मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा हवामान सल्ला वाचा सविस्तर; Krushi Salla 2025

Krushi Salla 2025 मराठवाड्यात पुढील काही दिवस वाऱ्याचा वेग, वादळी पाऊस आणि मेघगर्जनेसह हवामानातील बदल जाणवणार आहे. अशा बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी यांनी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा कृषी सल्ला दिला.

Krushi Salla 2025

पीक लागवड, सिंचन, रोग कीड नियंत्रण, तसेच पशुधन व्यवस्थापन यावर आधारित मार्गदर्शन शेतकऱ्यांना नुकसान टाळण्यास आणि उत्पादन वाढवण्यास मदत करणार आहे.

नवीन पिक विमा योजनेत ‘या’ जिल्ह्यातील सोयाबीन पीक वगळले, वाचा सविस्तर;

Krushi Salla 2025 प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी यांच्या अंदाजानुसार, 28 जून पर्यंत मराठवाड्याच्या विविध भागांमध्ये वादळी वाऱ्यासह (30 ते 40 किमी/ताशी) मेघगर्जनेसह हलक्यापासून मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी पीक संरक्षण आणि पशुधन व्यवस्थापनासाठी योग्य ती तयारी ठेवावी.

WhatsApp Group Join Now

Krushi Salla 2025 सामान्य हवामान अंदाज

  • 28 जून पर्यंत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे.
  • कमाल व किमान तापमानात फारसा फरक नाही.
  • बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला असून, पीक व्यवस्थापनात सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे.

पिक व्यवस्थापन सल्ला

कापूस: पेरणी न झालेल्या भागात 75/100 मी.मी. पावसाच्या नंतरच बीजप्रक्रिया करून पेरणी करावी. सूक्ष्म सिंचनाचा वापर करून पाणी द्यावे, अंतरमशागतीची कामे करावी.

तुर: फायटोप्थोरा करपा टाळण्यासाठी तीन फूट खोल व दोन फूट रुंद चर शेताच्या चारही बाजूस काढावेत. पेरणीसाठी 15 जुलै पर्यंत ची मुदत आहे.

WhatsApp Group Join Now

मूग/उडीद: योग्य पावसाचा नंतर बीज प्रक्रिया करून जुलै च्या पहिल्या आठवड्यात पेरणी पूर्ण करावी. तन नियंत्रण व सूक्ष्म सिंचन करावे.

भुईमूग/मका: पेरणी अनुक्रमे 7 जुलै आणि जुलै अखेरपर्यंत करता येईल. लागवडीनंतर सूक्ष्म सिंचन व तन नियंत्रण आवश्यक आहे.

Krushi Salla 2025 फळबाग व्यवस्थापन

आंबा, केळी, सिताफळ लागवड: केवळ शासकीय नोंदणीकृत रोपवाटिकेतूनच रोपे खरेदी करावीत. लागवडीनंतर ठिबक सिंचन आणि खत व्यवस्थापन करावे.

द्राक्ष: , रोगग्रस्त पाणी काढून टाकावेत, बगल फुटे हा हटवाव्यात, बांधणी करावी, योग्य फवारणी व ठिबक सिंचन करावे.

Krushi Salla 2025 भाजीपाला व फुल शेती सल्ला

  • गादी वाफ्यावरतणनियंत्रण करावे.
  • झाऱ्याच्या साह्याने पाणी घालावे.
  • काढणीस तयार असलेले पीक तातडीने काढावे.

Krushi Salla 2025 पशुधन व्यवस्थापन

  • निवारा स्वच्छ व कोरडा ठेवावा.
  • गोठाच्या सभोवताली पाणी साचणार नाही याची काळजी घ्या.
  • दर पंधरा दिवसांनी पोटॅशियम परमॅग्नेटने गोठा निर्जंतुक करावा.

इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment