Lemon Crop Insurance 2025 लिंबू पिकासाठी मृग बहारासाठी योजना अधिसूचित जिल्हा, अधिसूचित तालुक्यातील, अधिसूचित महसूल मंडळात राबविण्यात येते. सदर योजना कार्यान्वित करणारी विमा कंपनी शासनाच्या महादेव प्रकल्पांतर्गत स्थापन केलेल्या हवामान केंद्रामध्ये नोंदवल्या गेलेल्या हवामान तपशीलनुसार विमा योजनेत भाग घेतलेल्या शेतकऱ्यांना परस्पर नुकसान भरपाई देईल.

नमूद केलेल्या विमा संरक्षण कालावधीत निवडक हवामान धोक्यामुळे होणाऱ्या संभाव्य पीक नुकसानीस आर्थिक विमा संरक्षण प्रदान होईल. लिंबू बाग चार वर्षे पूर्ण झालेल्या उत्पादनक्षम बागेस विमा संरक्षण राहील.
मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा हवामान सल्ला वाचा सविस्तर;
विमा संरक्षण रक्कम: | प्रति हेक्टरी 80,000 रुपये |
भाग घेण्यासाठी: | अंतिम दि. 30 जून 2025 |
शेतकऱ्यांसाठी विमा: | हफ्ता 4,000 रुपये प्रति हेक्टरी |

Lemon Crop Insurance 2025 या योजनेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्यांचा ॲग्रीस्टॅक नोंदणी क्रमांक आवश्यक आहे.
या योजनेत सर्व शेतकरी भाग घेऊ शकतात. पीक कर्ज घेणाऱ्या आणि बिगर कर्जदारांसाठी योजनेतील सहभाग ऐच्छिक राहणार आहे.
आवश्यक्य कागदपत्रे ऍग्रीस्टॅक नोंदणी क्रमांक, आधार कार्ड, जमीन धारणा 7/12, 8 अ उतारा, पिक लागवड स्वयंघोषणा पत्र, फळबागेचा जिओ टॅग केलेला फोटो, बँक पासबुक वर खात्याबाबत सविस्तर माहिती. कॉमन सर्विस सेंटर मार्फत अर्ज ऑनलाइन करता येतील. विमा योजनेत समाविष्ट जिल्हे आणि संबंधित कंपनी.
या विमा योजनेअंतर्गत हवामान धोक्याचा ट्रिगर कार्यान्वित झाल्यास त्या महसूल मंडळातील त्या पिकासाठी भाग घेतलेल्या शेतकऱ्यास नुकसान भरपाई रक्कम संबंधित विमा कंपनीकडून देण्यात येणार आहे.
शेतकऱ्यांनी फळपीक लागवड केलेली असताना किंवा उत्पादन योग्य फळपीक नसताना, दुसऱ्याच्या जमिनीवर किंवा शासनाच्या जमिनीवर, अकृषक जमिनीवर विमा काढून विमा योजनेत सहभाग घेतल्यास त्याच्याविरुद्ध कडक कारवाई होऊ शकते. यासाठी शेतकऱ्यांकडे उत्पादन योग्य व वयाची फळबाग आहे, त्यांनीच योजनेत सहभाग घ्यावा.
Lemon Crop Insurance 2025 या योजनेत प्रति शेतकरी सहभागासाठी कोकण विभागासाठी एका फळपिका खालील कमीत कमी उत्पादनक्षम क्षेत्र 10 गुंठे आणि उर्वरित विभागासाठी कमीत कमी उत्पादनक्षम क्षेत्र 20 गुंठे कशी मर्यादा राहील. तसेच, जास्तीत जास्त क्षेत्र मर्यादा ही सर्व फळपिके व दोन्ही हंगाम मिळून प्रति शेतकरी चार हेक्टर मर्यादेपर्यंत राहील.
विमा योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी आणि विमा नुकसान भरपाई मिळवण्यासाठी शेतकऱ्याचे बँक खाते आधार कार्ड पेमेंट साठी लिंक असावे.
हवामान धोका व कालावधी आणि प्रमाणके (ट्रिगर)व नुकसान भरपाई रक्कम (प्रति हेक्टरी)
कमी पाऊस 15 जून ते 15 जुलै या कालावधीमध्ये 100 मि.मी. आणि त्यापेक्षा कमी पाऊस झाल्यास नुकसान भरपाई रक्कम 40,000 रुपये देय होईल. या कालावधीत 100 मि.मी. पेक्षा जास्त 150 मि.मी. पर्यंत पाऊस झाल्यास नुकसान भरपाई 20,000 रुपये देय होईल. कमाल नुकसान भरपाई रक्कम चाळीस हजार रुपये.
Lemon Crop Insurance 2025 विमा योजनेत समाविष्ट जिल्हे आणि संबंधित कंपनी
जिल्हा | विमा कंपनी |
जळगाव, नांदेड, हिंगोली, यवतमाळ, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, वर्धा, रत्नागिरी | भारतीय कृषी विमा कंपनी लिमिटेड |
जालना | फ्युचर जनरली इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड |
छत्रपती संभाजी नगर, धाराशिव, अमरावती, अकोला, नागपूर, परभणी, रायगड ,नंदुरबार | युनिव्हर्सल सोंपो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड |
ठाणे, पालघर, धुळे, पुणे, सांगली, लातूर, बुलढाणा, नाशिक, अहिल्यानगर, सोलापूर, सातारा, बीड, वाशिम | बजाज अलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड |
Lemon Crop Insurance 2025 पावसाचा खंड 16 जुलै ते 15 ऑगस्ट सदर कालावधीमध्ये सलग 15 ते 21 दिवसांचा पावसात खंड पडून दिवसाच्या जास्तीत जास्त तापमान कोणत्याही दिवशी 35 अंश सेल्सियस किंवा त्यापेक्षा जास्त राहिल्यास नुकसान भरपाई रक्कम 20,000 रुपये देय राहील.
इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |