मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा हवामान व पिक सल्ला! वाचा सविस्तर; Krushi Salla 2025

Krushi Salla 2025 कृषी सल्ला: सध्या हवामानात अनेक मोठे बदल होत आहेत. मराठवाड्यात येत्या काही दिवसांमध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे. मात्र, पाऊस सरासरीपेक्षा कमी राहणार आहे. त्यामुळे पेरणीची घाई न करता योग्य नियोजन करणे आवश्यक्य असल्याचा सल्ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने दिला आहे.

Krushi Salla 2025

WhatsApp Group Join Now

हवामानाचा अंदाज…!

  • 31 मे रोजी काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे

पाऊस पुन्हा सक्रिय; राज्यात पुढील दोन दिवसात ‘या’ ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज!

  • एक ते तीन जून रो जी तूर डाळ ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे
  • चार ते बारा जून दरम्यान सरासरी पेक्षा कमी पाऊस व तापमान बदल होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे

Krushi Salla 2025 तापमान

  • कमाल तापमान दोन ते चार अंश सेल्सिअस मध्ये मांडण्याची शक्यता
  • किमान तापमान फारसा बदल नाही

WhatsApp Group Join Now
Krushi Salla 2025 पीक व्यवस्थापन

सोयाबीन

  1. सोयाबीन पेरणीसाठी आधी लवकर येणारी वाण: परभणी सोना (एम यु एस-47),
  2. लवकर येणारे वाण: एम यु एस-71 (समृद्धी), एम यु एस-158, एम यु एस-612, जवाहर (जेएस-335), शक्ती एम यु एस-81
  3. मध्यम उशिरा येणारे वाण: प्रसाद (एम यु एस-1)प्रतिकार प्रतिष्ठा (एम यु एस 61-2) आधी वाणांचा वापर करावा.
  4. सोयाबीन पिकाच्या पेरणीपूर्वी शेतकऱ्यांनी बियाणांची उगवण क्षमता तपासून घ्यावी. उगवण क्षमता 70 % पेक्षा जास्त असेल तरच बियाणे पेरण्यासाठी वापरावे. जमिनीत वापसा असताना पूर्व मशागतीची कामे राहिली असल्यास पूर्व मशागतीची कामे करून घ्यावीत.

Krushi Salla 2025 खरीप ज्वारी

खरीप येण्यासाठी संकरित वाण: सी एस एच-१४, सी एस एच-16, सी एस एच-25(परभणी साईनाथ) सुधारित वाण: परभणी शक्ती, पीव्हीके-809, पीव्हीके-801, (परभणी श्वेता) आदी वाणांचा वापर करावा.

बाजरी

बाजरीच्या पेरणीसाठी संकरित वाण सगळी श्रद्धा शांती एएचबी-1269, एएचबी-1200 (एफई)

सुधारित वाण: आयटीसीपी, समृद्धी, परभणी संपदा या वाणांचा वापर करावा.

ऊस

ऊस पिकांवर पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास, प्रादुर्भावग्रस्त पाने काढून नष्ट करावेत, पिवळा चिकट सापळ्यांचा पिकात वापर करावा, रसायनिक कीटकनाशके व्यवस्थापनासाठी क्लोरोपायरीफॉस 20% ते 30 टक्के मिली किंवा इमिडायक्लोप्रिड 17.8% 3 मिली किंवा असिफेट 75% 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून वापरावे.

हळद

हळद लागवडीसाठी सेलम, कृष्णा, राजापुरी, फुले, स्वरूप या सुधारित जातींची निवड करावी.

फळ बागेचे व्यवस्थापन

संत्र मोसंबी

संत्र मोसंबी लागवडीसाठी 1 X1X1 मीटर या आकाराचे खड्डे घेऊन त्यात अर्धा किलो सुपर फॉस्फेट तीन ते चार घमेली शेणखत किंवा कंपोस्टखत व पोयटा माती यांनी खड्डे भरून घ्यावे.

संत्रा नवीन बाग लागवडीसाठी नागपूर संत्र, किन्नो मोसंबी नवीन बाग लागवडीसाठी न्यू सेलर सातगुडी व फुले मोसंबी आधी जातींची निवड करावी.

लागवडीसाठी शासकीय नोंदणीकृत रोपवाटिकेतून रोपांची खरेदी करावे आंबे बहार संत्र मोसंबी बागेत रोगनाशकाची फवारणी पावसाची उघडीप बघून करावी.

Krushi Salla 2025 डाळिंब

डाळिंब लागवडीसाठी घेतलेले खड्डे चांगली माती+ चांगले कुजलेले व रापलेले शेणखत 1 ते 1.5 किलो सिंगल सुपर फॉस्फेट पालापाचोळा यांनी जमिनीपासून वर पंधरा ते वीस सेंटीमीटर खडे व मधोमध एक बाजूची काठी लावावी. डाळिंब नवीन भाग लागवडीसाठी भगवा फुले भगवा सुपर आरकता आली जातींची निवड करावी.

चिकू

चिकू लागवडीसाठी घेतलेले 1X1X1मीटर आकाराचे खड्डे अर्धा किलो सुपर फॉस्फेट, 1.3 या प्रमाणात शेणखत+ माती या मिश्रणाने खड्डे भरावे. नवीन बाग लागवडीसाठी कालीपत्ती, क्रिकेट बॉल, आदी जातींची निवड करावी .लागवडीसाठी शासकीय आणि नोंदणीकृत रोपवाटिकेतूनच रोपांची खरेदी करावी .

भाजीपाला

Krushi Salla 2025 खरीप हंगामात भाजीपाला लागवडीसाठी रोपे तयार करण्यासाठी गादीवाफे तयार करून घ्यावे. मिरची पिकांच्या लागवडीसाठी परभणी तेजस, पुसा, ज्वाला अग्निरेखा फुले ज्योती जी 4 जी 3 आधी जातींची निवड करावी.

टोमॅटो पिकाच्या लागवडीसाठी देवगिरी, परभणी यशश्री एटीएच-1 पुसारूबी,धनश्री, भाग्यश्री, आकारक शक् आदी जातीची निवड करावी. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करावी.

फुल शेती

खरीप हंगामा फुल पिकांच्या लागवडीसाठी रोपे तयार करण्यासाठी गादीवाफे तयार करून घ्यावेत गुलाब पिकांच्या लागवडीसाठी सुपरस्टार डबल डिलाईट रेड मास्टर पी जातींची निवड करावी काढणे तयार असलेल्या फुल पिकांची काढणी करून घ्यावी.

इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment