पालेभाज्या लागवड साधा!! Leafy Vegetable Cultivation 2025

Leafy Vegetable Cultivation 2025 शेतकरी मित्रांनो अलीकडे उडीद, मूग, तीळ ही कमी कालावधीची पिके काढणी संपली असेल. पावसाचे प्रमाण सुद्धा कमी झाले आहे. याशिवाय बाजारात हिरव्या पालेभाज्यांची मागणी वाढलेली असेल तर कमी कालावधीत येणाऱ्या पालेभाज्यांची लागवड करून कमी कालावधीत चांगले उत्पादन व उत्पन्न घेता येते.

Leafy Vegetable Cultivation 2025

Leafy Vegetable Cultivation 2025 अल्प कालावधीत चांगला आर्थिक फायदा तर होतोच पण पिकांची फेरपालट होऊन जमिनीची सुपीकता पण राखली जाते. जमिनीची भौतिक, रासायनिक व जैविक गुणवत्ता वृद्धी होऊन, भविष्यकालीन जमिनीचे चांगले जतन करता येते. स्थळपरत्वे वेगवेगळ्या पालेभाज्यांची लागवड केली जाते.

शेतकऱ्यांकडील सोयाबीन संपले आणि ‘या’ बाजारात झाली तीनशे रुपयांनी दरवाढ!! 

अतिसंवेदनशील असतात म्हणून योग्य निचऱ्याची जमीन लागवडीसाठी निवडावी. मध्यम ते भारी जमीन पालेभाज्यांसाठी उपयुक्त ठरते पालेभाज्यांचे विविध उपलब्ध आहेत. पालेभाज्या लागवडीसाठी सपाट वाफे, गादी वाफे किंवा रुंद सरी वरंबा पद्धतीचा वापर करावा. शक्यतो पाणी साचणार नाही याबाबत दक्षता घ्यावी. जास्त भारी काळ्या जमिनीवर सरी वरंबा किंवा रुंदी सरीवरंबा या पद्धती वापराव्यात.

WhatsApp Group Join Now

Leafy Vegetable Cultivation 2025 तसेच हलक्या पण पाण्याचा निचरा असणाऱ्या जमिनीत सपाट वाफे पद्धतीचा वापर व्हावा. पूर्व पीक काढणी नंतर शेताची मशागत करून हाताळणी योग्य अशा वाफ्याची निर्मिती करून घ्यावी. बीजप्रक्रिया करून लागवड करणे फायदेशीर ठरते. कारण यामुळे बियाणांची जास्तीची लवकर उगवणी होते. पीक कालावधीत बचत होऊन व्यवस्थापन खर्च वाचतो. शिवाय एकसारखे गुणवत्ता व उत्पन्न मिळून चांगला आर्थिक फायदा होतो. वेगवेगळ्या पालेभाज्यांसाठी वेगवेगळे बीजप्रक्रिया करावी लागते.

Leafy Vegetable Cultivation 2025 कोथिंबीर:

सर्वांना सातत्याने लागणारे कोथिंबीर पालेभाजी या गटात मोडते इतर भाज्यांना स्वाद देण्याचे कार्य कोथिंबीर करते. दोन प्रकारच्या स्थानिक जाती यात बारीक तसेच जाड बी हे प्रकार आढळतात. बी हलकेच भरडतात दोन भाग होऊन त्यावरील आवरणावर ओरखडे होऊन भिजण्यास योग्य होते.

असे बी 12 ते 15 तास कोमट पाण्यात किंवा 50 पीएम च्या द्रावणात भिजवावे नंतर 24 तास गोणपाठात बांधावे पेरणी करावी. सर्वसाधारणतः 8 ते 10 दिवसात पूर्ण उगवण होते. पेरणीनंतर पंधरा दिवसांनी 10:26:26, 25 ग्रॅम ते 50 ग्रॅम प्रति वाफा टाकावे. काढणीपूर्वी 10 ते 12 दिवस आधी त्या पिकावर 25% ची युरिया फवारणी करावी.

WhatsApp Group Join Now

लागवड टप्प्याटप्प्याने करावी यामुळे योग्यवेळी काढणी करणे व बाजारात पाठवणे सोयीचे होईल काढणी करताना ती मुळासहित उपटावेत काही संकरित जातींची कारणी ही कापणी करूनच करतात. कापणीनंतर परत पिकांना मुख्य पिकाप्रमाणे खते देऊन दुसरे एक खोडवा पीक घेतात.

Leafy Vegetable Cultivation 2025 पालक:

चांगली अन्नद्रव्य असलेली सर्वांना आवडणारी भाजी म्हणजे पालक. वर्षभर येणारी पालेभाजी आहे. ग्रामीण भागात स्थानपरत्वे नुसती पालक किंवा शेपू सोबत भाजी करून खातात. पालक भाजीच्या एकूण 2-3 कापण्या करतात. प्रती हेक्टरी 20-25 किलो बियाणे लागते. भिजवून बीजप्रक्रिया करतात. वाफे बनवण्यापूर्वी किंवा संपूर्ण उगवण झाल्यानंतर खताचा प्रति वर्ग मीटर 550 ग्रॅम 10:26:26 या खताचा हप्ता देतात.

लागवडीनंतर 30-40 दिवसात काढण्यात येते काढणी कापणी करून करतात. कापणी नंतर बाहेर स्वच्छ करून 200 ते 300 ग्रॅम वजनाच्या जुड्या बांधून बाजारपेठेत पाठवतात. कापणी नंतर वाफ्याची सर्वसाधारण स्वच्छता करून परत खत देऊन दुसरी कटिंग घेतली जाते. चांगल्या गुणवत्तेसाठी व उत्पादनासाठी फवारणीतून पाण्यात विरघळणारी खते द्यावीत.

Leafy Vegetable Cultivation 2025 शेपू:

स्थान परत्वे काही ठिकाणी पालकासोबत तर काही ठिकाणी नुसती शेपूची भाजी करतात. प्रती हेक्टरी 8 ते 10 किलो बी लागते. बी बारीक असल्याने ते वाळून 1:1 या प्रमाणात मिसळून पेरणी करावी. सर्व व्यवस्थापन पालक भाजी प्रमाणेच करावे. यांची काढणी सुद्धा पेरणीनंतर 35 ते 45 दिवसात फुले येण्यापूर्वी करावी. गड्ड्या बांधून बाजारात विक्रीस पाठवावे.

Leafy Vegetable Cultivation 2025 पोफळा:

ही सुद्धा भरपूर अन्नद्रव्ये खनिजे असणारी पालेभाजी असून स्थानिक वाणात हिरव्या पानाची व हिरवी दांडी हिरव्या पानाची व लाल दांडी, तसेच पानाचा वरचा भाग हिरवा व खालचा भाग लालसर तर काही वाणात वरचा वखालचा भाग दोन्ही गर्द लाल किंवा गुलाबी या प्रकारचे आढळतात. लवकर येणारी असून खूप मागणी असते. राजगिरा सारखी रोपे दिसतात या भाजीच्या अनेक स्थानिक जाती असून त्या अल्प खताच्या मात्रेवर येतात.

फुले तुरा येण्यापूर्वी भाजी मुळासहित उपटून किंवा जमिनीलगत कापून काढणी करतात. स्वच्छ करून जोडी बांधून बाजारात विक्रीसाठी पाठवतात. ही भाजी सुद्धा पावसाळा सोडून (जून जुलै) इतर हंगामात पेरणी करतात. प्रती हेक्टरी एक ते दीड किलो बी लागते. बी अतिशय बारीक असल्याने माती किंवा वाळू सोबत मिसळून पेरणी करावी.

पालेभाज्या लागवडीसाठी खाली नमूद केलेल्या बाबी महत्वाच्या ठरतात.

निचरा असलेली व भरपूर सेंद्रिय पदार्थ असलेली जमी.

टप्प्याटप्प्याने लागवडीचे नियोजन, मागणीप्रमाणे वाण निवड.

फवारणीतून खते नियोजन.

योग्य व्यवस्थापन.

फुले येण्यापूर्वी काढणी.

प्रतवारी व गड्ड्याच्या स्वरूपात बाजारपेठेसाठी पाठवणी.

इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment