कोथिंबीर, मेथी शेतकऱ्यांना करणार लखपती; मंचर बाजार समितीत मिळाला विक्रमी दर; Kothimbir Bajarbhav 2025

Kothimbir Bajarbhav 2025 मंचर उन्हाच्या तडाख्याने मेथी, कोथिंबीर यांची मर होऊ लागल्याने आवक घटली आहे. त्यामुळे त्यांचे बाजारभाव कडाडले आहेत. मंचर कृषी उत्पन्न बाजार समिती कोथिंबीर जुडी 34 रुपयांना तर मेथीची जुडी 28 रुपयांना विकली गेली आहे. सध्या उन्हाचा प्रचंड कडाका जाणवत आहे.

 Kothimbir Bajarbhav 2025

दिवसभर रणरणते ऊन पडलेले असते. त्यामुळे पालेभाज्यांची मर होऊ लागली आहे. उन्हाच्या तडाख्याने शेतातील पालेभाज्यांनी मान टाकली आहे. परिणामी, आवक कमी होऊन पालेभाज्यांचे दर कडाडले आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीचे मंचर मुख्य बाजार आवारात सोमवारी रात्री एकूण 26 हजार 465 जुड्यांची भाजीपाल्याची आवक झाली.

राज्यात ‘या’ ठिकाणी पुढील दोन दिवस पुन्हा गारपिटीसह अवकाळीचा इशारा!

Kothimbir Bajarbhav 2025 कोथिंबीर 18 हजार 940 जुड्यांची आवक होऊन कोथिंबीरला शेकडा 511 ते 3401 असा बाजारभाव मिळाला. मेथीचे 4 हजार 835 जुड्यांचे आवक झाली. मेथीस शेकडा 1401 ते 2828 असा बाजारभाव मिळाला आहे. तसेच शेपूची 2 हजार 690 जुड्यांची आवक होऊन शेकडा 411 ते 1425 असा बाजार भाव मिळाला.

WhatsApp Group Join Now

Kothimbir Bajarbhav 2025 किरकोळ बाजारात जुडी 50 रुपये

  • ठोक बाजारात मेथी, कोथिंबीरचे बाजार भाव कडाडल्याने किरकोळ विक्री करताना ग्राहकांना जास्त पैसे मोजावे लागत आहे.
  • बाजार समितीचे लिलावात 34 रुपये, असा एका कोथिंबीर जुडीला भाव मिळाला असला तरी किरकोळ बाजारात ही जुडी 50 रुपये या दराने विकली जाते.
  • बाजारभाव वाढूनही शेतात उत्पादन कमी निघत असल्याने शेतकऱ्यांना अपेक्षित नफा मिळत नाही.

चांगल्या प्रतीची मेथी, कोथिंबीर चढ्याभावने विकले जात असली तरी खराब मालाला पाच ते दहा रुपये जुडी असा भाव मिळतो आहे. शेतकऱ्यांना शेतातील पालेभाज्यांचे पीक टिकून ठेवण्यासाठी खूपच प्रयत्न करावे लागत आहे. वाढलेली उष्णता या पिकांना मारक ठरत आहे. काही भागात पाणीसाठा कमी झाला आहे, येथे पालेभाज्या निघत नाही. यापुढे काळात पालेभाज्यांचे बाजारभाव अजून कडाडतील.– कैलास गावडे व्यापारी”

इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment