Maharashtra Weather Update 2025 राज्यात मान्सून आता जोर धरत असून कोकण, मध्य महाराष्ट्रात, मराठवाड्यात, विदर्भात, अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

Maharashtra Weather Update 2025 राज्यात मान्सूनने जोरदार पुनरागमन झाले असून मुंबई, पुणे, अहिल्यानगर भागातून मान्सून आज (14 जून) पुढे सरकण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
सोलापूर जिल्ह्यात ‘या’ गावाने 400 एकरावर ठिबक सिंचनाद्वारे घेतले तुरीचे विक्रमी उत्पादन!
यासोबतच मुंबईवर रायगडला आज तर सिंधुदुर्ग जिल्ह्याला जिल्ह्याला उद्या (जून 15, रविवार)रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

कोकणात 14 ते 19 जून मध्य महाराष्ट्रात 14 व 15 जून मराठवाड्यात 17 जून तर, विदर्भात 16 ते 19 जून दरम्यान अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.
राज्यात जून महिन्याच्या सुरुवातीस विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा जोरदार पुनरागमन केले आहे.
IMD ने दिलेल्या माहितीनुसार, वाऱ्याची द्रोणीय रेषा वायव्य राजस्थान पासून मध्यप्रदेश, विदर्भ मार्गे मराठवाड्यापर्यंत गेल्यामुळे महाराष्ट्र, गोवा आणि कोकणातील पुढील तीन दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Maharashtra Weather Update 2025 ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट
शनिवारी आणि रविवारी रायगड व रत्नागिरी जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे.
आज मुंबई रायगड तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात 15 जून रोजी येथे रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
कुठे ऑरेंज कलर?
शनिवारी ठाणे, मुंबई, पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह ताशी 50 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याच्या आणि मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या ठिकाणी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.
Maharashtra Weather Update 2025 पावसाचा जोर वाढणार
मान्सूनचा वेग येत्या काही दिवसात आणखीन वाढणार आहे. पुढील काही दिवसात कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ विभागात पावसाचा जोर अधिक वाढण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
राज्यात सर्वत्र मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस
गुरुवारी रात्री आणि शुक्रवारी सकाळपासूनच राज्यभर अनेक भागात जोरदार पावसाने हजेरी लावली. काही भागात विजांच्या कडकडाटासह वादळी वारांसह पावसाने हजेरी लावली.
ऑरेंज अलर्ट
उर्वरित महाराष्ट्रात 15 ते 17 जून दरम्यान ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
यात पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, पुणे घाट, कोल्हापूर घाट, सातारा येथे करण्यात आला आहे.
इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |