KVK Sagroli 2025 देशभरात सुरू होणाऱ्या विकसित कृषी संकल्प अभियानांतर्गत कृषी विज्ञान केंद्र, सगरोळी जिल्हा नांदेड यांनी ही संपूर्ण तयारी पूर्ण केली असून या अभियानामार्फत कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांपर्यंत आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची माहिती पोहोचवण्याचा निर्धार केला आहे.

या अभियानाचा शुभारंभ 29 मे 2025 रोजी ओडिशातील पुरी येथे केंद्रीय कृषि मंत्री श्री. शिवराज सिंह चौहान यांच्या उपस्थितीत होणार आहे. हा अभियान 15 दिवस चालणार असून, या कालावधीत देशातील 700 होऊन अधिक जिल्ह्यांमध्ये सुमारे 1.5 कोटी शेतकऱ्यांपर्यंत थेट संवाद साधण्यात येणार आहे.
घाटमाथ्यावर पेरणीपूर्वी मशागतींना वेग; कसे आहेत सध्या मशागतीचे दर?
KVK Sagroli 2025 कृषी विज्ञान केंद्र सग्रोळीच्या भूमिका!
सग्रोळी येथील प्रमुख शास्त्रज्ञानाच्या नेतृत्वाखालील नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांपर्यंत माहिती पोहोचण्यासाठी विशेष कार्य योजना आखण्यात आली आहे. या योजनेत पुढील बाबींचा समावेश आहे…..

- खरीप हंगामातील लागवड, तण व्यवस्थापन, रोग-किड नियंत्रण व जलसंधारण यावर प्रात्यक्षिकांचे आयोजन.
- मृदा चाचणी अहवालावर आधारित खत व्यवस्थापन याबाबत मार्गदर्शन.
- पंतप्रधान किसान सन्मान निधी, प्रधानमंत्री फसल विमा योजना, अटल भूमी सुधार योजना यांसारख्या शासकीय योजनांची माहिती.
- स्मार्ट व विज्ञाननिधिष्ठित शेती पद्धतीचे प्रशिक्षण.
- मुलाखती, चर्चासत्रे व संवाद कार्यक्रमांद्वारे शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेणे.
- शेतकऱ्यांच्या अनुभवांच्या आधारे भविष्यातील संशोधनाची दिशा निश्चित करणे.
KVK Sagroli 2025 या ‘आठ’ तालुक्यात राबणार अभियान
- नांदेड जिल्ह्यातील कृषी विज्ञान केंद्र, सगरोळी हे या अभियानाचा भाग म्हणून आठ तालुक्यात काम करणार आहे.
- यात बिलोली, नायगाव, देगलूर, उमरी, धर्माबाद, मुखेड, लोहा आणि कंधार या तालुक्यांचा समावेश आहे.
- प्रत्येक गावात तज्ञ शास्त्रज्ञांची उपस्थिती राहणार असून, शेतकऱ्यांना त्यांच्या शंका व अडचणींवर थेट मार्गदर्शन दिले जाणार आहे.
शेतकऱ्यांना सहभागाचे आवाहन
कृषी विज्ञान केंद्र सगरोळी तर्फे शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येते की त्यांनी या अभियानात जास्तीत जास्त सहभाग घ्यावा नवे ज्ञान मिळवावे आणि आपल्या उत्पादन क्षमतेत वाढ साधावी.
इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |