Maharashtra Weather Update 2025 उत्तर दक्षिण द्रोणिका रेषा उत्तर पूर्व मध्य प्रदेशापासून मन्नडच्या आखातापर्यंत म्हणजेच विदर्भ, तेलंगणा, अंतर्गत कर्नाटक आणि तमिळनाडू मार्गे जात आहे. त्यामुळे कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. आज, सोमवारी छत्रपती संभाजी नगर, जालना व बीडमध्ये उष्ण व दमट हवामान राहणार आहे.

तर पुढील दोन दिवसात विदर्भात अकोला, नागपूर, चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान शास्त्र विभागाने वर्तवली आहे. विदर्भ आणि मराठवाड्यासह राज्यातील बहुतांश भागात वाढत्या उन्हाने जीवाची काहिली केली आहे. गेल्या तीन दिवसातच पाऱ्याने 40 हून 45 अंश सेल्सियस पर्यंत मजल मारली आहे.
राज्यात उष्णतेचा अलर्ट काय आहे; कारण वाचा सविस्तर;
रविवार पासून तीन दिवसांसाठी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट जारी केला आहे. बीड, लातूर, धाराशिव जिल्ह्यातील लोकांना घरातून बाहेर पाय काढणे मुश्किल झाले आहे.

त्यामुळे या चार जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान रविवारी दिनांक 20 राज्यात चंद्रपूर येथे 44.6 अंश अशी सर्वाधिक तापमानाची नोंद झाली.
Maharashtra Weather Update 2025 मध्य महाराष्ट्रात जळगाव आणि सोलापूरचा अपवाद वगळता पुणे, कोल्हापूर, नाशिक, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील कमाल तापमानाचा पारा 40 अंशाच्या खाली घसरला आहे.
मात्र, मराठवाडा आणि विदर्भात कमाल तापमान 40° च्या पुढे आहे, तर विदर्भातील अकोला, अमरावती वर्धाचे तापमान 44 अंशाच्या घरात आहे.
ही लाट काय म्हणण्याची शक्यता आहे, तर मध्य महाराष्ट्रात पुढील दोन दिवसात कमाल तापमानात वाढ होण्याचा अंदाज हवामान शास्त्र विभागाने दिला आहे.
Maharashtra Weather Update 2025 राज्यातील कमाल तापमान पुढील प्रमाणे…
पुणे | 38.7 |
जळगाव | 41 |
नाशिक | 37.4 |
सोलापूर | 43 |
औरंगाबाद | 41.6 |
परभणी | 42.4 |
अकोला | 44.3 |
अमरावती | 44.4 |
चंद्रपूर | 44.6 |
नागपूर | 44 |
वर्धा | 44 |
बीड | 42.2 |
यवतमाळ | 43.6 |
इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |