Mahadbt drip irrigation 2025 राज्याच्या सर्वांगीण विकासात कृषी क्षेत्राचे अनन्य साधारण महत्त्व आहे. कोणत्याही पिकाचे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार उत्पादन घ्यायचे असेल, तर उत्पादनातील महत्त्वाचा निर्णयक घटक आहे.

योजनेचा उद्देश
- पाण्याची कार्यक्षमता वाढवून पाण्याचा प्रत्येक थेंबातून जास्तीत जास्त पिक उत्पादन मिळवणे.
- सूक्ष्म सिंचनाखाली क्षेत्र वाढवणे.
अर्ज केले, व्हेंडर निवडले, पैसे भरले, तरी सौर पंप येईना घरी…
Mahadbt drip irrigation 2025 अनुदान मर्यादा
- अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना 55%
- इतर शेतकऱ्यांना 45 % अनुदानाचे निकष असून क्षेत्राची मर्यादा 5 हेक्टर आहे.

Mahadbt drip irrigation 2025 योजनेचे व्याप्ती
सर्व 34 जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येते आहे.
Mahadbt drip irrigation 2025 लाभ क्षेत्र मर्यादा
सूक्ष्म सिंचन संच घटकाचे आयुर्मान 7 वर्ष करण्यात आले असून ज्या लाभधारकाने 5 हेक्टर क्षेत्राच्या मर्यादित सूक्ष्म सिंचन योजनेला लाभ घेतला आहे, अशा लाभधारकास 7 वर्षानंतर पुन्हा सूक्ष्म सिंचन योजनेचा लाभ घेता येईल.
एखाद्या शेतकऱ्याने सूक्ष्म सिंचन योजनेअंतर्गत पोर्टेबल स्प्रिंकलर या घटकाचा लाभ घेतला असल्यास सदर शेतकऱ्यांस तीन वर्षानंतर या क्षेत्रावर ठिबक संचाचा लाभ घेता येईल. ठिबक संचा नुसार अनुदान आदा करण्यात येत येईल.
लाभार्थी पात्रता
शेतकऱ्यांच्या नावे मालकी हक्काचा 7/12 व 8 अ उतारा असावा.
सूक्ष्म सिंचन घटकाचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्याकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध असावी.
अर्ज करण्यापासून अनुदान अदायगी पर्यंत महाडीबीटी पोर्टलवरील प्रक्रिया खालील प्रमाणे
- कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या सर्व योजनांसाठी शेतकरी ओळखपत्र क्रमांक अनिवार्य करण्यात आले आहे.
- शेतकरी ओळख क्रमांक आणि त्यांच्याशी संलग्न माहिती कृषी विभागामार्फत वापरत असलेल्या महाडीबीटी प्रणालीशी API द्वारे ॲग्रीस्टॅक या प्रणालीशी जोडण्यात आलेली आहे.
- त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना 7/12 व 8 ही कागदपत्रे अपलोड करण्याची आवश्यकता नाही.
- शासनाने सण २०२५-२६ पासून महाडीबीटी पोर्टलवर प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य देण्याचा निर्णय 21 मे 2025 रोजी पासून घेतलेला आहे.
- सद्यस्थितीत योजनेअंतर्गत 65,515 लाभार्थ्यांची निवड प्रथम अर्ज करणाऱ्या प्रथम प्राधान्य (FCFS)या तत्त्वावर करण्यात आलेली आहे.
Mahadbt drip irrigation 2025 अर्ज शुल्क
अर्ज सादर करतेवेळी शेतकऱ्यांनी रु. 20 शुल्क व जीएसटी रु. 3.60 मिळून एकूण रु. 23.60 शुल्क ऑनलाईन भरावयाचे आहे.
निवड झालेल्या शेतकऱ्यांनी खालील कागदपत्रे अपलोड करावी.
- सामाईक क्षेत्र असलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांनी इतर खातेदारांचे सहमती पत्र सादर करणे बंधनकारक असून ते साध्या कागदावर घेण्यात यावे.
- अज्ञान पालक खातेदाराचा वयाचा दाखला व पालकाचे घोषणापत्र.
- लाभार्थी संख्या यांना शेतजमीन भाडेतत्त्वावर घेऊन सूक्ष्म सिंचन योजनेचा लाभ घ्यावयाचा असल्यास मालकी हक्क असलेला 7/12 व 8-अ आणि लाभार्थ्यांनी अर्ज मंजूर झाल्याचा दिनांक पासून 7 वर्षासाठी शेतमालकासोबत केलेल्या नोंदणीकृत कराराचे प्रत.
पूर्वसंमती प्रदान करणे
छाननी अंती पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना तालुका कृषी अधिकारी एकत्रित संगणकीय प्रणालीद्वारे पूर्वसंमती प्रदान करतात.
संच खरेदी करून देयक अपलोड करणे
पूर्वसंमती प्राप्त झाल्यानंतर शेतकऱ्यांस त्यांच्या पसंतीच्या उत्पादकाकडून किंवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या वितरण वितरक किंवा विक्रेत्यांकडून 30 दिवसांच्या आत सूक्ष्म सिंचन बसवणे आवश्यक आहे.
संच खरेदी केल्यानंतर महाडीबीटी पोर्टलवर सादर करावयाची कागदपत्रे
1.शेतकऱ्याचे मानपत्र
2.देयकाची मूळ प्रत (टॅक्स इन्व्हाईस)
3.कंपनी प्रतिनिधीने तयार केलेल्या सूक्ष्म सिंचन संच आराखडा व प्रमाणपत्र.
मोका तपासणी व देयक छाननी
कृषी पर्यवेक्षक हे देयक छाननी करतात. तसेच प्रत्यक्ष क्षेत्रीय मोका तपासणी करून पोर्टलवर अहवालाची नोंद घेऊन छाननी अंति पात्र प्रस्तावास शिफारस करतात.
अनुदान परीगणना व मंजुरी देणे
Mahadbt drip irrigation 2025 देयकाची रक्कम जीएसटी रक्कम वगळून मोका तपासणी अहवालानुसार निश्चित झालेली रक्कम आणि मार्गदर्शक सूचनेतील मापदंडाप्रमाणे निश्चित झालेली रक्कम यापैकी सर्वात कमी आलेल्या रकमेनुसार अनुदान परिगणना करून मंजुरी सह तालुका कृषी अधिकारी याच्या स्तरावरून जिल्हाधिकारी कृषी अधिकारी यांच्या स्तरावर शिफारसीस सादर केली जाते.
ऑनलाइन अर्ज कसा करावा?
- सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी व ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या अधिकृत लिंक ला अवश्य भेट द्या.
- तसेच योजनेच्या अधिक माहितीसाठी कृषी विभागाच्या नजीकच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.
अधिकृत लिंक | https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/Error/ErrorPage |
इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |