Land Cultivation 2025 शेती मग ती बागायती असो कोरडवाहू चीरस्थायी शेती उत्पादन मिळवण्यासाठी संपूर्ण शेती शाश्वत कशी करता येईल हे पाहिले पाहिजे. नैसर्गिक साधन सामग्रीमध्ये जमीन, पाणी, हवामान ही महत्त्वाचे घटक येतात. या तीनही घटकांमध्ये जमिनीला अनन्य साधारण महत्त्व आहे. शेतीमध्ये जमिनीची उत्पादकता टिकवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी या नैसर्गिक साधनसंमग्रीचे संवर्धन करणे अत्यंत आवश्यक आहे.

जमिनीमध्ये चांगले पीक घेण्याकरिता त्या जमिनीचे भौतिक रासायनिक व जैविक गुणधर्म टिकवून ठेवण्यासाठी जमिनीच्या मशागतीस म्हणून अनन्य साधारण महत्त्व आहे. पिकाची पेरणी होण्यापूर्वी जमिनीची जी मशागत केली जाते त्यास पूर्व मशागत असे म्हणतात. या पूर्व मशागतीस पीक उत्पादन वाढीच्या दृष्टीने अनन्य साधारण महत्त्व आहे. जमिनीची मशागत म्हणजे पिकाच्या वाढीसाठी जमिनीचा कठीण व घट्ट पृष्टभाग विशिष्ट खोलीपर्यंत फोडून जमिनीला चांगल्या स्थितीत आणणे.
कापूस पिकाचे सुधारित लागवड तंत्रज्ञान!!
Land Cultivation 2025 शेतकरी जमिनीची मशागत अनेक कारणांसाठी करत असतो. बियांचे अंकुरण आणि मुळांची वाढ होण्याकरिता जमीन मोकळी व भुसभुशीत करणे गरजेचे आहे. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे तणांचा नायनाट करणे पूर्वमशागतीमध्ये नांगरट, कुळवण ,ढेकळे फोडणे, किंवा वखरने, सपाटीकरण खत मिसळवणे, जमीन घट्ट करणे, सरी काढणे, इत्यादी. कामांचा मशागतीत समावेश होतो.

प्रत्येक जमिनीची दरवर्षी नावरट करावीच असे नाही. आपल्या जमिनीच्या आणि आपण घेणाऱ्या पिकाच्या गरजेनुसार ही मशागत करण्याची गरज आहे. त्याकरिता त्या जमिनीतील मागील पीक, पुढे घ्यावयाचे पीक, जमिनीचा प्रकार आणि हवामान इत्यादींवर अवलंबून असते.
Land Cultivation 2025 नांगरट कशी करावी?
नांगरटीचे उद्देश साध्य होण्यासाठी पूर्वीचे पीक काढल्याबरोबर लगेच नांगरट करणे फायद्याचे ठरते. कारण यावेळी जमिनीत ओलावा असल्याने नांगरटीचे काम हलके होते, ढेकळे निघत नाहीत, नांगरट खोलवर होते, पूर्वीच्या पिकाचा पालापाचोळा काडीकचरा जमिनीत गाडला जातो व जमिनीस सेंद्रिय पदार्थांचा पुरवठा होतो.
रब्बी उन्हाळी हंगामातील पिके काढल्यानंतर म्हणजे सर्वसाधारणपणे मार्च एप्रिलमध्ये त्वरित नांगरण्या कराव्यात. हलक्या जमिनी पीक काढण्याच्या वेळी घट्ट होतात. म्हणून एप्रिल किंवा मे महिन्यात वळवाचा पाऊस पडल्यानंतर किंवा पावसाळ्याच्या सुरुवातीला पहिला पाऊस पडल्यानंतरच नांगराव्यात.

Land Cultivation 2025 नांगरट किती खोल करावी?
हंगामात घ्यावयाच्या पिकानुसार, नांगरटीची खोली ठरवावी. सर्व साधारणपणे ऊस, बटाटा, आले, भाजीपाला इत्यादी. बागायती पिकांसाठी जमिनीची 15 ते 20 सेंटीमीटर खोल नांगर करणे आवश्यक्य आहे. ज्वारी, बाजरी, गहू या पिकांसाठी जमीन 10 ते 15 सेंटीमीटर खोल नांगरावी.
नांगरटीचे फायदे
नांगरटीमुळे जमीन भुसभुशीत होते, त्यामुळे पावसाचे व ओलिताचे पाणी जमिनीत सहज मुरते.
जमिनीत हवा खेळती राहते व पाण्याचा चांगला निचरा होतो.
थरांची उलथापालथ होते जमीन भुसभुशीत होते.
हवा पाणी आणि उष्णता जमिनीत योग्य प्रमाणात खेळती राहते.
पिकांचे अवशेष जमिनीत गाडले जाऊन जमिनीची प्राकृतिक रासायनिक व जैविक अवस्था सुधारते.
जमिनीतील सेंद्रिय पदार्थांचे विघटन जलदरीत्या होऊन पिकांना आवश्यक्य असणारी अन्यद्रव्य मुक्त होतात व जमिनीतील जिवाणूंची वाढ होते.
पिकांची धसकटे, फुटलेले कंद किंवा कोंब काढण्यास मदत होते.
तणांचे बी नांगरटीमध्ये खोल गाळल्यामुळे स्तनांचा नाश होण्यास मदत होते.
पिकांच्या मुळांची योग्य वाढ होऊन वेगवेगळ्या थरातील अन्नद्रव्य पिकाला उपलब्ध होतात.
जमिनीस भरपूर सूर्यप्रकाश मिळतो व उष्णता जमिनीस पोषक ठरते.
तसेच जमिनीची पाणी साठवून ठेवण्याची क्षमता वाढते.
अशाप्रकारे नांगरटीमुळे जमिनीची भौतिक, रासायनिक व जैविक अवस्था सुधारते.
Land Cultivation 2025 ढेकळे फोडणे
जमिनीत पुरेसा ओलावा नसल्यास किंवा पीक काढल्यानंतर जमीन नांगरण्यास वेळ गेल्यास मध्यम व भारी जमिनीत ढेकळे निघतात, अशा जमिनीत खरिपाची पिके घ्यावयाची असल्यास पहिला पाऊस पडेपर्यंत ढेकळे तसेच राहू द्यावी. पावसामुळे व उन्हामुळे ढेकळे नरम होऊन फुटण्याचे काम आपोआप होते. दोन्ही हंगामात पिके घ्यावयाचे असल्यास बैल अवजाराच्या साह्याने किंवा ट्रॅक्टर साह्याने ढेकळे फोडावेत. पाणी उपलब्ध असल्यास पाणी दिल्याने ढेकळे नरम पडतात व नंतर मैद फिरवल्याने ढेकळे फुटतात. जमीन सपाटीकरण होते व उगवून आलेले तणही मरून जाते.
ढेकळे फोडण्याचे फायदे!!
ढेकळे फोडणे जमीन सपाट करण्यास सुलभ होते, जमिनीस कुळव्याच्या पाळ्या देता येतात. जमिनीत शेणखत चांगले पसरवता येते. सरी सरळ रेषेत येते, गादीवाफे सहजरीत्या तयार करता येतात. ढेकळे फोडल्याने पूर्वीच्या पिकांची धसकटे, काडीकचरा वेचता येतो.
कुळवणी किंवा वखरणी
कुळवणी मुळे जमीन भुसभुशीत होते, जमिनीत हवा खेळती राहते, पिकांची मुळे योगी खोलीपर्यंत वाढतात. तणांचा नाश होण्यास मदत होते. शेवटच्या वखरणीपूर्वी शेतात शेणखत टाकल्यास ते जमिनीत चांगले मिसळते. जमिनीमध्ये सूक्ष्मजीवाणूंची वाढ होण्यास मदत होते.
Land Cultivation 2025 जमीन सपाट करणे
पावसाचे पाणी किंवा पाटाचे पाणी एकाच दिशेने जमिनीतून वाहून न जाता, किंवा कुठेतरी साचून न राहता, ते सर्व ठिकाणी सारखे बसण्यासाठी जमीन सपाट करण्याची आवश्यकता असते. त्यामुळे पिकांची एकसारखी वाढ होण्यास मदत होते. हे पूर्व मशागतीचे काम प्रत्येक जमिनीत व दरवर्षी करण्याची आवश्यकता नसते.

शेणखताचा/कंपोस्ट खताचा वापर
जमिनीचा भुसभुशीतपणा टिकवून राहण्यासाठी तिच्या कणांची रचना सुधारली पाहिजे, यासाठी सेंद्रिय खते म्हणजे शेणखत अथवा कंपोस्ट खताचा वापर करणे महत्त्वाचे आहे. शेणखताच्या वापराने जलधारण शक्ती वाढते पूर्वमशागतीच्या कामात शेणखत घालण्याच्या कामाचा अंतर्भाव करावा अशा रीतीने शेतकऱ्यांना आपल्या जमिनीची पूर्व मशागत करावी.
सोईल सोलरायझेशन (जमीन नांगरून तापू देणे)
खरीप आणि रब्बी पिके घेतल्यानंतर उन्हाळा सुरू होण्यापूर्वी जमीन नांगरून तापू दिली जाते, या प्रक्रियेस शास्त्रीय भाषेत सॉईल सोलरायझेशन म्हणतात. पूर्वी बैल नांगरणे तर आता ट्रॅक्टर द्वारे ३५ सेल्सिअस पेक्षा अधिक प्रमाणात गेले की 15 सेंटीमीटर खोलपर्यंत जमिनीचे तापमान वाढते. अशा मशागतीमुळे जमिनीतील बुरशी बऱ्याच प्रमाणात नष्ट होते शिवाय ज्या किडी सुक्त अवस्थेत किंवा कोषावस्थेत जातात त्या नष्ट होतात. जमीन तापल्याने जमिनीतील नत्राचे प्रमाण सहा पट वाढते.
Land Cultivation 2025 सूर्यप्रकाशाची गरज जशी प्राणी, वनस्पती, मानव यांना असते. तशीच ती जमिनीला सुद्धा असते, पिकाच्या वाढीसाठी माती भुसभुजित असणे आवश्यक असते. त्याशिवाय मुळांची वाढ उत्तम होत नाही. पाऊस पडतो तो कडक जमिनीवरून पटकन वाहून जातो. ओल खोल पर्यंत जात नाही, नांगरलेल्या जमिनीत पाणी खोलवर जिरते, त्यामुळे जमिनीतील ओल टिकून राहते. त्याचा फायदा पिकाच्या वाढीसाठी होतो, जमीन ओली राहिल्याने सेंद्रिय पदार्थांचे विघटन लवकर होते, त्यामुळे सूक्ष्म अन्नद्रव्य पिकांना सहज उपलब्ध होतात.
इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |