Maharashtra Weather Update 2025 मुंबई राज्यातील बहुतांश शहरांच्या कमल तापमानात वाढ झाल्यामुळे चटके बसत असतानाच आता पुढील सात दिवस राज्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता हवामान अभ्यासकांनी वर्तविली आहे.

संपूर्ण कोकण, खानदेश, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, धाराशिव, बीड, नांदेड, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, अमरावती या जिल्ह्यात तीन ते दहा मे पर्यंतच्या आठवड्यात ढगाळ वातावरण राहील.
बदलत्या हवामानात पिकांसाठी काय आहे कृषी सल्ला वाचा सविस्तर;
Maharashtra Weather Update 2025 किरकोळ ठिकाणी एखाद-दुसऱ्या दिवशी विजांचा गडगडाट वाऱ्यासह किरकोळ पावसाची शक्यता आहे. या वातावरणाचा प्रभाव विदर्भातील जिल्ह्यात जाणवू शकतो. किरकोळ गारपिटीची ही शक्यता आहे. मुंबई आकाश ढगाळ असेल, तर दुपारी निरभ्र राहील.

“महाराष्ट्रात कमाल तापमान 38 अं. से. तर काही ठिकाणी 40 अं. से. आहे. शनिवारपासूनच्या आठवड्यात तापमान दोन अंश सेल्सिअसने खालवण्याची शक्यता आहे. सध्या महाराष्ट्रात रात्रीचा उकाडा वा कुठेही उष्णतेच्या लाटेची शक्यता नाही. – माणिकराव खुळे, हवामान तज्ञ.”
इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |