शेतकऱ्यांसाठी कृषी अनुदानाची ‘लॉटरी’ बंद आता लॉबीचा खेळ सुरू, काय आहे प्रकरण? Mahadbt Lottery 2025

Mahadbt Lottery 2025 जवळा राज्य सरकारच्या कृषी अनुदानाच्या यंत्रणेत मोठा बदल करत लॉटरी पद्धतीला कायमची ‘गुडबाय’ देण्यात आली आहे.

Mahadbt Lottery 2025

त्याऐवजी आता प्रथम अर्ज करणाऱ्या प्रथम प्राधान्य (एफसीएफएस) हे धोरण लागू करण्यात आले आहे. या नव्या प्रणालीमुळे लाभार्थी निवडीची प्रक्रिया जलद झाली आहे असली, तरी तिच्यात पारदर्शकतेचा अभाव दिसून येत आहे.

शेतकऱ्यांना ‘पुर्णा’ कडून मिळाला दिलासा; उसाच्या वाढीव हप्तापोटी 9 कोटी 98 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर केले वर्ग!

यामुळे ऑनलाईन यंत्रणांमध्ये पारंगत असलेले गाव पातळी वरील सेतू चालक, डीलर आणि ठराविक लॉबीन ना मोठा फायदा मिळतो आहे, र ग्रामीण आर्थिक दृष्ट्या दुर्बल व माहिती अभावी मागे राहणार्‍या शेतकऱ्यांचे हित धोक्यात आले आहे.

WhatsApp Group Join Now

Mahadbt Lottery 2025 लॉटरी प्रणालीत अनुदानासाठी अर्ज केल्यानंतर निवड प्रक्रियेत पारदर्शकता होती. याद्वारे कोणताही अर्जदार निवडले जाऊ शकत असे.

मात्र, आता जे शेतकरी लवकरात अर्ज करतील त्यांनाच अनुदानाचा लाभ मिळणारा असून, इतर गरजू अर्जदार वंचित राहण्याची शक्यता आहे.

यामुळे कृषी विभागाने पारदर्शकता गमवल्याचा आरोप होत आहे. 2025-26 या वर्षासाठी लॉटरी पद्धत पूर्णतः रद्द करण्यात आली आहे. या ऐवजी एफसीएफएस प्रणाली लागू करण्यात आली आहे.

WhatsApp Group Join Now

या नव्या प्रणालीमुळे शहरालगत राहणारे कृषी अधिकाऱ्यांच्या संपर्कात असलेले, डिजिटल साधनसंपत्ती असलेले शेतकरी अर्ज लवकर भरू शकतात.

त्यांना अनुदानही पटकन मिळू शकते. मात्र, ग्रामीण भागातील व साधनांच्या अभाव असलेल्या शेतकऱ्यांना या प्रक्रियेतून डावलेले जाणे जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान, राज्याच्या कृषी विभागाने पारदर्शकता गमावत अनुदान वाटपातील सुस्पष्टता आणि समानतेला हरवले आहे. नवीन एफसीएफएस प्रणाली केवळ वेगवान व सुजन अर्जदारांसाठी फायदेशीर ठरत असून गरजूंना अधिकच दूर करत आहे.

शासनाने या धोरणाचा पूर्णविचार करून अधिक संतुलित आणि न्याय पद्धती स्वीकारावी, अशी मागणी शेतकरी संघटनाकडून होत आहे.

Mahadbt Lottery 2025 लॉटरी पद्धत शेतकऱ्यांच्या फायद्याची

2017 मध्ये कृषी विभागाने ऑफलाइन लॉटरी प्रणाली सुरू केली होती. ही प्रक्रिया गाव पातळीवरील प्रस्ताव संकलित करून कृषी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत व लोकप्रतिनिधी समोर लॉटरी काढून राबवली जात असे.

जरी सुरुवातीच्या अर्ज संकलन प्रक्रियेत काही त्रुटी होत्या, तरी लॉटरी द्वारे निवड केली ही पारदर्शक पद्धतीने होत होते. परंतु, अर्जाची संख्या वाढल्यामुळे लॉटरी नियमितपणे घेतली जात नव्हती. त्यामुळे अर्ज प्रलंबित राहून शेतकऱ्यांत नाराजी निर्माण झाली. त्याचाच फायदा घेत लोंबिनी लॉटरी पद्धत हटवण्यासाठी दबाव टाकल्याचे दिसते आहे.

Mahadbt Lottery 2025 सेतू केंद्र डीलर आणि दलालांची मक्तेदारी

गाव पातळीवरील सेतू केंद्र चालकांकडे इंटरनेट, संगणक, प्रिंटर यांसारख्या सुविधा असतात. परिणामी, हे चालक यांच्या ओळखीच्या किंवा पैसे देणाऱ्या शेतकऱ्यांचे अर्ज प्राधान्य भारतात तर उशिरा आलेल्या शेतकऱ्यांना वाट पाहायला लावतात.

Mahadbt Lottery 2025 डीलर्स आणि दलालांचे बुकिंग!

काही खाजगी कृषी डीलर आणि दलाल ठराविक शेतकऱ्यांचे अर्ज तयार ठेवतात. अनुदान योजनेच्या लिंक सुरू होतात हे अर्ज भरले जातात. गरजू पण वेळेअभावी पोहोचू न शकलेले शेतकरी नंतरच्या क्रमांकावर राहतात आणि अनुदान संपते.

इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment