राज्यात उष्णतेचा अलर्ट काय आहे; कारण वाचा सविस्तर; Maharashtra Weather Update 2025

Maharashtra Weather Update 2025 राज्यात हवामानात मार्च महिन्याच्या मध्यापासून अनेक बदल होत आहेत. कधी अवकाळी पाऊस तर कधी अवकाळी तर कधी उष्णतेत वाढ अशी परिस्थिती दिसत आहे. परंतु, आता हवामान विभागाने मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा जारी केला आहे. IMD ने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात अकोल्यामध्येही सूर्याचा पारा चढताना दिसत आहे. अकोल्यात 44.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. मागील काही दिवसांपासून विदर्भात पारा चढताना दिसत आहे.

Maharashtra Weather Update 2025

तर परभणी, छत्रपती संभाजीनगर, मालेगाव, अमरावती, वाशिम या ठिकाणीही 41 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. तर पुण्यात आज उन्हाची चटके अधिक जाणवतील असेही हवामान विभागाने कळविले आहे. राज्यात मागील काही दिवसांपासून अचानक अवकाळीच संकट आलं आणि जवळपास सर्वच भागांमध्ये अवकाळीने हजेरी लावली. काही ठिकाणी जर गारपीट देखील मोठ्या प्रमाणात झाले. त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले.

सोलापूरसह इतर कांदा मार्केटमध्ये दर हजाराच्या खाली आले, वाचा सविस्तर; 

चंद्रपूर, जळगाव, सांगली, सातारा, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, बीड, परभणी, लातूर, वाशिम या ठिकाणी जोरदार पाऊस झाला. कधी पाऊस जास्त तर कधी ऊन अशी स्थिती निर्माण झाली होती. परंतु आता मात्र सर्वत्र उष्णतेचा तडाखा जाणवत आहे. चक्राकर वारे वाहत असल्याने कमी दाबाचा पट्टा तयार झालेले राज्यात पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले. वादळी वाऱ्यासह अनेक भागांमध्ये पाऊस झाला. अवकाळी पावसामुळे मार्च आणि एप्रिल मध्येही थोडासा थंडावा जाणवला.

WhatsApp Group Join Now

आता मात्र, अवकाळीचे ढग दूर गेले आहेत. त्यामुळे राज्यात परत एकदा उष्णता वाढल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मागील तीन ते चार दिवसांपासून वाढ होताना दिसत आहे.

Maharashtra Weather Update 2025….IMD ने काय दिला इशारा!

IMD ने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात उन्हाचा पारा वाढत आहे. त्यात मध्ये महाराष्ट्र आणि मराठवाड्यात उष्ण आणि दमट वातावरणाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्यात काही भागांमध्ये आज ढगाळ वातावरण राहणार असल्याची शक्यता देखील वर्तविण्यात आली आहे.

Maharashtra Weather Update 2025 राज्यात उष्णता वाढत असल्याने नागरिकांनी दरम्यान काळजी घ्यावी, असा सल्ला देण्यात आला आहे. तसेच पुढील काही दिवसांमध्ये राज्यात उष्णता अधिक वाढण्याचे देखील संकेत देण्यात आले आहे. एप्रिल च्या शेवटच्या आठवड्यात राज्यातील अनेक शहरांमध्ये 45 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान जाण्याचेही शक्यता वर्तविण्यात आली आहे.

WhatsApp Group Join Now

Maharashtra Weather Update 2025 शेतकऱ्यांना सल्ला

कमाल तापमानात झालेली वाढ व वाढलेला बाष्पोत्सजर्नाचा वेग पाहता, पिकास, बागेस, भाजीपाला व फुल पिकास आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे, असा सल्ला देण्यात आला आहे.

इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment