महाडीबीटी योजनांच्या अनुदानाबाबत महत्वाचे शासन निर्णय,वाचा सविस्तर; Mahadbt Anudan 2025

Mahadbt Anudan 2025 राज्यातील महाडीबीटी फार्मर्स योजनांच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांसाठी पात्र झालेल्या परंतु अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत असलेले शेतकऱ्यांसाठी अतिशय दिलासादायक बातमी आहे.

Mahadbt Anudan 2025

WhatsApp Group Join Now

दरम्यान, शेतीसाठी राबविल्या जाणाऱ्या तुषार सिंचन, शेततळे, ठिबक सिंचन, कांदा चाळी तसेच कृषी यांत्रिकीकरणाच्या बाबी करिता शेतकरी पात्र झाले होते, यातील शेतकऱ्यांनी बाबींची खरेदी देखील केली होती.

मल्चिंगवर मिरची लागवड फायदेशीर, खर्चात होणार बचत वाचा सविस्तर;

मात्र, हे शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत होते. आता अशा सर्व शेतकऱ्यांच्या अनुदानाच्या वितरणासाठी मार्ग मोकळा झाला आहे. राज्य शासनाच्या माध्यमातून महाडीबीटी योजनेच्या अनुदाना बाबतचे काही शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत.

यामधील पहिला निर्णय आहे, राष्ट्रीय कृषी सिंचन कृषी विकास योजना कॅफेटेरीया योजने करता सर्वसाधारण अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रयोगाचा 120.33 कोटींचा निधी वितरित करण्याबाबत मंजुरी देण्यात आली आहे.

WhatsApp Group Join Now

Mahadbt Anudan 2025 याचबरोबर त्याचप्रमाणे राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या कॅफेटेरीया अंतर्गत सर्वसाधारण वर्ग अनुसूचित जाती प्रवर्ग अनुसूचित जमाती प्रवर्ग अशा तिन्ही घटकांचा 120 कोटी 33 लाख रुपयांचा निधी वितरण वितरण करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

याचबरोबर राज्यामध्ये राबवली जाणार एक महत्त्वाची योजना म्हणजेच मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वैयक्तिक शेततळ्याचा लाभ दिला जातो. या वैयक्तिक शेततळ्याच्या घटकाकरिता राज्य शासनाच्या माध्यमातून शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. सहा कोटी 39 लाख रुपयांचा निधी वितरित करण्यास मंजुरी देण्यात आले आहे.

याचबरोबर कृषी उन्नती योजना अंतर्गत एकात्मिक फलत्पादन विकास योजना या अभियानाच्या अंतर्गत देखील ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केले होते, जे शेतकरी पात्र झाले होते. अशा शेतकऱ्यांना अनुदान वितरण करण्यासाठी देखील शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. या शासन निर्णयाद्वारे राज्य शासन आणि केंद्रशासन मिळून 33 कोटी 33 लाख रुपयांचा निधी वितरित करण्यास मंजुरी देण्यात आले आहे.

Mahadbt Anudan 2025 तसेच आर के विवय अंतर्गत कोरडवाहू क्षेत्र विकास कार्यक्रमाचे अंमलबजावणीसाठी देखील सर्वसाधारण व अनुसूचित जमाती या प्रवर्गाचा एकूण चार कोटी तीस लाख रुपयांचा निधी वितरित करण्याबाबतचा निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. याचबरोबर कृषी उन्नती योजना अंतर्गत अन्न व पोषण सुरक्षा अभियान या केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत ग्राम बिजोत्पादन कार्यक्रम योजनेसाठी सन 2024-25 करिता देखील निधी वितरित करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे.

याचप्रमाणे राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत जमीन आरोग्य व सुपीकता कार्यक्रम सन 2024-25 मध्ये राबवण्यासाठी निधी वितरित करण्याबाबतच्या शासन निर्णय देण्यात आले आहे. याच बरोबर राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत परंपरागत कृषी विकास योजना सन 2024-25 मध्ये राबवण्यासाठी उर्वरित निधी वितरित करण्याबाबतचा निर्णय आज घेण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत नैसर्गिक शेतीसाठी निधी वितरित केला जातो.

एकंदरीत अनेक दिवसांपासून योजनांच्या संदर्भातील निधीचे वितरण रखडलेले होते. या आजच्या दिवसातील काही शासन निर्णयामुळे या योजनांतील पात्र शेतकऱ्यांना या निधीचा लाभ होण्यास मदत होणार आहे.

इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment