Maharashtra Weather Update 2025 पुणे: नैऋत्य मानसून ने संपूर्ण महाराष्ट्र व्यापला असून, विदर्भ आणि मराठवाडा वगळता उर्वरित महाराष्ट्र जोरदार पाऊस सुरू आहे.

Maharashtra Weather Update 2025 पुढील पाच दिवस पावसाची अशीच बॅटिंग सुरू राहण्याचा अंदाज असून, त्यानंतर पावसाचा जोर काहीसा कमी होणार आहे. बिहार व उत्तर प्रदेश मधील आणखी काही भागात मान्सून दाखल झाला आहे.
राज्यात 11.70 लाख हेक्टरवर खरीप पेरण्या; कोणत्या पिकाची झाली सर्वाधिक पेरणी,
मान्सून उर्वरित अरबी समुद्र, मध्य प्रदेश व उत्तर प्रदेशात उर्वरित भाग, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश व जम्मू-काश्मीरमध्ये आगेकूच करण्यास अनुकूल परिस्थिती आहे. उत्तर कोकण ते उत्तर केरळ किनारपट्टीवर द्रोणीका रेषा स्थिर आहे.

Maharashtra Weather Update 2025 राज्यात कुठे काय घडले?
नाशिक | नद्या नाल्यांना पूर, काही धरणांमधून विसर्ग, गोदावरीला पूर, दुतोंड्याचा कमरेपर्यंत पाणी. |
अहिल्यानगर | घाटमाथ्यावर जोरदार पाऊस, मुळा धरणाकडे 21,500 क्युसेकने पाण्याची आवक. |
सोलापूर | उजनी धरणात 60 % साठा, दौंडमधून 21 क्युसेकचा विसर्ग. |
कधी कोणता अलर्ट?
Maharashtra Weather Update 2025 पुढील पाच दिवस कोकण गोवा विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
20 जून येलो अलर्ट – ठाणे, मुंबई, रत्नागिरी, रायगड, नाशिक, सातारा घाट परिसर.
20 जून ऑरेंज अलर्ट – पुणे, घाट परिसर.
20 जून ते 22 जून येलो अलर्ट – रायगड, रत्नागिरी, पुढील काही दिवस कोकणात पावसाचा जोर कायम राहील.
इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |