापमानात झालेली वाढ, वाढलेल्या बाष्पोत्सजर्नच्या वेगामुळे तसेच पुढील पाच दिवसाच्या कोरड्या हवामानाचा अंदाज लक्षात घ्या घेता नवीन लागवड व पुर्न लागवड केलेल्या रोपांना आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे, असा सल्ला देण्यात आला आहे.
इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |