Maharashtra Monsoon Update 2025 नवी दिल्ली : यंदा मान्सून 27 मे 2025 पर्यंत केरळ किनाऱ्यावर पोहोचणार आहे. गेल्या 17 वर्षातील म्हणजेच 2008 पासून प्रथमच मान्सून नियोजित कालावधीच्या चार दिवस आधी केरळमध्ये पोहोचणार आहे. सध्या मान्सून निकोबार बेटे, दक्षिण अंदमान समुद्र, पूर्व बंगाल उपसागराच्या काही भागात पोहोचला आहे.

Maharashtra Monsoon Update 2025 नैऋत्य मौसमी वारे माले, पूर्व बंगाल उपसागर, निकोबार बेट व मध्य अंदमान समुद्रातून जातो. 15 किंवा 16 मे पर्यंत मान्सून वेगाने पुढे जाण्याची शक्यता आहे.
खारपान पट्ट्यातील शेतकऱ्यांची विमा कंपन्यांकडून गोड क्रूरता! वाचा सविस्तर;
त्यानंतर तू दक्षिण अरबी समुद्रात प्रवेश करेल आणि श्रीलंकेचा काही भाग, दक्षिण बंगाल उपसागराचा काही भाग आणि संपूर्ण अंदमान बेटे व्यापेल, असे हवामान खात्याने म्हटले आहे.

Maharashtra Monsoon Update 2025 पुढील 2 दिवसात बहुतेक राज्यात पावसाची शक्यता आहे. 14 मे पर्यंत महाराष्ट्रात वादळीवारे आणि विजांच्या कडकडाट असं पावसाचा अंदाज आहे.
मध्यप्रदेश, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, तेलंगणा, कर्नाटक, तमिळनाडू व सिक्कीममध्ये ही पावसाची शक्यता आहे.
Maharashtra Monsoon Update 2025 मान्सून कुठे आणि केव्हा येण्याची शक्यता
| 15 मे | अंदमान आणि निकोबार |
| 1 जून | केरळ, तामिळनाडू, लक्षद्वीप, आसाम, मेघालय |
| 5 जून | गोवा, आंध्र प्रदेश किनारपट्टी, कर्नाटक, पश्चिम बंगाल |
| 6 जून | महाराष्ट्र, आंध्र प्रदेशचे किनारपट्टी व्यतिरिक्त जिल्हे |
| 10 जून | मध्य महाराष्ट्र, मुंबई, तेलंगणा, छत्तीसगड, ओडीसा, झारखंड, बिहार |
| 15 जून | गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश |
| 20 जून | गुजरात, राजस्थान, उत्तरखंड, दिल्ली |
| 25 जून | राजस्थान, हरियाणा, उत्तर प्रदेश |
| 30 जून | राजस्थान, नवी दिल्ली |
| इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |