kisan credit card yojana 2025 किसान क्रेडिट कार्ड योजना 2025 शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट करण्याचा ध्येय सरकारने ठरवले आहे. शेतीच्या कामासाठी शेतकऱ्यांना पैशांची गरज असते. आणि शेतकऱ्यांना कोणाकडूनही पैसे ची व्यवस्था करावी लागते त्यासाठी शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी किसान क्रेडिट कार्ड कर्ज योजना सरकारने सुरू केलेली आहे.

सरकारने सुरू केलेल्या या योजनेमध्ये तुम्ही कधीही तुमची जमीन गहाण ठेवून शेतीसाठी कमी व्याजदर कर्ज घेऊ शकता या कर्जाला किसान क्रेडिट कार्ड किंवा ग्रीन कार्ड असे म्हटले जाते. किसान क्रेडिट कार्ड योजना केंद्र सरकारने सुरू केलेली आहे ही योजना फक्त शेतकऱ्यांसाठी मदतीने या योजनेचा लाभ घेऊन तुम्ही सहजपणे कर्ज घेऊ शकता त्यासाठी तुम्हाला हा लेख पूर्णपणे वाचणे आवश्यक आहे.
योजनेचे नाव : | किसान क्रेडिट कार्ड योजना 2025 |
लाभार्थी : | सामान्य शेतकरी |
लाभ : | तीन लाख पर्यंत कर्ज |
वर्ष : | 2025-2026 |
kisan credit card yojana 2025 किसान क्रेडिट कार्ड हे एक प्रकारचे कर्ज आहे. बँकेकडून शेतकऱ्यांना कमी व्याजदर पुरविले जाते ही योजना भारत सरकार भारतीय रिझर्व बँक आणि नाबार्ड मध्ये किसान क्रेडिट कार्ड या नावाने स्वतंत्रपणे सुरुवात केली होती. किसान क्रेडिट कार्ड योजनेमधून तुम्ही आधी जर कर्ज घेतले नसेल तुम्ही तुमच्या जवळच्या बँकेला भेट देऊन तुमच्या जमिनीच्या कागदपत्रे जमा करून आणि काही औपचारिक नियम असतील ते पूर्ण करून शेतीसाठी कर्ज घेऊ शकता.
kisan credit card yojana 2025 कर्ज व्याजदर चार टक्के सूट :
शेतकऱ्यांना कृषी कार्यासाठी kcc कर्ज व्याजदर आर्थिक मदतीची आवश्यकता आहे. ते पूर्ण करण्यासाठी शेतकरी सावकारांकडून कर्ज घेऊन व्याजाच्या तावडीत सापडतात. किसान क्रेडिट कार्ड योजना शेतकऱ्यांना पण कमी व्याजदर आणि सोप्या पद्धतीने कर्ज देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. तरी या योजनेमध्ये कमाल 4 टक्के व्याजाने शेतकऱ्यांना कर्ज दिले जाते.

किसान क्रेडिट कार्ड योजनेचे फायदे / kisan credit card yojana 2025 :
- किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत देशातील सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येतो.
- या योजनेची संबंधित सर्व शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान निधी दिला जातो.
- शेतकऱ्यांना तीन लाख रुपयांचे कर्ज केंद्र सरकारने सुरू केलेल्या या क्रेडिट कार्ड योजनेद्वारे दिले जाते.
- शेतकरी आपली शेती या योजनेमधून कर्ज मिळाल्याने चांगला पद्धतीने करू शकतात.
- शेतकरी लोकांना या योजनेचा लाभ देशातील 14 कोटी पेक्षा अधिक शेतकऱ्यांना मिळणार आहे.
- शेतकऱ्यांच्या डोक्यावरील व्याजाचा भार कमी करणे.
- सर्व बँकांकडून किसान क्रेडिट कार्डद्वारे कर्ज घेतले जाऊ शकते.
किसान क्रेडिट कार्ड कर्जाची मुदत :
kisan credit card yojana 2025 किसान क्रेडिट कार्ड योजना 2025 यामध्ये तुम्हाला हवे तेव्हा पैसे जमा करू शकता आणि तुम्हाला हवे तेव्हा पैसे काढू शकता किसान कार्ड हे ओवरड्राफ्ट प्रमाणे काम करते. पैसे काढल्यावर तुम्हाला व्याज भरावे लागते. हे क्रेडिट कार्ड फक्त पाच वर्षासाठी दिले जाते. पाच वर्षानंतर तुम्हाला व्याज द्यावे लागते तुम्ही ते जमा करून पुन्हा नवीन करू शकता.
ओवरड्राफ्ट प्रमाणे किसान क्रेडिट कार्ड सुविधा उपलब्ध होतील का ?
kisan credit card yojana 2025 बँकांनी त्यांच्या ग्राहकांना दिलेले कर्ज ज्यामध्ये ग्राहक त्यांच्या हातात पैसे नसतानाही पैसे काढू शकतात याला ओवरड्राफ्ट असे म्हणतात. यामध्ये विशिष्ट मर्यादा निश्चित केलेली असते आणि या कर्जाची क्रेडिट मर्यादा बँकांवर अवलंबून असते. जेव्हा तुम्ही पैसे काढता तेव्हा ते तुम्हाला व्याजासह परत करावे लागते.
शेतकऱ्यांना दस्तासाठी नोंदणी शिल्लक मुद्रांक शिल्लक मध्ये सवलत सलोखा योजना ऑनलाइन अर्ज :
बँका देतआहेत किसान क्रेडिट कार्ड योजनेमधून कर्ज :
kisan credit card yojana 2025 बँक साधारणपणे सर्वच बँकांना किसान क्रेडिट कार्डची सुविधा दिली आहे. यामध्ये शेतकरी त्यांच्या जवळच्या बँकेला भेट देऊन या सुविधेची संपूर्ण माहिती घेऊ शकतात. खालील बँकांवरील किसान क्रेडिट कार्ड प्रदान केले जाते.
- बँक ऑफ इंडिया
- ॲक्सिस बँक
- एचडीएफसी बँक
- पंजाब नॅशनल बँक
- आयसीआयसीआय बँक
- स्टेट बँक ऑफ इंडिया
- बँक ऑफ बडोदा
kisan credit card yojana 2025 योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे :
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- आय प्रमाण
- बँक खाते पासबुक
- निवास प्रमाणपत्र
- जात प्रमाणपत्र
- मोबाईल नंबर
- जमिनीचे कागदपत्रे
- पासपोर्ट आकाराचा फोटो
क्रेडिट कार्ड साठी अर्ज करा : | येथे क्लिक करा |
इतर योजनांची माहिती मिळवा : | येथे क्लिक करा |
Video Crdit : Marathi corner
कसा करावा अर्ज किसान क्रेडिट कार्ड कर्ज योजनेसाठी ?
FAQ :
किसान क्रेडिट कार्ड योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती ?
आधार कार्ड
पॅन कार्ड
आय प्रमाणपत्र बँक खाते पासबुक
निवास प्रमाणपत्र
जात प्रमाणपत्र
किसान क्रेडिट कार्ड ला किती दिवस मुदत असते ?
किसान क्रेडिट कार्डचा कर्जावर पाच वर्ष मुदत दिली जाते.
किसान क्रेडिट कार्ड योजनेचे फायदे काय आहेत ?
भारत सरकार शेतकऱ्यांना दोन टक्के व्याज सवलत आणि तीन टक्के त्वरित परतफेड करतो प्रोत्साहन देते, अशाप्रकारे चार टक्के प्रति वर्षी अत्यंत सवलतीच्या दराने कर्ज उपलब्ध होते. शेतकऱ्यांच्या गुंतवणुकीच्या कर्जाच्या गरजेसाठीआहे ही योजना पुढे वाढवण्यात आली आहे.
किसान क्रेडिट कार्ड साठी कोण पात्र नाही?
कमाल वय वर्षे -75 जर कर्जदार हा ज्येष्ठ नागरिक (वय 60 वर्षांहून अधिक) असेल, तर सह-कर्जदार हा कायदेशीर वारसा असला पाहिजे. सर्व शेतकरी व्यक्ती संयुक्त शेती करणारे मालक.
किसान क्रेडिट कार्ड कसे बनवावे ?
तुम्हाला किसान क्रेडिट कार्ड मिळवायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर pmkisan.gov.in वर जावे लागेल. मग किसान क्रेडिट कार्ड फॉर्म डाउनलोड करा फॉर्म भरा आणि फॉर्म सोबत आवश्यक कागदपत्रे जोडून तुमच्या जवळच्या बँकेत सबमिट करा.