Maharashtra Weather Update 2025 महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला असून, हवामान, घाटमाथा आणि पूर्व विदर्भासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. काही ठिकाणी मुसळधार पावसाच्या सरी कोसळत असून विजांचा कडकडाटही होत आहे.

विशेषतः रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह, नागपूर, भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पुढील काही दिवस वातावरण अस्थिर राहणार आहे. नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या शेतकऱ्यांना 100 टक्के अनुदानावर मिळते जमीन, ‘ही’ योजना नक्की काय आहे?
राज्यात मान्सून पूर्व पावसाची जोरदार हजेरी सुरू असून कोकण, घाटमाथा आणि पूर्व विदर्भात हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर इतर भागांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Maharashtra Weather Update 2025 ‘या’ भागांमध्ये पावसाचा जोर?
हवामान विभागाने (IMD) दिलेल्या अंदाजानुसार, आज 28 मे रोजी कोकण, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. या ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी लागू करण्यात आला.
सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर जोरदार सरींचा इशारा आहे. दरम्यान ठाणे, मुंबई, पुणे, कोल्हापूर जिल्ह्याचा घाटमाथा आणि मराठवाड्यातील हिंगोली व नांदेड जिल्ह्यांमध्येही वादळी पावसाची व विजांच्या कडकडाट वर्तविण्यात आला आहे.
हवामानात का झाला बदल
Maharashtra Weather Update 2025 बंगालच्या उपसागरात ओडिशाच्या किनाऱ्यालगत कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून, त्याची तीव्रता उत्तरेकडे सरकताना वाढण्याची शक्यता आहे. छत्तीसगड व आग्नेय राजस्थान पर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे. यामुळे महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये चक्राकार वाऱ्यांसह पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
Maharashtra Weather Update 2025 पावसाचा परिणाम
मंगळवारी (27 मे) रोजी सकाळपर्यंत मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग यासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडला.
रायगड जिल्ह्यातील म्हैशाळ येथे तब्बल 280 मिमी पावसाची नोंद झाली आहे. मध्य महाराष्ट्र आणि घाटमाथ्यावरही पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.
शेतकऱ्यांना सल्ला
हवामान विभागाने नागरिकांनी उघड्यावर जाऊ नये. विज चमकल्यास सुरक्षित स्थळी थांबावे, आणि नदीकाठच्या ठिकाणी जाणे टाळावे अशी सूचना केली आहे.
शेतकऱ्यांनी पिकांचे संरक्षण करावे आणि यंत्रसामुग्री व विज उपकरणे सुरक्षित स्थळी हलवावीत.
शेतमाल कोरड्या जागी साठवणूक करावी.
हवामान विभागाने जारी केला अलर्ट
अलर्ट रंग | क्षेत्र | संभाव्य प्रभाव |
ऑरेंज | कोकण, पूर्व विदर्भ | मुसळधार पाऊस विजांच्या गडगडाटासह |
येलो | घाटमाथा, मराठवाडा, उर्वरित विदर्भ | मध्यम ते जोरदार पाऊस, वादळी वारे |
रेड (काही भागात) | रायगड गडचिरोली | अतिवृष्टीची शक्यता, पुराचा धोका |
इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |