महाराष्ट्रातील वातावरणात बदल! पावसाचा जोर वाढणार, पुढील आठवडाभर कसं असेल हवामान? Maharashtra Weather 2025

Maharashtra Weather 2025 राज्यातील वातावरणात बदल होत आहे. काही भागात तुरळक पाऊस पडत आहे, तर काही ठिकाणी पावसाचा जोर कमी झाल्याचे दिसत आहे. दरम्यान, राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार असल्याची माहिती हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी दिली आहे. भागत बदलत राज्यात पाऊस पडणार असल्याचे डख म्हणाले. राज्यात नेमका कुठं पाऊस पडणार याबाबतची सविस्तर माहिती पाहुयात. 

Maharashtra Weather 2025

WhatsApp Group Join Now

राज्यात 10 ते 11 जूनच्या दरम्यान दक्षिण महाराष्ट्रात पाऊस पडणार

राज्यात 10 ते 11 जूनच्या दरम्यान दक्षिण महाराष्ट्राकडे पाऊस पडणार आहे. पण सर्व राज्यात सांगायचं झालं तर 11 जूनपासून म्हणजे 12 ते 13 जूनच्या नंतर पाऊस वाढत जाणार असल्याची माहिती पंजाबराव डख यांनी दिली आहे.

पिकांवरील औषध फवारणीसाठी ड्रोन चा वापर का? काय आहेत फायदे?

Maharashtra Weather 2025 पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भाकडे 11 च्या नंतर 12 ते 13 जूनला पाऊस येणार आहे. दक्षिण महाराष्ट्राकडे 10, 11, 12 जून पासूनच पाऊस चांगल्या प्रमाणात पडणार असल्याचे पंजाबराव डख म्हणाले. 

WhatsApp Group Join Now

11 जूनपासून 20 जून पर्यंत मराठवाड्यात चांगला पाऊस पडणार

मराठवाड्यामध्ये आज तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे. त्याच्यानंतर 11 जूनला मराठवाड्याकडे चांगला पाऊस वाढत जाणार आहे. मराठवाड्याकडे 11 जून पासून ते 20 जून दरम्यान चांगला पाऊस पडणार आहे. दररोज भाग बदलत मराठवाड्यात पाऊस पडणार असल्याची माहिती पंजाबराव डख म्हणाले.  

Maharashtra Weather 2025 राज्यात 12 जून नंतर पावसाची व्याप्ती वाढणार

उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की, 12 जून पासून ते 20 जून पर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे. पश्चिम महाराष्ट्रा 10 जून पासून ते 20 जून पर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात भाग बदलत दररोजच पाऊस पडणार आहे.  राज्यात 12 जून नंतर पावसाची व्याप्ती वाढत जाणार आहे. 13 ते 20 जून दरम्यान राज्यात सगळीकडे भाग बदलत बदलत पाऊस पडणार आहे‌. 

Maharashtra Weather 2025 भाग बदल पडणार पाऊस

राज्यात 13 जून ते 18 जून पर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात जोराचा पाऊस पडणार आहे. मुंबई, पुणे नाशिक, संगमनेर, नगर या जिल्ह्यात अति मुसळधार पाऊस पडणार आहे. 13 जून ते 18 जून च्या दरम्यान लातूर, नांदेड, बीड, धाराशीव, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, छ. संभाजीनगर, जालना, त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्र मध्य धुळे, नंदुरबार,जळगाव, पारगुळा तसेच बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर भंडारा, गोंदिया चंद्रपूर, हिंगोली, वाशिम, यवतमाळ सांगायचं झालं तर सर्व जिल्ह्यात खूप पाऊस पडणार आहे. 

इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment