Light Bill 2025 मुंबई घरगुती औद्योगिक व व्यावसायिक अशा सर्वच ग्राहकांच्या वीज दरात आगामी पाचही वर्षात कपात करण्याचा आदेश देत महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने वीज ग्राहकांना दिलासा दिला आहे.

या निकालानुसार राज्यात पहिल्या वर्षी दहा टक्के तर पुढे टप्प्याटप्प्याने पाच वर्षात 26 टक्के पर्यंत वीजदर कमी होणार आहेत. राज्यात 100 युनिट पेक्षा कमी वीज वापरणाऱ्यांचे प्रमाण हे 70 टक्के आहे.
आधार कार्ड बँकेला लिंक नाही तर योजनेचे अनुदान मिळणार नाही, वाचा सविस्तर;
त्यांच्यासाठी जुलैपासून 10 टक्के इतके सर्वाधिक दर कमी होतील. 100 पासून 500 युनिट पर्यंतचे वीज वापरणाऱ्या ग्राहकांना एक जुलैपासून वाढीव दराने विजेचे बिल भरावे लागणार आहे.

Light Bill 2025 असा होईल दरात बदल
युनिट | आताचे दर | 1 जुलैपासून |
बीपीएल | 1.74 | 1.48 |
1 ते 100 | 6.32 | 5.74 |
101 ते 300 | 12.23 | 12.57 |
301 ते 500 | 16.77 | 16.85 |
500 वर | 18.93 | 19.15 |
Light Bill 2025 सौर ऊर्जेसाठी प्रोत्साहन!
Light Bill 2025 राज्याच्या इतिहासात प्रथमच महावितरणाने वीजदरात कपाचा प्रस्ताव सादर केला होता. स्मार्ट मीटर असलेल्या घरगुती ग्राहकांना दिवसा वीज वापरासाठी दहा टक्के अतिरिक्त टीओडी सवलत आणि सौरऊर्जा निर्मिती करणाऱ्या घरगुती ग्राहकांना प्रोत्साहन अशी आयोगाची आदेशाची वैशिष्ट्ये, आहेत.
“आयोगाने महावितरणच्या याचिकेवर वीज ग्राहकांना दिलासा देणारा निर्णय दिल्याबद्दल आभारी आहोत. या आदेशाचा लाभ घरगुती ग्राहक, औद्योगिक ग्राहक आणि व्यावसायिक ग्राहक अशा तीनही वर्गवारीत होणार आहे. बळीराजाला दिवसा व खात्रीचा वीज पुरवठा होण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 चे काम सुरू आहे. सोबतच आगामी काळात वीज खरेदी करारांमध्ये हरित ऊर्जेवर मोठ्या प्रमाणात भर दिल्यामुळे वीज खरेदी खर्चात बचत होणार आहे. त्यामुळे हा दर कमी करण्याचा प्रस्ताव महावितरण ला मांडता आला. – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री”
“ वीजदर कपातीमुळे घरगुती ग्राहकांना दिलासा तर उद्योग व्यवसायांना चालना मिळणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला आश्वासनाचे पालन झाले आहे. – लोकेश चंद्र, महावितरण चे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक “
इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |