कडक ऊन्हाला ब्रेक, दोन दिवस ढगाळ वातावरणाची शक्यता Maharashtra Weather Update 2025

Maharashtra Weather Update 2025 फेब्रुवारी महिन्यापासून वाढत असलेल्या तापमानाने आता ‘ब्रेक’ घेतला आहे. रविवार 23 फेब्रुवारी रोजी कमाल व किमान तापमानात किंचित घट झाली.

WhatsApp Group Join Now
Maharashtra Weather Update 2025

पुढील दोन दिवसातील काही काळ ढगाळ वातावरण असणार असून, पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, सध्या ईशान्य भारतात पावसाला पोषक वातावरण तयार झाले आहे.

त्यामुळे तेथे वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. याचा थोडासा प्रभाव महाराष्ट्रातील काही भागांवर दिसून येऊ शकतो.

हवामान अंदाजानुसार, 24 फेब्रुवारी रोजी पावसाच्या हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे. मात्र, राज्यातील बहुतांश भागांमध्ये हवामान कोरडे आणि शुष्क राहील.

WhatsApp Group Join Now

असे करा खरीप पिके जमीन व खत व्यवस्थापन Maharashtra Weather Update 2025

पुढील दोन दिवसानंतर तापमान हळूहळू वाढेल. त्यामुळे नागरिकांनी उष्णतेपासून बचावासाठी आवश्यक खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

राज्यात उन्हाळ्याच्या सुरुवातीपासूनच तापमान वाढीचे संकेत मिळत आहेत. पुढील काही दिवस उन्हाचा प्रभाव अधिक राहणार असल्याने नागरिकांनी तसेच शेतकऱ्यांनी हवामानाच्या बदलांवर सतत लक्ष ठेवावे.

असे करा खरीप पिके जमीन व खत व्यवस्थापन

हलक्या पावसाच्या शक्यतेमुळे काही भागांना दिलासा मिळू शकतो. मात्र, त्याचा मोठा प्रभाव राज्यभर जाणवणार नाही. त्यामुळे पुढील आठवड्यात तापमानत आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

चार दिवसातील कमाल व किमान तापमान

दिनांककमालकिमान
23 फेब्रुवारी37.919.9
22 फेब्रुवारी38.021.6
21 फेब्रुवारी37.622.0
20 फेब्रुवारी38.120.22

इतर शेती विषयक माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a Comment