आजपण गारपिटीचा इशारा; राज्यात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या ‘या’ भागात वळीव बरसणार; Maharashtra Weather Update 2025

Maharashtra Weather Update 2025 मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह राज्यात ठीक ठिकाणी कोसळणाऱ्या वळीव पावसाचा वेग आज, गुरुवारीही कायम राहणार आहे त्यानुसार गुरुवारी मुंबईत जोरदार वाऱ्यासोबत मुसळधार पावसाची शक्यता आहे.

Maharashtra Weather Update 2025

तर राज्यात मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याच्या काही भागात मेघगर्जनेसह गारपिट होण्याचा अंदाज आहे, अशी माहिती हवामान तज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली.

जत तालुक्यात पाणी संकट झालं गंभीर; डाळिंब बागा वाळायला सुरुवात

Maharashtra Weather Update 2025 संपूर्ण कोकण व मध्य महाराष्ट्रात वळीवाच्या पावसाची शक्यता 11 मे पर्यंत कायम आहे. रायगड, मुंबई, ठाणे, पालघर, नंदुरबार, धुळे, जळगाव ,नाशिक, अहिल्यानगर जिल्ह्यात याचा प्रभाव राहील.

WhatsApp Group Join Now

हवामानाचा अभ्यास अत्रेया शेट्टी यांच्या म्हणण्यानुसार, दक्षिण महाराष्ट्रात गारपीटीची शक्यता कायम आहे, तर महा मुंबईत कोसळणाऱ्या पावसाचा जोर शुक्रवार नंतर ओसरेल.

हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले की, अवकाळीच्या वातावरणामुळे, कोकण वगळता परंतु मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात दुपारच्या कमाल तापमानात सरासरीपेक्षा दोन ते चार डिग्रीने घट झाली आहे. त्यामुळे उन्हाचा ताप जाणवत नाही.

Maharashtra Weather Update 2025 पहाटेच्या किमान तापमानात घट

चंद्रपूर वगळता संपूर्ण विदर्भ 4 ते 6, धाराशिव वगळता संपूर्ण मराठवाडा 3 ते 5, जळगाव 6.5, अलिबाग 5.8, डहाणू 5.2, कुलाबा 3.7, सांताक्रुज2.4, डिग्रीने खालवले, तापमानाची स्थिती 12 मे टिकून राहील.

WhatsApp Group Join Now
इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment