Land Record Department 2025 पुणे: शेतकरी कुटुंबातील वडिलोपार्जित जमिनीच्या हिश्याची करण्यासाठी आता प्रत्येक पोटहिश्यासाठी केवळ 200 रुपये शुल्क आकाराले जाणार आहे.

Land Record Department 2025 या निर्णयामुळे नोंदणीकृत वाटणीपत्राच्या आधारे जमिनीचे विभाजन करून घेणाऱ्या शेतकऱ्यांचा जमीन मोजणीसाठी लागणार मोठा आर्थिक भार कमी होणार आहे.
सद्यस्थितीत कांदा पिकातील रोगांचे नियंत्रण!!
Land Record Department 2025 भूमीअभिलेख विभागाने शेतकऱ्यांसाठी हा एक महत्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे.

Land Record Department 2025 यापूर्वी वडिलोपार्जित जमिनीच्या मोजणीसाठी प्रति हिस्सा एक ते 14 हजार रुपयांपर्यंत शुल्क आकारले जात होते. ज्यामुळे शेतकऱ्यांवर मोठा आर्थिक ताण पडत होता.
भूमिअभिलेख विभागाने आता यात बदल करून प्रति पोटहिस्सा केवळ 200 रुपये शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. हि योजना राज्यभर लागू करण्यात अली आहे. तसे पत्र जमाबंदी आयुक्त डॉ. सुहास दिवसे यांनी काढले आहे.
भूमीअभिलेख विभागाच्या महाभूमीअभिलेख या संकेतस्थळावर एकत्र कुटुंब पोटहिस्सा मोजणी यात त्याचा समावेश करण्यात आला आहे. तसेच ‘ई-मोजणी व्हर्जन 2.0’ या संगणक प्रणालीतही त्याचा समावेश करण्यात आला आहे.
त्यामुळे जमिनीच्या मालकी हक्काबाबत स्पष्टता येण्यास मदत होणार आहे. तसेच पोटहिस्सा मोजणीची प्रक्रिया सुलभ आणि स्वस्थ होणार आहे. कुटुंबांतर्गत जमिनीच्या वाटणीच्या वादावर निर्माण होणारे वाद मिटण्यासही यामुळे मदत होईल.
कायदेशीर आधार Land Record Department 2025
अनेकदा वडिलोपार्जित जमिनीचे कागदोपत्री वाटप केले जाते, त्याला कायदेशीर आधार प्राप्त होत नाहीत. भविष्यात त्यावरून वाद सुरु होतात. ते कमी करण्यासाठी हा निर्णय लागू करण्यात आला आहे.

| इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |