मान्सून पुन्हा सक्रिय होणार 13 जून पासून राज्यात ‘या’ ठिकाणी पुन्हा धो-धो बरसणार! Maharashtra Monsoon Update 2025

Maharashtra Monsoon Update 2025 मुंबई पर्दापणातच दोन-चार शतके ठोकून विक्रमांची बरसात करणाऱ्या क्रिकेटपटूसारखा माहोल केल्यानंतर एकदम ‘बॅड पॅच’ आल्यासारखं आल्यासारखी मान्सूनची स्थिती झाली आहे.

Maharashtra Monsoon Update 2025

26 मे रोजी मुंबईत आणि त्यानंतर गडचिरोली मार्गे विदर्भात दाखल झालेल्या मान्सूनने मोठा ब्रेक घेतला. 13 जून पासून पुन्हा महाराष्ट्रात मान्सून सक्रिय होऊन मध्यम पावसाची शक्यता आहे.

जमिनीचा बेवड चांगला येण्यासाठी खरिपात करा ‘या’ पीक पद्धतीचा अवलंब! वाचा सविस्तर; 

गेल्या आठ-दहा दिवसांपासून रुतून बसलेला मान्सून खानदेश, नाशिक व विदर्भातील उत्तरेकडील जिल्ह्यात पोहोचू शकला नाही.

निम्मा महाराष्ट्राच मान्सूनने व्यापला असून, शेतकरी पेरणीसाठी सक्रिय मान्सूनच्या प्रतीक्षेत आहेत. सध्या मान्सून खानदेश सह विदर्भाच्या अलीकडेच थबकला आहे.

WhatsApp Group Join Now

त्याच्या पुढील प्रवासासाठी पोषक वातावरण नाही. पुढील चार दिवस हे राज्यात किरकोळ पावसाची शक्यता हवामान अभ्यासकाने वर्तविली आहे.

Maharashtra Monsoon Update 2025 राज्यात कुठे, काय शक्यता?

नऊ जूनला मुंबई सह कोकणातील सात जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता आहे. नंतर 10 ते 12 जून दरम्यान पावसाचा जोर काहीसा कमी होईल. 12 जून पर्यंत उर्वरित महाराष्ट्रातील 29 जिल्ह्यात तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता आहे.

WhatsApp Group Join Now

124 वर्षातील सर्वात ओला महिना

मे महिन्याच्या उत्तरार्धात व मान्सून मुंबईत दाखल होण्याच्या काळात देशात अधिक पावसाची नोंद झाल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे होते.

Maharashtra Monsoon Update 2025 मे महिन्यात 124 वर्षात प्रथमच 126.3 मिमी पाऊस झाला.

शेतकऱ्यांना मान्सूनच्या पावसाच्या ओळीवर व मान्सून सक्रिय झाल्यावर 15 जून नंतर चांगल्या वाफशावर पेरणीचा निर्णय घ्यावा. – माणिकराव खुळे, हवामान तज्ञ”

इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment