Mahadbt Yojana 2025 जिल्हा परिषदेच्या योजनेअंतर्गत (सेस फंड) बॅटरी संचालित फवारणी पंपासाठी 1,140 तर सोयाबीन चाळणीसाठी 80 शेतकऱ्यांची निवड झाली आहे. साहित्य खरेदीनंतर या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अनुदानाची रक्कम जमा केली जाणार आहे.

वाशिम जिल्हा परिषदेच्या उपकरणतून वैयक्तिक लाभाच्या योजना राबविण्यात येतात. कृषी विभागाने वैयक्तिक लाभाच्या योजनेअंतर्गत सन 2024-25 या वर्षासाठी नोव्हेंबर महिन्यात 75 टक्के अनुदानावर फवारणी चार्जिंग पंप (बॅटरी संचालित) व सोयाबीन चाळणीसाठी अर्ज मागविले होते.
छाननी अंती उपकरण (Mahadbt Yojana 2025) योजनेअंतर्गत लाभार्थींची निवड झाली असून, फवारणी पंपासाठी 1,140 तर सोयाबीन चाळणीसाठी 80 शेतकरी पात्र ठरले आहेत.
डीबीटी (डायरेक्ट बेनिफिकट ट्रान्सफर) प्रणालीद्वारे साहित्य खरेदीनंतर लाभार्थ्यांच्या बँक खात्यात अनुदानाची रक्कम जमा केली जाणार आहे. 10 मार्च पर्यंत अनुदान मागणी प्रस्ताव कृषी अधिकारी/कृषी विस्तार अधिकाऱ्यांमार्फत संबंधित पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी कार्यालयात सादर करणे अनिवार्य आहे.
9375 रुपये सोयाबीन चाळणीसाठी
- सोयाबीन चाळणी खरेदी केल्यानंतर शेतकऱ्यांना 9 हजार 375 रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे.
- सोयाबीन चाळणी खरेदी करण्यासाठी कृषी विभागाने पूर्वसंमती दिलेली आहे.
Mahadbt Yojana 2025 आकडे बोलतात ?
फवारणी पंप | 1,140 |
सोयाबीन चाळणी | 80 |
तालुकानिहाय सोयाबीन चाळणी लाभार्थी
तालुका | संख्या |
मालेगाव | 21 |
मं. पीर | 32 |
रिसोड | 22 |
मानोरा | 5 |
पीएम किसानचे 2 हजार आले, नमो शेतकरी सन्मान योजनेचा हप्ता कधी ? वाचा सविस्तर…
Mahadbt Yojana 2025 वाशिम कारंजा तालुका निरंक!
- सोयाबीन चाळणी यंत्रातून वाशिम व कारंजा तालुक्यातील एकाही लाभार्थीचा समावेश नाही.
- सर्वाधिक 32 लाभार्थी मंगरूळ तालुक्यातील आहेत.
- 10 मार्च पर्यंत संबंधित पंचायत समिती कार्यालयात अनुदान मागणी प्रस्ताव सादर करावा लागणार आहे.
- या मुदतीत प्रस्ताव सादर न केल्यास पूर्वसंमती रह समजण्यात येणार आहे.
2800 रुपयांचे अनुदान फवारणी पंपासाठी!
फवारणी पंप खरेदी केल्यानंतर कृषी विभागाकडे जीएसटी चे बिल सादर करावे लागणार आहे. त्यानंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2800 रुपयांचे अनुदान जमा केले जाणार आहे.
अनुदानासाठी कोणती कागदपत्रे अनिवार्य ?
- साहित्य खरेदी केल्याची जीएसटी क्रमांकाची खरेदी पावती
- बँक खात्याच्या प्रथम पानाची छायांकित प्रत
- अनुदान मागणी पत्र प्रतिज्ञापत्र
- विस्तार अधिकाऱ्यांचा तपासणी अहवाल
- खरेदी केलेल्या बाबीसह तपासणी अधिकाऱ्यांसोबतचा जिओ टॅगिंग फोटो

इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |