Maharahstra Weather Update 2025 महाराष्ट्रात पावसाने अखेर दमदार हजेरी लावली असली, तरी येत्या 24 तासात काही भागांमध्ये हवामानात बदल होणार आहे. विशेषतः रत्नागिरी, पुणे, कोल्हापूर, सातारा आणि सिंधुदुर्ग घाटमाथ्यावर जोरदार वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Maharahstra Weather Update 2025 राज्य आपत्कालीन केंद्र आणि हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. दरम्यान, मराठवाडातही काही जिल्ह्यात वाऱ्यांसह विजांचा कडकडाट होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी आणि नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असा सल्ला देण्यात आला आहे.
औषध फवारणीसाठी मजुरांची समस्या आहे आणि पैशाची बचत करायची आहे मग वापरा ‘हे’ तंत्र!
महाराष्ट्र पावसाचा जोर वाढत असून, घाटमात्यांवर पुढील 24 तास वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. रत्नागिरी, पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

Maharahstra Weather Update 2025 कालच्या पावसाचा आढावा (17 जून रोजी सकाळपर्यंत)
ठाणे | 73.7 मिमी |
रायगड | 54.1 मिमी |
रत्नागिरी | 47.7 मिमी |
पालघर | 49.7 मिमी |
पुणे | 11.9 मिमी |
कोल्हापूर | 17.8 मिमी |
सातारा | 19.7 मिमी |
मुंबई उपनगर | 83.4 मिमी |
मुंबई शहर | 62.9 मिमी |
Maharahstra Weather Update 2025 घाटमाथ्यांवर अलर्ट का?
पश्चिम महाराष्ट्रातील घाट परिसरात वाऱ्याचा वेग ताशी 40 ते 50 किमी पर्यंत पोहोचण्याची शक्यता असून, मेघगर्जना आणि विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी सावधगिरी बाळगावी.
मराठवाडा हवामान अपडेट
प्रादेशिक हवामान केंद्रानुसार पुढील प्रमाणे मराठवाड्याच्या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवली आहे.
आज छत्रपती संभाजीनगर, जालना या भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आले आहे.
तर उद्या 19 व 20 जून रोजी नांदेड, परभणी, हिंगोली, छ. संभाजीनगर, जालना या भागात पावसाचा अंदाज आहे.
या काळात काही भागांमध्ये तशी 40-50 किमी वेगाने वारे विजेच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपात पाऊस पडण्याची शक्यता आहे.
Maharahstra Weather Update 2025 मराठवाड्यात पेरणीसाठी योग्य परिस्थिती कुठे?
पेरणी योग्य पाऊस | 75-100 (मिमी) |
छत्रपती संभाजी नगर | पैठण, वैजापूर, कन्नड, सोयगाव |
जालना | बदनापूर |
बीड | वडवणी |
लातूर | चाकूर |
धाराशिव | तुळजापूर, उमरगा, लोहारा |
नांदेड | बिलोली, कंधार, लोहा, देगलूर, किनवट |
शेतकऱ्यांसाठी सल्ला!
- मराठवाडा भागातील शेतकऱ्यांनी वाटचा असल्यास पेरणी सुरू करू शकतात.
- इतर ठिकाणी पेरणीसाठी अजून वाट पाहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |