Maharashtra Weather Update 2025 आजपासून पुढील 15 ते 20 दिवस म्हणजे 31 मे पर्यंत मान्सून केरळात दाखल होईपर्यंत, संपूर्ण महाराष्ट्रात भाग बदलत दिवसागणिक, मान्सूनचा नव्हे परंतु मान्सूनपूर्व विजा, वारा वावधनासहितचा मान्सून पूर्व अवकाळी पावसाची शक्यता जाणवते.

Maharashtra Weather Update 2025 महाराष्ट्रातील पाऊस व पेरणी पूर्व मशागती
आजपासून पुढील 15 ते 20 दिवस म्हणजे 31 मे पर्यंत म्हणजेच मान्सून केरळात दाखल होईपर्यंत, संपूर्ण महाराष्ट्रात भाग बदलत दिवसागणिक मान्सूनचा नव्हे परंतु मान्सून पूर्व विजा, वारा वावधना सहिताचा मानसून पूर्व अवकाळी पावसाची शक्यता जाणवते.
चाकण बाजार समितीत कांद्याची आवक घटली, भावात किंचित वाढ;
त्यातूनच कदाचित महाराष्ट्रात पेरण पूर्व शेतीच्या मशागतींना चालना मिळू शकते. शेतकऱ्याने त्यामुळे लक्ष ठेवून, आवश्यक असलेल्या खरीप पेरणी पूर्व मशागतीस तयारीतच असावे असे वाटते

Maharashtra Weather Update 2025 मान्सून
केरळात मान्सून 23 ते 31 मे दरम्यान कधीही केरळात दाखल होऊ शकतो.
अंदमान आतील सध्याचा पाऊस
अंदमान व आग्नेय बंगालच्या उसागरात दाखल झालेला कोसळत असून त्याच्या पुढील वाटचालीस अनुकूल वातावरण तयार होत आहे.
Maharashtra Weather Update 2025 महाराष्ट्रातील तापमान
- अवकाळीच्या वातावरणामुळे महाराष्ट्रात दिवसाचे कमाल तापमान, त्याचबरोबर पहाटेचे किमान तापमानही सरासरीच्या खालील खालीच राहण्याची शक्यता आहे.
- अर्थात 4-5 दिवसासाठी तापमानात थोडी चढ-उतार जरी जाणवली तरी एकंदरीत उर्वरित मे महिन्यात दिवसाची उष्णता व रात्रीचा उखाडा महाराष्ट्रात विशेष जाणवणार नाही असेच वाटते.
- हे सर्व असले तरी सध्याच्या वातावरणात एकाकी काही बदल झाला तर तसे अवगत करता येईल. – माणिकराव मुळे
इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |