Maharashtra Weather Update 2025 राज्यात मागील आठवड्यात उष्णतेच्या प्रचंड झळा जाणवल्या आहेत. कमाल तापमानाची पारा चढाच होता. त्यामुळे नागरिक ही वाढत्या आम्हाला हैराण झालेले आहेत .

एकीकडे उष्णतेची ही परिस्थिती असताना दुसरीकडे महाराष्ट्रात येत्या 4 दिवसात विदर्भ, मध्य महाराष्ट्र सह मराठवाड्यात काही जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा अंदाज IMD ने दिला आहे. एकीकडे तापमानाचा उच्चांक वाढत असताना राज्यभरात आज प्रचंड उकाडा जाणवत आहे. मराठवाड्यात अनेक भागात ढगाळ वातावरण पाहायला मिळाले.
काटेपूर्णा धरणात केवळ ‘इतके’ टक्केच जलसाठा पण जपूनच वापरा !वाचा सविस्तर;
विदर्भात काही जिल्ह्यांना पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रातही हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. तर काल राज्यातील काही भागात पावसाच्या सरी बरसल्या. त्यामुळे काही भागात उष्णतेच्या तडाख्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे.

IMD ने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र, कर्नाटक, मध्यप्रदेशसह 24 राज्यांमध्ये आता वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आसाम बिहार तसेच पश्चिम बंगालच्या भागात चक्रकार वाऱ्यांची स्थिती सक्रिय आहे. त्यामुळे महाराष्ट्रात मध्य महाराष्ट्र विदर्भ व मराठवाड्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
विदर्भावासीयांची होणार का उकाड्यापासून सुटका!
विदर्भात आजपासून (27 एप्रिल) अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या तीन जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट देण्यात आला असून इतर जिल्ह्यांनाही जारी करण्यात आला आहे.
Maharashtra Weather Update 2025 मराठवाड्यात उष्ण व दमट हवामान
मराठवाड्यात जालना, परभणी, बीड, हिंगोली या जिल्ह्यांना उष्ण व दमट हवामानाचा अंदाज आहे. तर नांदेड, लातूर, धाराशिव, बीड जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
Maharashtra Weather Update 2025 पश्चिम महाराष्ट्रात अवकाळीची हजेरी
सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्ह्यांना अवकाळी पाऊस झोडपणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |