Maharashtra Weather Update 2025 राज्यभरात शेतकऱ्यांना चिंतेत असलेल्या पावसाने विदर्भातही धुमशान घातले आहे. उत्तरेकडून परतीच्या प्रवासाला लागलेला मान्सून विदर्भात पुन्हा सक्रिय झाला आहे. बुधवारपासून सर्व जिल्हे पावसाच्या सावटाखाली आले आहेत.

IMD ने दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबरच्या अखेरीस राज्यात पुन्हा एकदा पावसाची सक्रियता वाढली आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यातील बहुतांश भागांमध्ये 26 ते 28 सप्टेंबर या कालावधीमध्ये हलका ते मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
रब्बी मका लागवड तंत्र; अधिक उत्पादन देणारे फायद्याचे तंत्रज्ञान!!
Maharashtra Weather Update 2025 विदर्भ, मराठवाडा, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील शेतकरी व नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. दरम्यान, सततच्या पावसामुळे कापूस व सोयाबीन पिकांचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे.

हवामानाचा अंदाज: Maharashtra Weather Update 2025
27 सप्टेंबर: दक्षिण मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज.
28 सप्टेंबर: कोकण, मध्य महाराष्ट्र, मुंबई महानगरसह विविध भागात मुसळधार पाऊस. उर्वरित भागात हलका ते मध्यम पाऊस.
शेतकऱ्यांची चिंता वाढली
- सततच्या पावसामुळे खरिपातील कापूस, सोयाबीन व तुरीच्या पिकांना मोठा फटका बसत आहे.
- कापूस: बोंड फुटण्यापूर्वीच पावसामुळे शेंड्यांवरील कापूस खराब होण्याचा धोका.
- सोयाबीन: शेंगा फुटून दाणे गळण्याचा धोका निर्माण.
- तुर: वाढीच्या अवस्थेत पाणी साचल्याने पिकावर नकारात्मक परिणाम.
- शेतकऱ्यांनी काढणी केलेले पीक तातडीने सुरक्षित जागी साठवून ठेवावे, अशी सूचना कृषी विभागाने केली आहे.
प्रशासनाचा इशारा
आपत्ती व्यवस्थापन विभागाने नागरिकांना नदि नाले व धरणा जवळ सतर्क राहण्याचे अहवान केले आहे. धरणांचा साठा वाढल्याने अचानक विसर्ग सुरू होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मान्सूनचा निरोप लांबणीवर!
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, मान्सून राज्यातून लवकरात लवकर 5 ऑक्टोंबरनंतरच माघार घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे आणखी काही दिवस पावसाचे सावट कायम राहणार आहे. शेतकरी व नागरिकांनी हवामान अंदाज लक्षात घेऊन नियोजन करावे, असे आवाहन हवामान विभाग व प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांना सल्ला:
ढगाळ वातावरणामुळे बोंड अळी, पानांवर रोग, कीड वाढू शकते. वेळेवर औषध फवारणी करा.
शेतात व पिकाभोवती पाण्याचा निचरा करण्याची सोय करा.
पहा तारखानिहाय कुठे-कुठे पाऊस:
मध्य व वायव्य बंगाल उपसागरादरम्यान स्पष्ट ठळक आकारात रूपांतर झालेल्या हवेच्या कमी दाबाचे उद्या 27 तारखेला सकाळपर्यंत हवेच्या तीव्र कमी दाबात रूपांतर होत आहे.
चंद्रपूर, हिंगोली, पैठण, अहिल्यानगर मार्गे मुंबईकडे मार्गक्रमणाच्या शक्यतेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात शनिवारी दिनांक 27 सप्टेंबर पासून दसऱ्यापर्यंत 6 दिवसात संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता निर्माण झाली आहे.
त्यातही अतिजोरदार पावसाचे जिल्हे व तारखा खालील प्रमाणे:
शनिवार दि. 27 सप्टेंबर रोजी: मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्याचा घाटमाथा व धाराशिव, लातूर, नांदेड.
रविवार दि. 28 सप्टेंबर रोजी: मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, छत्रपती संभाजीनगर व पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्याचा घाटमाथा.
सोमवार व मंगळवार दि. 29 व 30 सप्टेंबर रोजी : मुंबई, पालघर, ठाणे, रायगड व नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्याचा घाटमाथा.
उघडिपीची शक्यता-
Maharashtra Weather Update 2025 शुक्रवार दि. 3 ऑक्टोबरपासून पूर्णतः नव्हे परंतु काहीशी उघडिपीची शक्यता जाणवते.
नद्यांच्या खोऱ्यातील जल आवक व धरण-संचय
Maharashtra Weather Update 2025 सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर उगम पावणाऱ्या महाराष्ट्रातील नद्यांच्या खोऱ्यात मध्यम ते जोरदार पावसाच्या शक्यतेमुळे ह्या नद्यांच्या धरणातून पात्रात पुन्हा एकदा पूर पाण्याच्या विसर्गाची शक्यता जाणवते.
इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |