अवकाळी पावसाचा अंदाज घेऊन पिकांचे करा नियोजन कृषी सल्ला, वाचा सविस्तर; Krushi Salla 2025

Krushi Salla 2025 मराठवाड्यात येत्या 24 तासात अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकांचे नियोजन करताना काय काळजी घ्यावी, याविषयीचे कृषी सल्ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने जारी केला आहे.

Krushi Salla 2025

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाड्यात 20 मार्च रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, परभणी व हिंगोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या स्वरूपाच्या पावसाची तर 21 मार्च रोजी परभणी, हिंगोली व नांदेड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्‍यता आहे.

राज्यातील बाजार समितीमध्ये गव्हाची आवक वाढली वाचा आजचे गहू बाजारभाव;

Krushi Salla 2025 हवामान सारांश / चेतावनी

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाड्यात 20 मार्च रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, परभणी व हिंगोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या स्वरूपाच्या पावसाची तर 21 मार्च रोजी परभणी, हिंगोली व नांदेड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्‍यता आहे.

WhatsApp Group Join Now

मराठवाड्यात येत्या 24 तासात कमाल तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही व त्यानंतर हळूहळू घट होण्याची शक्यता आहे तर पुढील दोन दिवसात किमान तापमानात हळूहळू वाढ होऊन त्यानंतर फारशी तफावत जाणवणार नाही.

सामान्य सल्ला

विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 20 ते 26 मार्च दरम्यान कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरी एवढे ते सरासरीपेक्षा किंचित जास्त राहण्याची शक्यता आहे.

सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालुकानिहाय छायाचित्रानुसार मराठवाड्यात बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला आहे.

संदेश !

पुढील चार दिवस तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज लक्षात घेता काढणी केलेल्या पिकाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. कापूस पिकाच्या पऱ्हाट्या काढून त्याची योग्य विल्हेवाट लावावी जेणेकरून गुलाबी बोंड अळीच्या जीवन क्रमात घट पडेल.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषी हवामान आधारित कृषी सल्ल्याची शिफारस केली आहे.

WhatsApp Group Join Now

Krushi Salla 2025 पीक व्यवस्थापन

रब्बी ज्वारीकाढणीस तयार असलेल्या ज्वारी पिकाची काढणी व मळणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. मळणी केलेला माल उन्हात वाळवून साठवणूक करावी.
गहूकाढणीस तयार असलेल्या गहू पिकाची काढणी व मळणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. मळणी केलेला माल उन्हात वाळवून साठवून करावी.
मकामका पिकास आवश्यकतेनुसार पाणी द्यावे. मका पिकात लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोएट 5 टक्के 4 ग्रॅम किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी 4 मिली प्रति 10 लिटर मिसळून वरील कीटकनाशकांची आलटून पालटून पावसाची उघडीप बघून फवारणी करावी. फवारणी करत असताना कीटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी करावी. काढणीस तयार असलेल्या मका पिकाची काढणी करून घ्यावी.
भुईमूगउन्हाळी भुईमूग पिकात आवश्यकतेनुसार तुषार सिंचन पद्धतीने पाणी व्यवस्थापन करावे. भुईमूग पिकात रस शोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी इमिडाक्लोप्रिड 18.8 % 2 मिली किंवा क्विनॉलफॉस 25% 20 मिली यापैकी एका कीटकनाशकाची प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून उघडीप बघून फवारणी करावी.

फळबागेचे व्यवस्थापन

केळीकेळी बागेस आवश्यकतेनुसार सरी वरंब्याने पाणी द्यावे. जमिनीतील ओलावा टिकून राहण्यासाठी व जमिनीचे तापमान संतुलित राहण्यासाठी केळी फळ झाडाच्या आळ्यात आच्छादन करावे. नवीन लागवड केलेल्या केळीच्या रोपांचे उन्हापासून संरक्षण करण्यासाठी रोपांना सावली करावी.
आंबाआंबा बागेत आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे. जमिनीतील ओलावा टिकून राहण्यासाठी व जमिनीचे तापमान संतुलित राहण्यासाठी आंबा फळ झाडाच्या आळ्यात आच्छादन करावे. नवीन लागवड केलेल्या आंब्याच्या रोपांचे उन्हापासून संरक्षण करण्यासाठी रोपांना सावली करावी. आंबा बागेत 00:00:50:15 ग्रॅम प्रतिलिटर पाण्यात मिसळून पावसाची उघडीप बघून फवारणी करावी.
द्राक्षकाढणीस तयार असलेल्या द्राक्ष घडांची काढणी करून घ्यावी. काढणी केलेल्या मालाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.

Krushi Salla 2025 भाजीपाला

  • भाजीपाला पिकात खुरपणी करून भाजपाला पीक तण विरहित ठेवावे. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाची काढणी करून घ्यावी.
  • नवीन लागवड व पुर्नलागवड केलेल्या रोपांना आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे.

फुल शेती

  • फुल पिकात खुरपणी करून फुल पिक तण विरहित ठेवावेत व आवश्यकतेनुसार पाटाने पाणी द्यावे.
  • काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी करून बाजारपेठेत पाठवावी.

इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment