पुढील पाच दिवस राज्यातील या भागात विजांचा कडकडाटासह वादळी पाऊस पडणार!! Maharashtra Rain Update 2025

Maharashtra Rain Update 2025 मुंबई: अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने मुंबईसह कोकणात येत्या 30 ऑक्टोबरपर्यंत अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

Maharashtra Rain Update 2025

Maharashtra Rain Update 2025 पुढील पाच दिवस महाराष्ट्राच्या काही भागात विजांच्या कडकडाटासह वादळ आणि ताशी 40 ते 50 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. तसेच मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे.

जुलै व ऑगस्ट महिन्यांतील अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या पिकांची भरपाई अली, कोणत्या विभागाला किती मदत?

Maharashtra Rain Update 2025 दक्षिण महाराष्ट्र, गोवा आणि कोकण किनारपट्टीसह विविध ठिकाणी मुसळधारेचा अंदाज आहे. या काळात वाऱ्याचा वेग अधिक राहणार असल्याने मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला तटरक्षक दलाने दिला आहे.

WhatsApp Group Join Now

Maharashtra Rain Update 2025 मराठवाड्यात 29 ऑक्टोबरपर्यंत काही भागांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस होईल. लक्षदीप, कर्नाटक आणि केरळ किनाऱ्यावरही 27 ऑक्टोबरपर्यंत वादळवाऱ्यासह पावसाची परिस्थिती कायम राहणार आहे.

बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात सक्रिय झालेल्या हवामान प्रणालींमुळे पुन्हा पावसासाठी पूरक वातावरण तयार झाले आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्राचे सोमवारपर्यंत चक्रीवादळात रूपांतर होण्याची चिन्हे आहेत.

चार राज्यांना इशारा!! Maharashtra Rain Update 2025

मोंथा चक्रीवादळ धडकण्याची शक्यता लक्षात घेता आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि ओडिशाला खबरदारीचा इशारा देण्यात आला आहे.

भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे कि, आग्नेय बंगालच्या उपसागरावरील कमी दाबाचा पट्टा 28 ऑक्टोबरच्या संध्याकाळी काकीनाडाजवळील मछलीपट्टणम आणि कलिगपट्टणम दरम्यान आंध्र प्रदेश किनारपट्टी ओलांडण्याची शक्यता आहे.

WhatsApp Group Join Now

इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment