कृषी निविष्ठा तक्रारी आठ दिवसांच्या आत तपासल्या जाणार; कृषी आयुक्तालयाचे नवीन निर्देश!! Krushi Nivishta 2025

Krushi Nivishta 2025 शेतीचे उत्पादन वाढवण्यासाठी शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण बियाणे, खते आणि कीटकनाशके उपलब्ध करून देण्याची शासनाची जबाबदारी आहे. अनेक वेळा भेसळयुक्त, निकृष्ट निविष्टामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते.

Krushi Nivishta 2025

WhatsApp Group Join Now

दुकानदार अथवा कंपनीकडून शेतकऱ्यांची फसवणूक झाल्यास तक्रारीचे आठ दिवसात स्थानिक पातळीवर निवारण होण्यासाठी तक्रार निवारण समितीची पुनर्रचना केली असून तालुका कृषी अधिकारी यांना सचिव करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांनो पीक विमा अर्जाला सुरुवात; फार्मर आयडी काढून घ्या! ही आहे शेवटची मुदत,

Krushi Nivishta 2025 कृषी निविष्ठांमध्ये शेतकऱ्यांची फसवणूक झाल्यास जिल्हा व तालुका स्तरावर तक्रार करता येते. तक्रार समितीमध्ये उपविभागीय कृषी अधिकारी अध्यक्ष, सदस्य म्हणून तालुका, कृषी अधिकारी, कृषी विद्यापीठ, कृषी संशोधन केंद्र, कृषी विज्ञान केंद्र प्रतिनिधी, महाबीज प्रतिनिधी तर कृषी अधिकारी हे सदस्य सचिव असणार आहेत. यापूर्वी पंचायत समिती कृषी अधिकारी सदस्य सदस्य होते.

Krushi Nivishta 2025 कृषी आयुक्तालयाच्या नवीन निर्देशानुसार तक्रार निवारण समितीची पुनर्रचना करण्यात आली आहे. यामध्ये कृषी निविष्ठा गुणवत्तेची खातरजमा करून तक्रारींचे वेळेत निराकरण होईल, याची दक्षता घेण्यात येणार आहे.

WhatsApp Group Join Now

Krushi Nivishta 2025 तसेच शेतकऱ्यांनी केलेल्या निविष्ठा तक्रारी आठ दिवसांच्या आत तपासल्या जाणार असून संबंधित कंपनीचे प्रतिनिधी विक्रेते आणि तक्रार करणारे शेतकरी यांचे उपस्थिती अनिवार्य राहणार आहे.

खरेदी पावतीच्या आधारे विहित घेऊन नमुन्यात पंचनामा करून, नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले जातील. तपासणी अहवालावरून आवश्यक ती कार्यवाही तात्काळ केली जाणार आहे.

Krushi Nivishta 2025 तालुकास्तरावर तक्रार निवारण समिती गठित करण्यात येणार आहेत. या समितीमुळे निकृष्ट कृषी निविष्ठा विक्रेत्यांना चाप बसणार आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांनाही तालुकास्तरावर तक्रारी करता येणार आहेत.

इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment